Rajesh Khanna : राजेश खन्नाचे पडद्यावर न आलेले चित्रपट
मी कायमच म्हणतोय, काही ना काही कारणास्तव पडद्यावर न आलेल्या चित्रपटांपैकी अर्धे चित्रपट जरी पूर्ण झाले असते तर चित्रपटसृष्टीच्या इतिहासाने वेगळे वळण घेतले असते. प्रत्येक कलाकाराच्या प्रगती पुस्तकात असे निर्मितीच्या अधेमधे बंद पडलेले चित्रपट अनेक. त्यावर एकादे भरपूर माहिती आणि मनोरंजनाची छान खिचडी असलेले दुर्मिळ फोटोसहचे एखादं पुस्तक, शो, वेबसिरीज नक्कीच बनेल. Rajesh Khanna यांचे पडद्यावर न आलेले चित्रपट फारच कुतुहल वाढवणारे. Shakti Samanta दिग्दर्शित Aradhana (१९६९) प्रदर्शित व्हायच्या बरोब्बर एक महिना अगोदर Mohan Kumar दिग्दर्शित Prayaschit या नावाच्या राजेश खन्नाची भूमिका असलेल्या चित्रपटाचा मुहूर्त झाला, नायिका होती Sadhana.
Aradhana, Do Raaste हे चित्रपट सुपर डुपर हिट ठरले आणि Rajesh Khanna यांचा झंझावात सुरू झाला आणि राजेश खन्ना असा आणि इतका बिझी झाला की त्याच्याकडे Prayaschit या चित्रपटासाठी तारखाच नव्हत्या आणि त्यातच तो चित्रपट डब्यात गेला. …राजेश खन्ना जबरदस्त फाॅर्मात असताना साधना हिचे पती R. K. Nayyar यांनी त्याला Gurkha Jung Bahadur या चित्रपटात नायक म्हणून साईन केले, जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या मुहूर्ताच्या जंगी पार्टीला Dimple Kapadiaही हजर होती. या मुहूर्ताला भरभरुन कव्हरेज मिळाले, चित्रपट मात्र बंद पडला.
Rajesh Khannaच्या १८ जुलै या स्मृतीदिनानिमित्त असे काही त्याचे पडद्यावर न आलेले चित्रपट सांगावेसे वाटते. असाच त्याचा पडद्यावर न येऊनही फारच गाजलेला चित्रपट Majnoon. या मुहूर्ताची आठवण वेगळीच. हा रस्ता मजनूनच्या मुहूर्ताकडे जातो… वांद्रे रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडे उतरताच समोर असं भलं मोठं होर्डींग्स लक्ष वेधून घेते आणि Mehboob Studioत जाईपर्यंत अधेमधे हेच सांगणारी होर्डींग्स/बॅनर्स/पोस्टर. १९७९ ची ही गोष्ट. मजनूनचा निर्माता तोच होता. Kamal Amrohi दिग्दर्शक आणि Rakhee Gulzar नायिका. कमाल अमरोही चित्रपट व्यवसायातील बडे प्रस्थ. मेहबूब स्टुडिओत मुहूर्तासाठी भला मोठा सेट लागलेला. राजेश खन्नाचा वाढदिवस आणि मजनूनचा मुहूर्त असा हा दुहेरी सुखद योग. भव्य मुहूर्तावरच मजनूनची प्रगती थांबली ती कायमचीच. YouTubeवर हा मुहूर्त पाह्यला मिळतोय.
