Anthony Gonsalves : हिंदी सिनेसंगीताचा पडद्यामागचा ‘शिरोमणी’
हिंदी सिनेसंगीताच्या सुवर्णयुगातील अवीट गाण्यांच्या यशाचे श्रेय नेहमी संगीतकारांच्या पदरात पडते. मात्र, या सुरावटींना प्रत्यक्षात उतरवणारे खरे हक्कदार, म्हणजेच पडद्यामागचे वादक आणि अरेंजर्स मात्र नेहमीच प्रसिद्धीच्या पल्याड राहिले. गोव्यातील ख्रिश्चन संगीतकारांपैकी Anthony Gonsalves (जन्म 12 जून 1927) यांना या सर्व वादकांचे शिरोमणी मानले जाते. अनेक अजरामर सुरावटींचे जनक असलेले Anthony आज काळाच्या पडद्याआड गेले असले, तरी त्यांनी सजवलेली गाणी आजही तो सुवर्णकाळ रसिकांच्या मनात जिवंत ठेवतात. चित्रपट बोलू लागल्यावर साहजिकच गाण्यांचे आगमन झाले. सुरुवातीला ध्वनिमुद्रणाच्या (Recording) मर्यादांमुळे मोजक्या वाद्यांसह गाणी रेकॉर्ड केली जात. प्ले-बॅकची सोय नसल्याने काम करणारे नट-नट्याच गात असत. गाण्यांमध्ये प्रामुख्याने हार्मोनियम, व्हायोलिन आणि तबला यांचाच वापर होई. Pankaj Mullick किंवा K. L. Saigal यांचा अपवाद वगळता, तत्कालीन बहुतांश गाणी रसिकांना केवळ सहन करावी लागत. १९४५ नंतर मात्र गाण्यांच्या या प्रवासाने एक सुरेल वळण घेतले. संगीतकार Anil Biswas यांनी वेगवेगळ्या वाद्यांचा मेळ घालत ...