आता मी हिंदीत बोलू?”; मराठीत बोलत असतानाच Kajol का भडकली?
हिंदी चित्रपटसृष्टीत ३० वर्षांपेक्षा अधिक काळ विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या पद्मश्री काजोल (Kajol) हिला नुकताच महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे काजोलला तिच्या वाढदिवशी ५ ऑगस्टलाच हा मोठा पुरस्कार प्रदान करण्यात आला… यावेळी काजोलने माध्यमांशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचवेळी जेव्हा तिला हिंदीतून प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर ती भडकली अन् म्हणाली, “अब मैं हिंदी में बोलो??? जिसको समझना है, वो समझ लेंगे.” नक्की काय घडलं? (Bollywood News) Bollywood Tadka
यावेळी माध्यमांशी बोलताना काजोल म्हणाली की,”हा पुरस्कार मला या (वाढदिवसाच्या दिवशी) दिवशी भेटतोय. माझ्यासाठी हा मोठा दिवस आहे. माझ्यासोबत आज माझी आई देखील आली आहे आणि तिलाही हा पुरस्कार आधी मिळाला होता. त्यामुळे ही माझ्यासाठी देखील फार महत्वाची गोष्ट आहे.”(Actress Tanuja)
मराठीत आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर काजोलला एका प्रतिनिधीने हिंदीत बोला असं म्हटलं. त्यावर काजोलचा पारा चढला. त्यावर तिने हिंदीतूनच त्याला उत्तर दिले. “आता मी हिंदीत बोलू? ज्यांना समजून घ्यायचं असेल, ते समजून घेतील (अब मैं हिंदी में बोलू??? जिसको समझना है, वो समझ लेंगे)”, असं थेट उत्तर देत तिने हिंदीत बोलण्यास नकार दिला.
तसेच, यावेळी काजोलला मराठी चित्रपटात भविष्यात तिला काम करण्याची संधी मिळाली तर ती काम करणार का असं विचारलं असता काजोल म्हणाली, “नक्कीच मी काम करेन. त्याबद्दल शंका नाही. मला तशी पटकथा मिळाली तर मी काम करेनच.”(Entertainment News Tadaka)
================================
हे देखील वाचा : ‘या’ कारणामुळे काजोलने नाकारला चक्क मणीरत्नमचा चित्रपट!
=================================
दरम्यान, काजोल हिचा नुकताच ‘माँ’ आणि ‘सरजमीन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता… याशिवाय आजवर काजोलने ‘बेखुदी’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘गुप्त’, ‘इश्क’, ‘फना’, ‘कुछ कुछ होता है’, ‘तानाजी’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये तिने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत…तसेच, लवकरच तिने मराठी चित्रपटात दमदार भूमिका साकारावी अशी प्रेक्षकांनी केलेली अपेक्षा कधी पुर्ण होणार याकजे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे… (Kajol Movies) Bollywood Masala
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi
Original Content is posted on https://kalakrutimedia.com/abhi-main-hindi-mein-bolun-irked-kajol-snaps-at-reporter-asking-her-to-translate-her-marathi-responses/
Comments
Post a Comment