दिग्दर्शक Manmohan Desaiंचाही Bajirao Mastani (१९७८) हा बिग बजेट चित्रपट होता. त्यात Rajesh Khanna रोमॅन्टीक हीरो. अर्थात Bajirao व Hema Malini Mastani. परफेक्ट कास्टिंग. ट्रेड पेपर्समध्ये दोन पाने मोठी जाहिरात. हा चित्रपट तरी पडद्यावर यायला हवा होता. मनजी यांचा तो वेगळा चित्रपट ठरला असता. या 70 MM महामनोरंजक ऐतिहासिक चित्रपटात Kashibai कोण असती? Rekha? काय हरकत होती? चित्रपटाच्या जगात काहीही घडू बिघडू शकते यावर एकदा का विश्वास बसला की अनेक गोष्टींचा धक्का बसत नाही. राजेश खन्ना आणि James Bond असेच समीकरण. न पटणारे. आणि न जमलेले. राजेश खन्नाची रोमँटिक इमेज, पर्सनालीटी आणि देहबोली बॉण्ड साकारु शकतो का? कदाचित जमलंही असतं, कदाचित फसलंही असते. Rajesh Khanna 007 या चित्रपटाच्या मुहूर्त दृश्यात तो गाडीतून येत हवेत पिस्तूल चालवतो आणि नायिका Padmini Kapila त्याला छान बिलगते असे दृश्य चित्रीत झाले. ही पद्मिनी कपिला कुठे गायब झाली काय माहित? या चित्रपटाचे दिग्दर्शक Narendra Bedi करणार होता.
Rajesh Khannaच्या पडद्यावर न आलेल्या चित्रपटांबद्दल सांगावं तेवढं थोडंच. काही नावे सांगायची तर, B. R. Chopra दिग्दर्शित Sohni Mahiwal (नायिका Neetu Singh), Prakash Mehra दिग्दर्शित Jaadugar (यात राजेश खन्नासोबत Shatrughan Sinha, Zeenat Aman, Sarika आणि Pran) याची ट्रेड पेपरमध्ये भली मोठी जाहिरात आली. पुढे प्रगती इतकीच की, प्रकाश मेहरा स्टार कास्ट बदलून जादुगर पडद्यावर आणला आणि त्या काळातील अमिताभचा तो अपयशी चित्रपट ठरला. प्रकाश मेहरा दिग्दर्शित Kayar (जोडीला Hema Malini व Sanjay Khan), हा चित्रपट तरी पडद्यावर यायला हवा होता. दिग्दर्शक प्रकाश मेहरा व राजेश खन्ना कधीच एकत्र आले नाहीत हेही विशेषच.
Ramesh दिग्दर्शित Naka, Mohan Kumar दिग्दर्शित Apradhi (नायिका Shabana Azmi), Manoj Kumar अभिनित व दिग्दर्शित Naya Bharat (या चित्रपटाची पटकथा व संवाद Salim-Javedचे होते), Suresh Grover दिग्दर्शित Aap Ke Kabil, Shammi Kapoor दिग्दर्शित Pyaas (शम्मी कपूर दिग्दर्शित Bundal Baaz First Day First Showलाच कोसळल्याने प्यास बनला नसावा.)
K. Hussain दिग्दर्शित 6 December Love Story (जोडीला Jackie Shroff, Neha Dhupia. हा खूप नंतरचा चित्रपट.), B. R. Chopra दिग्दर्शित Purush (नायिका Shabana Azmi), Vimal Chaddha दिग्दर्शित Sahib, Ramanand Sagar दिग्दर्शित Angara (नायिका शबाना), Chetan Anand दिग्दर्शित Sandhya Kal (नायिका Rakhee), Surendra Mohan दिग्दर्शित Wapsi (नायिका राखी व Zeenat), वगैरे आणखीन काही. यात एक चित्रपट मला विशेष वाटतोय, Seema. १९६८ साली म्हणजे Rajesh Khanna यांच्या कारकिर्दीचा सुरुवातीचा काळ. चित्रपटात Meena Kumari व Shashi Kapoor. या चित्रपटातील फोटो त्या काळात प्रसिद्ध होत राहिले. पण हा चित्रपट आलाच नाही. राजेश खन्नाचा Shabana Azmiसोबतचा Agyat या नावाचाही चित्रपट होता. ट्रेड पेपर्समधील जाहिरात आणि मुहूर्ताची पार्टी एवढीच त्या चित्रपटाची प्रगती.
this blog was originally published on https://kalakrutimedia.com/rajesh-khannas-unreleased-films/
Comments
Post a Comment