Pintu Ki Pappi चित्रपटात सुप्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्य साकारणार महत्त्वाची भूमिका

 




Pintu Ki Pappi Movie: सिनेसृष्टीत सध्या कॉमेडी चित्रपट धुमाकूळ घालताना पहायाला मिळत आहेत. अशातच आता आणखी एक बॉलिवूड चित्रपट धुमाकूळ घालण्यास आता सज्ज होत आहे. ‘पिंटू की पप्पी’ असे या चित्रपटाचे नाव असून हा चित्रपट बॉलिवूड विश्वात धुमाकूळ घालायला आता सज्ज होत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि अगदी उत्तम असा प्रतिसाद ही या चित्रपटाला मिळालेला पाहायला मिळाला. ट्रेलरबरोबरच या चित्रपटातील गाण्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. नुकतीच या चित्रपटाची पत्रकार परिषद पुणे येथे संपन्न झाली. यावेळी चित्रपटातील कलाकारांनी पुणे येथील पत्रकारांशी संवाद साधला. सध्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन ही सर्वत्र सुरू असल्याचंही पाहायला मिळत आहे.(Pintu Ki Pappi Movie)

Pintu Ki Pappi Movie

सुप्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्य (Ganesh Acharya) यांनी या चित्रपटात साकारलेली महत्त्वाची भूमिका लक्षवेधी असणार आहे. ‘पिंटू की पप्पी’, हा या वर्षातील बहुप्रतिक्षित रोमँटिक कॉमेडी चित्रपट ट्रेलर रिलीजपासूनच प्रेक्षकांमध्ये धुमाकूळ घालत आहे. ‘V2S प्रॉडक्शन आणि एंटरटेनमेंट’च्या या चित्रपटाला विधी आचार्य यांची निर्मिती आहे. तर लेखक, दिग्दर्शक म्हणून शिव हरे यांनी बाजू सांभाळली आहे.

===================================

हे देखील वाचा: Star Pravahकडून महिला दिनाची विशेष भेट; टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच रंगणार अद्भुतपूर्व ‘महासंगम महानायिकांचा’ !

===================================

चित्रपटामध्ये गणेश आचार्य (Ganesh Acharya) यांच्यासह विजय राज, मुरली शर्मा, सुनील पाल, अली असगर, पूजा बॅनर्जी, अदिती संवाल, रिया एस सोनी, उर्वशी चौहान, प्यूमोरी मेहता दास, मुक्तेश्वर ओझा अशा दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. शिव हरे यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट सिनेसृष्टीत एक हास्याची उमेद घेऊन येणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमुळे आता या सिनेमाची उत्सुकता ही प्रेक्षकांना लागूं राहिली आहे. २१ मार्च २०२५ रोजी हा ‘पिंटू की पप्पी’ चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे. Bollywood Tadka.

Original content is posted on : https://kalakrutimedia.com/famous-choreographer-ganesh-acharya-plays-an-important-role-in-pintu-ki-pappi-info/


Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते