Posts

Showing posts from October, 2026

Kishore Kumar : दिन हैं सुहाना आज पहली तारीख है…

Image
  रेडिओ सिलोनने (आता SLBC ) दोन गोष्टींचा पायंडा आजवर मोडला नाही, एक म्हणजे दररोज सकाळी सात वाजून सत्तावन मिनिटांना लागणारे Kundan Lal Saigal चे गीत आणि दर महिन्याच्या पहिल्या तारखेला लागणारे Din Hai Suhana Aaj Pehli Tarikh Hai हे Kishore Kumar चे गीत! काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले, रेडिओचे स्वरूप बदलले, पण दर महिन्याची पहिली तारीख उजाडली की रेडिओ सिलोनवरून (आताचे Sri Lanka Broadcasting Corporation ) सकाळी साडेसात वाजता हे गाणे आजही तितक्याच उत्साहाने वाजवले जाते आणि श्रोतेही तेवढ्याच आनंदाने ते ऐकतात. साठ-सत्तर वर्षांहून अधिक काळ एकच गाणे दर महिन्याला एका ठरावीक वेळी न चुकता वाजवले जाणे आणि त्याची लोकप्रियता तसूभरही कमी न होणे, हा जागतिक रेडिओ जगतातील एक अद्भूत आणि विलोभनीय विक्रमच म्हणावा लागेल. (Kishore Kumar) Kishore Kumar च्या या अजरामर गीताचा पडद्यामागचा किस्सा अत्यंत मनोरंजक आणि तितकाच ऐतिहासिक आहे. हे गाणे ज्या सिनेमात होते, तो सिनेमा मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलावंत आणि दिग्दर्शक Raja Nene यांच्या Production House ने १९५४ साली हिंदीत आणलेला Pehli Tarikh हा होता. या सिनेम...