Posts

Showing posts with the label Kalakruti Media

Hrishikesh Mukherjee : ऋषिकेश मुखर्जी यांचा ‘आशीर्वाद’

Image
  काही चित्रपट जबरदस्त कथानक घेवून आलेले असतात. त्यातील कलावंतांचा अभिनय अतिशय वरच्या दर्जाचा असतो. एवढेच नाही तर आशा चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार प्राप्त होतो पण व्यावसायिक पातळीवर या सिनेमाला अजिबात यश मिळत नाही.  (Hrishikesh Mukherjee) Hrishikesh Mukherjee  दिग्दर्शित  Aashirwad  हा 1968 साली प्रदर्शित झालेला सिनेमा याच कॅटेगिरीत मोडतो. ‘आशीर्वाद’ हा केवळ एक चित्रपट नसून, मानवी नात्यांच्या अथांग शोकांतिकेचे एका बापाच्या डोळ्यांतून टिपलेले अत्यंत तरल आणि हृदयद्रावक महाकाव्य आहे. ऋषिकेश मुखर्जी यांनी सरंजामशाहीची क्रूरता, सामाजिक विषमता आणि त्या सगळ्यात होरपळून निघणाऱ्या एका हळव्या कवी मनाच्या पित्याचे दुःख पडद्यावर असे काही साकारले आहे, की तो पाहताना प्रेक्षकांचे काळीज प्रत्येक दृश्यागणिक पिळवटून निघते. या चित्रपटाचा आत्मा पूर्णपणे  Ashok Kumar  यांच्या बहुरूपी, विलक्षण आणि मनाचा ठाव घेणाऱ्या अभिनयावर आणि  Vasant Desai  यांच्या संगीतावर आधारीत आहे. अशोक कुमार यांच्या स्वरातील  Rail Gaadi...