Kumkum : तेरा जलवा जिसने देखा वो तेरा हो गया
भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील एक लख्ख चमकणारा तारा म्हणजे अभिनेत्री Kumkum. पडद्यावरील त्यांचे सौंदर्य, सहज अभिनय आणि विशेषतः त्यांचे नृत्य आजही रसिकांच्या स्मरणात आहे. कुमकुम यांच्या कारकिर्दीची सुरुवात एका रंजक योगायोगाने झाली. जेव्हा Guru Dutt आपला Aar Paar (१९५४) हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे घेऊन गेले, तेव्हा एका गाण्यावरून पेच निर्माण झाला. ‘कभी आर कभी पार लागा तीर-ए-नजर’ हे गाणे मूळतः गुरु दत्त यांनी बालकलाकार Jagdeep वर चित्रित केले होते. मात्र, एका पुरुषाने (किंवा मुलाने) अशा प्रकारचे रोमँटिक गाणे सादर करणे सेन्सॉर बोर्डाला रुचले नाही. त्यांनी हे गाणे एखाद्या स्त्री कलाकारावर चित्रित करण्याची अट घातली.
चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आली होती आणि Guru Dutt यांच्याकडे वेळ कमी होता. अशावेळी त्यांनी नुकत्याच सिनेसृष्टीत पाऊल ठेवलेल्या Kumkum यांना बोलावले. त्यांची स्क्रीन टेस्ट घेतली गेली आणि या अजरामर गाण्यासाठी त्यांची निवड झाली. विशेष म्हणजे, या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन खुद्द गुरु दत्त यांनीच केले होते. O. P. Nayyar यांच्या संगीताने सजलेले हे गाणे आणि कुमकुम यांची अदाकारी यामुळे चित्रपट सुपरहीट ठरला आणि कुमकुम रातोरात प्रसिद्ध झाल्या. कुमकुम यांना केवळ नृत्यांगना म्हणून अडकून राहायचे नव्हते, त्यांना अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध करायचे होते. गुरु दत्त यांनी त्यांची ही जिद्द ओळखून त्यांना Mr. & Mrs. 55 मध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका दिली. मात्र, या गुरु दत्त यांच्या या निर्णयाला त्यांचे अत्यंत विश्वासू छायाचित्रकार V. K. Murthy यांचा तीव्र विरोध होता.
Guru Dutt यांनी Kumkum यांना पाच मुलांच्या आईची भूमिका दिली होती. मूर्ती साहेबांचे म्हणणे होते की, “कुमकुम स्वतःच दिसायला इतकी लहान आहे, ती पाच मुलांची आई कशी वाटेल?” पण गुरु दत्त आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांनी कुमकुम यांच्याकडून ती भूमिका उत्तमरीत्या करवून घेतली आणि चित्रपट यशस्वी ठरला. यातून कुमकुम यांची अभिनेत्री म्हणून नवी ओळख निर्माण झाली. या काळात कुमकुमने Ghar Number 44, Kar Bhala, Pyaasa, Funtoosh, Mother India, Swarn Sundari, Mr. Cartoon M.A., Karodpati, Char Dil Char Rahen, अशा अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. या दरम्यान ती Ghar Sansar, Dil Bhi Tera Hum Bhi Tere, Tel Malish Boot Polish, King Kong, Son of India, Mr. X in Bombay, Qawwali Ki Raat, Ganga Ki Lahren, Ek Sapera Ek Lutera, Ganga Maiyya Tohre Peer Chadhaiibo, या पहिल्या भोजपुरी सिनेमाची ती नायिका होती. पुढे अनेक भोजपुरी सिनेमाची ती नायिका होती. Ganga या भोजपुरी सिनेमाची ती निर्माती होती. Mr. X in Bombay, Ganga Ki Lahren (Kishore Kumar) Char Dil Char Rahen (Shammi Kapoor), Dil Bhi Tera Hum Bhi Tere, Lalkar (Dharmendra), Dhamkee (Vinod Khanna), Ek Sapera Ek Lutera (Feroz Khan), Raja Aur Runk (Sanjeev Kumar) Ek Kunwara Ek Kunwari (Pran) अशा चोटी च्या अभिनेत्यांची ती नायिका होती. तिच्यावर चित्रीत गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. आज सजन मोहे अंग लगा लो (Pyaasa) “मधुबन में राधिका नाचे रे” (Kohinoor, 1960) “कभी आर कभी पार” (Aar Paar, 1954) “ये है बॉम्बे मेरी जान” (C.I.D., 1956).”खूबसुरत हसीना” (Mr. X in Bombay, 1964) “रेशमी सलवार कुर्ता जाली का” (Naya Daur, 1957) “जादुगर कातिल” (Kohinoor, 1960)”तेरा जलवा जिसने देखा” (Ujala, 1959).
