Maharashtrachi Hasyajatra टीमचा गोविंदा आला रे…!

 महाराष्ट्राचा लाडका विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) नेहमीच प्रेक्षकांना हसवत असतो, पण यावेळी या टीमने सेटवर एक वेगळीच धमाल उडवली. दहीहंडीचा उत्साह आणि जल्लोष एकत्र साजरा करताना कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. या उत्साहात सामील होण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमने आपल्या शूटिंगच्या सेटवरच एक छोटीशी पण धमाकेदार दहीहंडी आयोजित केली.(Maharashtrachi Hasyajatra Dahihandi)

नेहमीच आपापल्या विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे प्रियदर्शनी इंदलकर, शिवली परब, समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, निखिल बने, मंदार मांडवकर, चेतना भट, ऐशा डे, दत्तू मोरे, नम्रता संभेराव आणि इतर सर्व कलाकार पारंपरिक गोविंदाच्या वेशात थिरकताना दिसले. सेटवरील वातावरण एखाद्या मोठ्या दहीहंडी उत्सवापेक्षा कमी नव्हते. डीजेच्या गाण्यांच्या तालावर कलाकार धमाल नाचत होते. स्वतः प्रभाकर मोरे, श्याम राजपूत, विराज जगताप, वनिता खरात, अरुण कदम आणि रसिक वेंगुर्लेकर यांनी दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत एकमेकांचे मनोबल वाढवले. Entertainment mix masala

अखेर दहीहंडी फोडण्याचा मान दत्तू मोरे यांच्या वाट्याला आला. प्रभाकर मोरे यांनी येणी घालून या उत्सवाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे लेखक आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांनीही या आनंद सोहळ्यात सहभागी होत कार्यक्रमाला रंगत आणली. शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून संपूर्ण टीमने एकत्र येत सण साजरा केला. त्यांच्या या आनंदी क्षणांनी प्रेक्षकांसाठी एक खास पर्वणी निर्माण केली. दहीकाल्याच्या गाण्यांवर कलाकार थिरकले, दहीहंडी फोडून जल्लोष साजरा केला आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ च्या नवीन सीझनचे निमंत्रण दिले.

=============================

हे देखील वाचा: Nashibvan Serial: बाजीप्रभू साकारणाऱ्या अभिनेत्याचे तब्बल सहा वर्षांनंतर मालिकाविश्वात खलनायक म्हणून कमबॅक!

==============================

या सोहळ्याने सिद्ध केले की, सोनी मराठी आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ची टीम केवळ पडद्यावरच नाही, तर पडद्यामागेही एक मोठी, एकत्रित आणि आनंदी ‘फॅमिली’ आहे. त्यांच्या या उत्स्फूर्त आनंदाने प्रेक्षकांनीही भरभरून कौतुक केले. हा धमाल आणि मस्तीचा अविस्मरणीय सोहळा प्रेक्षकांनीही तितकाच एन्जॉय केला आणि पुढील भागांसाठी उत्सुकता वाढवली आहे हे नक्की. Bollywood masala

Original content is posted on https://kalakrutimedia.com/maharashtrachi-hasyajatra-team-celebrates-dahi-handi-with-full-festive-spirit-info/











Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

आता मी हिंदीत बोलू?”; मराठीत बोलत असतानाच Kajol का भडकली?