Posts

Showing posts from May, 2026

पांडू हवालदार : राज्य चित्रपट महोत्सवात २१ पैकी पाच पुरस्कार….

  वर्षे कशी नि कधी भरभर पुढे सरकताहेत बघा, दादा कोंडके यांच्या ‘ पांडू हवालदार ‘ या चित्रपटाच्या मुंबईतील प्रदर्शनास चक्क ५१ वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबई शहरात हा चित्रपट ९ मे १९७५ रोजी गिरगावातील सेन्ट्रल चित्रपटगृह, दादर येथील कोहिनूर चित्रपटगृह आणि इतरत्र प्रदर्शित झाला आणि‌ पहिल्याच खेळापासून चित्रपट सुपर डुपर हिट‌ ठरला तो कायमचाच. प्रत्येक चित्रपटाच्या नावाला आपलं एक व्यक्तीमत्व असते. ते नाव घेताच अथवा आठवताना तो चित्रपट डोळ्यासमोर यायला हवा. ‘ पांडू हवालदार ‘ असाच एक चित्रपट आहे. दादा कोंडके यांनी आपल्या विशिष्ट शैलीत खुलवलेले त्या काळातील पोलिसांच्या आयुष्याचे दर्शन आहे.‌ आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल मिडियात अशोक सराफ यांची अनेक पाॅडकास्टवर घेतली जात असलेल्या जवळपास प्रत्येक मुलाखतीत ‘ पांडू हवालदार ” या चित्रपटावर त्यांना हमखास प्रश्न विचारला जातोय. ( अशोक सराफ म्हणजे बरंच काही, अक्षरशः बरेच काही आहे. ‘पांडू हवालदार’ या चित्रपटाबाबत बरेच काही सांगता येईल. त्यात एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे, १९७५ साठीच्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात एकूण २१ पुरस्कारात या चित्रपट...