Rakhi Sawant ची तब्येत अचानक बिघडली, हॉस्पिटलच्या बेडवर बेशुद्ध अवस्थेतील फोटो झाले व्हायरल
टीव्हीची ड्रामा क्वीन आणि अनेकदा वादग्रस्त ठरलेल्या राखी सावंत ची तब्येत बिघडल्याची माहीती समोर येत आहे. प्रकृती इतकी बिघडली की तिला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पॅपराझी विरल भयानी ने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर राखी सावंतचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती बेशुद्ध अवस्थेत दिसत आहे. हॉस्पिटलमधून समोर आलेले हे फोटो पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. पण हे सगळं खरं आहे की नाटक, हे अद्याप निश्चित झालेलं नाही. कारण तब्येत बिघडल्याचा दावा करण्याच्या काही तासांपूर्वी राखी सावंत टॉवेल घालून मुंबईच्या रस्त्यांवर पोज देत होती. ती अनेकदा विनोदही करते.त्यामुळे ही मस्करी तर नाही ना? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. काही दिवसांपूर्वी पूनम पांडेने ज्या प्रकारे गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कॅन्सरची खिल्ली उडवली, त्यामुळे चाहत्यांना कुणावरही विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. ( Rakhi Sawant Admitted in Hospital ) विरल भयानी ने राखी सावंतचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये राखीचे डोळे बंद आहेत. पॅपराझींनी सांगितले की, छा...