‘Bigg Boss’ शो ची कॉन्सेप्ट नेमकी आली तरी कुठून? कसा बनला भारताचा सर्वाधिक हिट शो?
भारतातील टेलिव्हिजनवर रिअॅलिटी शोजची क्रेझ नेहमीच जबरदस्त राहिली आहे. पण जर सर्वाधिक लोकप्रिय शो कोणता असा प्रश्न विचारला, तर एकच नाव समोर येतं ते म्हणजे ‘बिग बॉस’. प्रेक्षक दरवर्षी याच्या नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र, अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की हा शो भारतात नेमका कधी सुरु झाला, त्याचं कॉन्सेप्ट कुठून आलं आणि यशाचं रहस्य नेमकं काय आहे? खरं तर, ‘बिग बॉस’ हा कुठलाही ओरिजनल भारतीय शो नाही. हा शो ब्रिटिश रिअॅलिटी शो ‘बिग ब्रदर’ वर आधारित आहे. ‘बिग ब्रदर’ हा शो १९९७ मध्ये ब्रिटिश निर्माता जॉन डी मोल यांनी तयार केला होता. त्यामागचा उद्देश साधा होता की, लोकांना सेलिब्रिटींचं खरं जीवन, त्यांच्या नातेसंबंधातील चढउतार, वादविवाद आणि नाट्य थेट टीव्हीवर पाहता यावं. (Bigg Boss Reality Show) Bollywood Tadka या शोची प्रेरणा जॉर्ज ऑरवेल यांच्या प्रसिद्ध कादंबरी ‘नाइन्टीन एटी-फोर’ मधून घेतली गेली होती. त्या पुस्तकात एका तानाशाही जगाची कल्पना मांडली आहे, जिथे प्रत्येक व्यक्तीवर सतत नजर ठेवली जाते. ह्याच संकल्पनेतून ‘बिग ब्रदर’ शोचा जन्म झाला. सन २००० मध्ये ‘बिग ब्रदर’ प्रथम...