‘Bigg Boss’ शो ची कॉन्सेप्ट नेमकी आली तरी कुठून? कसा बनला भारताचा सर्वाधिक हिट शो?
भारतातील टेलिव्हिजनवर रिअॅलिटी शोजची क्रेझ नेहमीच जबरदस्त राहिली आहे. पण जर सर्वाधिक लोकप्रिय शो कोणता असा प्रश्न विचारला, तर एकच नाव समोर येतं ते म्हणजे ‘बिग बॉस’. प्रेक्षक दरवर्षी याच्या नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र, अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की हा शो भारतात नेमका कधी सुरु झाला, त्याचं कॉन्सेप्ट कुठून आलं आणि यशाचं रहस्य नेमकं काय आहे? खरं तर, ‘बिग बॉस’ हा कुठलाही ओरिजनल भारतीय शो नाही. हा शो ब्रिटिश रिअॅलिटी शो ‘बिग ब्रदर’ वर आधारित आहे. ‘बिग ब्रदर’ हा शो १९९७ मध्ये ब्रिटिश निर्माता जॉन डी मोल यांनी तयार केला होता. त्यामागचा उद्देश साधा होता की, लोकांना सेलिब्रिटींचं खरं जीवन, त्यांच्या नातेसंबंधातील चढउतार, वादविवाद आणि नाट्य थेट टीव्हीवर पाहता यावं. (Bigg Boss Reality Show) Bollywood Tadka
या शोची प्रेरणा जॉर्ज ऑरवेल यांच्या प्रसिद्ध कादंबरी ‘नाइन्टीन एटी-फोर’ मधून घेतली गेली होती. त्या पुस्तकात एका तानाशाही जगाची कल्पना मांडली आहे, जिथे प्रत्येक व्यक्तीवर सतत नजर ठेवली जाते. ह्याच संकल्पनेतून ‘बिग ब्रदर’ शोचा जन्म झाला. सन २००० मध्ये ‘बिग ब्रदर’ प्रथम यूकेच्या चॅनल ४ वर प्रसारित झाला. त्याचं वेड एवढं वाढलं की लोकांनी तो शो २४ तास लाईव्ह पाहायला सुरुवात केली. नंतर या शोने अनेक देशांत आपली पायाभरणी केली.
भारतामध्ये ‘बिग बॉस’चा पहिला सीझन २००६ मध्ये सोनी टीव्हीवर दाखल झाला. त्या वेळी अभिनेता अरशद वारसी हा होस्ट होता, आणि विजेता ठरला अभिनेता राहुल रॉय. त्यानंतर शो ‘कलर्स टीव्ही’वर शिफ्ट झाला आणि इथूनच ‘बिग बॉस’ची लोकप्रियता प्रचंड वाढली. या शोचं सूत्रसंचालन आतापर्यंत अनेक दिग्गजांनी केलं आहे. अरशद वारसी, शिल्पा शेट्टी, अमिताभ बच्चन, फराह खान, करण जोहर, अनिल कपूर. मात्र, ‘बिग बॉस’ला खरी ओळख आणि प्रचंड लोकप्रियता मिळाली ती सलमान खानमुळे. सलमानने सूत्रसंचालन हाती घेतल्यापासून हा शो केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम राहिला नाही, तर भारतीय टीव्ही इतिहासातील सर्वात मोठ्या रिअॅलिटी शोमध्ये गणला जाऊ लागला.(Bigg Boss Reality Show)
==============================
हे देखील वाचा: Priya Marathe Death: ‘देव अशी चांगली माणसं का नेतो,’ प्राजक्ता माळी प्रियाबद्दल नेमकं काय म्हणाली?
==============================
आज ‘बिग बॉस’ हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर ड्रामा, इमोशन, मजा आणि थ्रिलने भरलेला अनुभव आहे. प्रत्येक सीझननंतर प्रेक्षक या शोमध्ये गुंतले जातात आणि पुढच्या सीझनची उत्सुकतेने वाट पाहतात. त्यामुळे ‘बिग बॉस’ची क्रेझ आजही कमी झालेली नाही, उलट दरवर्षी त्याची लोकप्रियता अधिकाधिक वाढताना दिसते. Bollywood Masala
Original content is posted on https://kalakrutimedia.com/bigg-boss-origin-where-did-the-shows-concept-come-from-and-how-it-became-indias-most-popular-reality-show-info/
Comments
Post a Comment