१९५० आणि ६० च्या दशकात कुमकुम यांनी C.I.D., कोहिनूर, मदर इंडिया आणि नया दौर यांसारख्या अनेक दिग्गज चित्रपटांत काम केले. त्यांनी भोजपुरी चित्रपटसृष्टीतही पहिले सुपरस्टार पद भूषवले. त्यांचा शेवटचा प्रदर्शित झालेला चित्रपट Bombay By Nite (१९७६) हा होता, जो कृष्णधवल असून बराच काळ रखडला होता. त्यापूर्वी Jalte Badan (१९७३) मध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. (Kumkum)
Kumkum यांच्या जन्मस्थळाबाबत आणि कुटुंबाबाबत नेहमीच चर्चा राहिली आहे. अधिकृतरीत्या त्या बिहारमधील हुसैनाबादच्या नवाब घराण्यातील मानल्या जातात. मात्र, ज्येष्ठ पत्रकार Shishir Krishna Sharma यांच्या लेखात प्रसिद्ध नृत्यांगना Sitara Devi यांच्या हवाल्याने एक वेगळीच माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार, कुमकुम यांचे वडील बनारसचे सुप्रसिद्ध तबला वादक Vasudev Maharaj (Vasudev Narayan Singh) होते. विशेष म्हणजे, वासुदेव महाराज हे अभिनेता Govindaचे आजोबा होते. सितारा देवी यांच्या दाव्यानुसार वासुदेव महाराज यांनी दोन विवाह केले होते. त्यांची पहिली पत्नी हिंदू होती, ज्यांची कन्या म्हणजे प्रसिद्ध गायिका Nirmala Devi (गोविंदाची आई). त्यांची दुसरी पत्नी मुस्लिम होती (ज्यांना Munnan Aapa म्हटले जाई). कुमकुम आणि त्यांची बहीण Radhika या दुसऱ्या पत्नीच्या मुली होत्या. या नात्याने कुमकुम या गोविंदाची आत्या लागतात.
Govindaने देखील एका जुन्या मुलाखतीत Kumkum यांचा उल्लेख कुमकुम आंटी असा केला होता, ज्यामुळे या दाव्याला पुष्टी मिळते. कुमकुम यांची बहीण Radhika हिने देखील Shola Jo Bhadke आणि Raat Ke Rahi यांसारख्या चित्रपटांत काम केले होते.२२ एप्रिल १९३४ (किंवा काहींच्या मते १९३५) रोजी जन्मलेल्या कुमकुम यांनी सिनेसृष्टीत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. त्यांचे आयुष्य हे केवळ ग्लॅमरपुरते मर्यादित नव्हते, तर त्यात बनारसची सांगीतिक परंपरा आणि लखनवी नजाकत यांचा एक सुंदर मिलाफ होता. आज त्या आपल्यात नसल्या तरी Madhumati पासून Kohinoor पर्यंतच्या त्यांच्या भूमिका रसिकांच्या मनात कायम जिवंत राहतील.
Comments
Post a Comment