Abdu Rozik चे लग्न 7 जुलैला होणार नाही; करियरमुळे गायकाने घेतला मोठा निर्णय

 



अब्दू रोझिक हा एक प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार आणि गायक आहे. तो ताजिक गायकही आहेत. टीव्ही रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’मधून चर्चेत आलेला गायक अब्दू रोजिकने तरुण वयातच कोट्यवधींची कमाई केली आहे. अब्दू रोजिक सलमान खानच्या ‘बिग बॉस १६‘ या शोमध्येही सहभागी झाला होता. या शोमुळे त्याने भारतीय प्रेक्षकांच्या मनात त्याने खास स्थान निर्माण केले आहे. त्यांच्याविषयीचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी आतुर असतात. नुकतेच अब्दूने सांगितले होते की, त्याचे लग्न ठरले आहे आणि तो ७ जुलै रोजी आपल्या प्रेयसीशी लग्न करणार आहे. मात्र, आता त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे.(Abdu Rozik Wedding Postponed)


अब्दू रोजिक चे ७ जुलै रोजी लग्न होणार होते. पण आता बिग बॉस 16 फेम गायकाने आपल्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. याचे कारण म्हणजे त्याचे करियर. दुबईतील कोका कोला एरिना येथे ६ जुलै रोजी होणाऱ्या बॉक्सिंग च्या लढतीत अब्दू रोझिकला बॉक्सिंग फाइट ऑफर देण्यात आली आहे. यामुळे त्याने आपल्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती त्याने ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.


तो मुलाखतीत म्हणाला की, ”आयुष्यात त्याला या बॉक्सिंग फाइट ऑफरसाठी लढण्याची संधी मिळेल, असे मला कधी वाटले नव्हते. या वर्षी माझ्या लव्ह लाईफ आणि करिअरमध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. दुर्दैवाने, मला सामन्यासाठी लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागेल कारण यामुळे भविष्यासाठी मोठी आर्थिक सुरक्षा मिळेल. अमिरा माझ्या निर्णयाचे पूर्ण पणे समर्थन करते कारण यामुळे खूप फरक पडेल. माझ्या आकाराच्या व्यक्तीसाठी हे पहिलीच फाइट ऑफर आहे आणि मला आजकाल कठोर सराव करावा लागत आहे.”(Abdu Rozik Wedding Postponed)

================================

हे देखील वाचा: यंदाचा ‘बिग बॉस ओटीटी 3’ शो अभिनेता अनिल कपूर होस्ट करणार

================================

अब्दू रोजिकच्या लग्नाचे नवे अपडेट समोर आलेले नाही. पण चाहते त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. अब्दू रोजिकचे लग्न पुढे ढकलण्याचे कारण त्याचे करिअर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रेमावर करियर भारी पडले अशाही कमेंट्स आता समोर येऊ लागल्या आहेत.

Original content is posted on:  https://kalakrutimedia.com/abdu-rozik-wedding-postponed-because-of-this-reason-info/


Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते