सहजीवनाची चटकदार ‘पाणीपुरी’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

 

चित्रपटाचं लाजवाब कथानक हे त्याचं ‘युएसपी’ असतंच पण त्याच्या साथीला कलाकारांच्या नव्या जोड्या  हा रंगतदार चौफेर विषय. आगामी पाणीपुरी या मराठी चित्रपटात तब्बल एक नाही तर चार नव्या जोड्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येणार आहेत. वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून सातत्याने नवं करू पाहणारा अभिनेता कैलास वाघमारे त्याच्या जोडीला ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री शिवाली परबआपल्या विनोदाच्या भन्नाट टायमिंगने  रसिकांना खळखळून हसवणारे अभिनेते भारत गणेशपुरे-प्राजक्ता हनमघरबिनधास्त आणि मिश्किल स्वभावाने आपली प्रत्येक भूमिका गाजवणारे ऋषिकेश जोशी त्यांच्या जोडीला ब्युटीफुल अभिनेत्री  प्रतीक्षा जाधव  सोबत सचिन बांगर-अनुष्का पिंपूटकर हे दोन  नवे तरुण  चेहरे यात  धमाल करणार आहेतया  जोड्यांच्या सोबतीला अभिनेता मकरंद देशपांडेसायली संजीवविशाखा सुभेदार हे अनुभवी कलाकार कथेत जबरदस्त रंग भरणार आहेत.(Paanipuri Marathi Movie 2024) Bollywood masala


एस.के प्रॉडक्शन निर्मित आणि रमेश चौधरी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला ‘पाणीपुरी’ चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. संजीवकुमार अग्रवाल या चित्रपटाचे निर्माते आहेत तर सहनिर्माते चंद्रकांत ठक्करअनिकेत अग्रवाल आहेत.या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणाऱ्या या कलाकारांची पडद्यावरील नवी केमिस्ट्री प्रेक्षकांसाठी नक्कीच मनोरंजक ठरेलपाणीपुरी’ चित्रपटाचा मजेशीर टिझर नुकताच प्रदर्शित झालानर्म विनोदीखेळकर पद्धतीने जीवनदर्शन घडवत या जोड्यांच्या प्रेमाची परिणीतीत्यांचा प्रवास भविष्यामध्ये कशाप्रकारे होतो याची गमतीशीर कथा म्हणजे पाणीपुरी चित्रपट.


आयुष्याचा समतोल साधायचा असेल तर असे दोन परस्परविरुध्द, भिन्न स्वभावाची व्यक्तिमत्त्वं एकत्र असणं ही देखील सहजीवनाची गरज असते. सहजीवनाची ही गंमत उलगडणारालज्जतदार नात्यांची चटकदार गोष्टसांगणारापाणीपुरीचित्रपट आपलं मनोरंजन नक्की करणार आहे. चित्रपटाचे छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. (Paanipuri Marathi Movie 2024)

==============================

हे देखील वाचा: ‘गुलाबीशहरात सुरु होणार नव्या मैत्रीचा प्रवास; ‘गुलाबीचा धमाल टिझर प्रदर्शित

==============================

पटकथा-संवाद संजय नवगिरे यांनी लिहिले आहेत. संगीत अजित परब तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. गीतकार मंदार चोळकर यांच्या गीतांना गायक मंदार आपटे, अजित परब यांचे स्वर लाभले आहेत. ‘पाणीपुरी१५ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. Bollywood Tadka

 Original content is posted on https://kalakrutimedia.com/panipuri-marathi-movie-is-all-set-to-hit-the-screens-info/





Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते