“आता एक सोलो चित्रपट करून बघच”; Drishyam 3च्या दिग्दर्शकाचा अक्षयय खन्नाला सल्ला
सध्या सगळीकडे एकाच अभिनेत्याची चर्चा आहे आणि तो म्हणजे ‘धुरंधर’ फेम अक्षय खन्ना… आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटातील त्याची रेहमान डकैत ही भूमिता जगभरात गाजली आहे… एकीकडे त्याचं या चित्रपटातील कामासाठी कौतुक होत असताना दुसरीकडे त्याने अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’ (Drishyam 3) मधून एक्झिट घेतल्याचं समोर आलं आहे… चित्रपटाची शुटींग सुरु होण्याआधी अक्षय़ने बॅकआऊट केल्याचं सांगितलं जात असून यावर आता दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी काही महत्वाचं खुलासे केले आहेत.. ते काय म्हणाले आहेत जाणून घेऊयात… Latest Marathi Movies ETimes ला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक यांनी अक्षय खन्नाबरोबर (Akshaye Khanna) झालेल्या मतभेद आणि मानधनाबद्दल माहिती दिली.. अक्षय़ खन्नाने दृश्यम ३ सोडल्याच्या बातमीवर अभिषेक म्हणाले की, , “हा निर्णय पूर्णपणे माझ्यावर सोडण्यात आला होता. नोव्हेंबरमध्ये चित्रपटाचा करार झाला होता; मात्र शूट सुरू होण्याच्या फक्त पाच दिवस आधी अक्षय खन्नानं चित्रपटातून माघार घेतली. तोपर्यंत त्याचा लूक फायनल झाला होता, कपडे तयार होत होते, स्क्रिप्टचं नॅरेशनही झालं होतं आणि अक्षयला स्क्रिप्ट आवडलीही ह...