Posts

Showing posts from July, 2026

Rajesh Khanna : राजेश खन्नाचे पडद्यावर न आलेले चित्रपट

मी कायमच म्हणतोय, काही ना काही कारणास्तव पडद्यावर न आलेल्या चित्रपटांपैकी अर्धे चित्रपट जरी पूर्ण झाले असते तर चित्रपटसृष्टीच्या इतिहासाने वेगळे वळण घेतले असते. प्रत्येक कलाकाराच्या प्रगती पुस्तकात असे निर्मितीच्या अधेमधे बंद पडलेले चित्रपट अनेक. त्यावर एकादे भरपूर माहिती आणि मनोरंजनाची छान खिचडी असलेले दुर्मिळ फोटोसहचे एखादं पुस्तक, शो, वेबसिरीज नक्कीच बनेल. Rajesh Khanna यांचे पडद्यावर न आलेले चित्रपट फारच कुतुहल वाढवणारे. Shakti Samanta दिग्दर्शित Aradhana (१९६९) प्रदर्शित व्हायच्या बरोब्बर एक महिना अगोदर Mohan Kumar दिग्दर्शित Prayaschit या नावाच्या राजेश खन्नाची भूमिका असलेल्या चित्रपटाचा मुहूर्त झाला, नायिका होती Sadhana . Aradhana , Do Raaste हे चित्रपट सुपर डुपर हिट‌ ठरले आणि Rajesh Khanna यांचा झंझावात सुरू झाला आणि राजेश खन्ना असा आणि इतका बिझी झाला की त्याच्याकडे Prayaschit या चित्रपटासाठी तारखाच नव्हत्या आणि त्यातच तो चित्रपट डब्यात गेला. …राजेश खन्ना जबरदस्त फाॅर्मात असताना साधना हिचे पती R. K. Nayyar यांनी त्याला Gurkha Jung Bahadur या चित्रपटात नायक म्हणून साईन...

Film Center : चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील महत्वाचा स्पाॅट…

गिरगावात लहानाचा मोठा होताना ताडदेव परिसरात कधी जाणं झालं की एक इमारत कायमच आपल्या नावापासूनच लक्ष वेधून घेई, ती म्हणजे Film Center . नाव वाचताना कुतूहल निर्माण होई की, या फिल्म सेंटरमध्ये चित्रपटविषयक नेमकं काय काम चालत असेल? सर्वसामान्य माणसाला चित्रपटाची ओळख ही चित्रपट पाहणे या गोष्टीपासून होते. माझ्या पिढीने आपल्या पालकांचा हात धरुन एकपडदा चित्रपटगृह अर्थात Single Screen Theatres मध्ये चित्रपट पाहायला जायचं यापासून झाली. आमच्या Khotachi Wadi समोर असलेल्या Majestic चित्रपटगृहात साठच्या दशकाच्या उत्तरार्धात कृष्ण धवल अर्थात Black and White मराठी चित्रपट पाहून मला या पडद्यावरील गोष्टीत रमून जायच्या दृश्य माध्यमाची ओळख झाली. चित्रपटाची श्रेयनामावली वाचताना त्यात Natraj Studio , Mehboob Studio अशी अनेक चित्रपट स्टूडिओची नावे वाचता वाचता फिल्म सेंटर हेदेखील वाचत असे. चित्रपटाची श्रेयनामावली वाचताना या क्षेत्राची थोडी फार ओळख होते आणि व्याप्तीही समजते. पुढे हे क्षेत्र शक्य तितक्या प्रमाणात जाणून घेण्याचा जणू मी झपाटाच लावला. त्यात लहान मोठे चित्रपट चित्रीकरण स्टुडिओ, गीत संगीत ध्वनीमुद...

Pran : भूमिकेशी प्रामाणिक निष्ठा जपणारे ‘प्राण’, जेव्हा शेर खानसाठी त्यांनी खान बादशाह नाकारला!

  जेव्हा Prakash Mehra यांनी Pran साहेबांना Zanjeer चित्रपटासाठी करारबद्ध केले, तेव्हा दिवंगत Manoj Kumar यांनीही त्यांच्या Shor चित्रपटाचे काम सुरू केले होते. शोरमध्ये Khan Badshah नावाचे एक पात्र होते, जे प्राण साहेबांनी साकारावे अशी मनोज कुमार यांची इच्छा होती. म्हणून एके दिवशी, ते त्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी प्राण साहेबांकडे आले. प्राण साहेबांनी त्यांचे म्हणणे पूर्णपणे ऐकले आणि मग अत्यंत नम्रपणे खान बादशाहची भूमिका साकारण्यास नकार दिला. प्राण साहेब मनोज कुमार यांना म्हणाले, “जर प्रकाश मेहरा यांनी जंजीर बनवण्याचा विचार सोडून दिला, तरच मी तुमच्या चित्रपटात काम करू शकेन. आणि ते कधीच होणार नाही.” तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की Pran साहेबांना Manoj Kumar यांच्या Shor चित्रपटात काम का करायचे नव्हते. याचे कारण असे की, Zanjeer मधील Sher Khan आणि मनोज कुमार यांच्या शोरमधील Khan Badshah ही पात्रे जवळपास एकसारखीच, म्हणजे पठाणी बाज असलेली होती. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये हुबेहूब एकच पात्र साकारणे प्राण साहेबांच्या व्यावसायिक प्रामाणिकतेला आणि कलेशी असलेल्या निष्ठेला योग्य ...

Padosan: The Song Mehmood Rejected Became a Timeless Bollywood Classic

  Some of Bollywood’s greatest songs have fascinating stories behind their creation, and “Mere Samne Wali Khidki Mein” from the 1968 comedy classic Padosan is one of them. Today, the song is considered one of the most loved romantic-comedy tracks in Hindi cinema, but surprisingly, producer and actor Mehmood initially disliked it. Padosan , starring Sunil Dutt, Saira Banu, Mehmood, and Kishore Kumar, remains one of Bollywood’s most iconic comedy films. During the music sessions, lyricist Rajendra Krishan and music director R.D. Burman worked on a light-hearted song for a key romantic sequence. Burman composed the tune in Raag Bhairavi and created a demo version that he believed perfectly suited the film. However, when Mehmood heard the composition, he was unconvinced. He felt the tune sounded too simple for such an important moment in the movie and instructed the team not to record it until further changes were made. Disappointed by the reaction, R.D. Burman reportedly crumpled up ...