अमिताभ बच्चन आणि नसिरुद्दीन शहा आजवर एकत्र सिनेमात का आले नाही ?

 अमिताभ बच्चन आणि नसिरुद्दीन शहा आजवर एकत्र सिनेमात का आले नाही ?

अमिताभ बच्चन आणि नसिरुद्दीन शहा बॉलीवूड चे दोन महान कलाकार.  एक कमर्शियल सिनेमाचा शहेनशहा तर दुसरा आर्ट  फिल्म चा आयकॉनिक ऍक्टर. या दोन कलाकारांनी आजवर कधीच एकत्र काम केलेले नाही आणि भविष्यात एकत्र काम करण्याची सुतराम शक्यता नाही! या दोघांना घेऊन एखादा चित्रपट करावा असे कुणा निर्मात्याला ही कधी वाटले नाही. नासिर ने काही कमर्शियल सिनेमे नक्कीच केले. अमिताभ बच्चन यांनी देखील काही आर्ट फिल्म्स केल्या.  पण या दोघांचं करिअर समांतरच राहिले! अमिताभ बच्चन कधीच कोणत्याही कलाकारावर आपत्ती जनक टिप्पणी करत नाही.  अमिताभ नेहमीच एका स्टॅंडर्ड उंचीवर राहून लाईम लाईट मध्ये  वावरत असतो.  या उलट नसिरुद्दीन शहा ने एकदा एका मुलाखतीत अमिताभ बच्चन आणि त्याच्या चित्रपटावर भरपूर टीका केली होती. या मुलाखतीत त्याने अमिताभ बच्चन काही महान कलाकार महान वगैरे कलाकार नाहीत  असे जाहीर पणे सांगितले होते.  

तो केवळ स्टंट मन एक बिझनेसमन आहे आणि त्या पद्धतीने तो या व्यवसायात आलेला आहे असे  उदगार देखील काढले.  याच मुलाखतीत नसरुद्दीन शहा यांनी ‘शोले’  हा काही फार ग्रेट वगैरे मूवी नाही असे सांगितले. ती केवळ  एंटरटेनर मूवी आहे असे सांगितले.  हाच निकष लावायचा तर दारासिंग चे सगळे सिनेमे एन्टरटेनमेंट करायचे त्याच लेव्हलचा शोले हा चित्रपट आहे.  मेहमूद चा ‘साधू और शैतान’  हा चित्रपट देखील मनोरंजन करतो.  शोले त्याच लेव्हलचा चित्रपट आहे.  या मुलाखतीवर समाजातील सर्व स्तरा तून  तसेच बॉलिवूडमधील मान्यवरांनी भरपूर टीका केली होती.  नासीरने अशा पद्धतीचे बोलायला नको होतं असे सर्वांचे मत होते.  अमिताभ बच्चन मात्र या संपूर्ण मुलाखतीनंतर शांत राहिले. एवढी वैयक्तिक टीका झाल्यावर  त्यांनी कधीच कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही.  पण नासिर यांच्या या मुलाखती ने  ते  नक्कीच दुखावले होते.  एका सिनेमात मात्र नासिर ला काढून तिथे अमिताभ बच्चन ल कास्ट केले होते.

२००२ साली संजय गुप्ता ‘कांटे’  नावाचा एक चित्रपट बनवत होते.  या सिनेमात नसिरुद्दीन शहा ,  सुनील शेट्टी ,कुमार गौरव, लकी अली, संजय दत्त यांच्या भूमिका होत्या.  एका पार्टीत संजय गुप्ता यांची अमिताभ बच्चन यांची भेट झाली असताना अमिताभ ने सहज संजय गुप्तांना सांगितले की ,”कांटे या चित्रपटात मला काम करायला आवडेल!”  संजय गुप्ता प्रचंड खूष झाले. सुपरस्टार स्वतःहून आपल्या चित्रपटात काम करायला उत्सुक आहे हे ऐकल्यानंतर त्यांनी ताबडतोब सिनेमाची स्टार कास्ट बदलली आणि नसरुद्दीन शहा यांच्या जागी अमिताभ बच्चन यांची वर्णी लागली.  प्रतिक्रिया देऊन आपली वाचाळता सिद्ध करण्यापेक्षा शांतपणे काम करून योग्य उत्तर देणे हे अमिताभ बच्चन यांना चांगली जमते.  नसरुद्दीन शहा यांच्यासोबत अमिताभ बच्चन यांनी काम जरी केलं नसलं तरी त्याच्या जलवा आणि हिरो हिराला या दोन श्रीमात त्यांनी कॅमिओ रोल केला आहे.

काँटे’ हा चित्रपट क्वेंटिन टॅरँटिनोच्या ‘रेझर्व्हॉयर डॉग्ज’ (१९९२) या चित्रपटावर , तसेच त्या चित्रपटाला प्रेरणा देणाऱ्या रिंगो लॅमच्या ‘सिटी ऑन फायर’ (१९८७) या चित्रपटावर  मोठ्या प्रमाणावर प्रेरित होता. लॉस एंजेलिसमध्ये संपूर्णपणे चित्रित झालेला हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट होता. या चित्रपटाच्या निर्मिती करिता  हॉलिवूडमधील तंत्रज्ञांची मदत घेतली होती. या चित्रपटाचे चित्रीकरण ३५ दिवसांत पूर्ण झाले.

‘काँटे’ हा चित्रपट २० डिसेंबर २००२ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेल्या ‘साथिया’ या दुसऱ्या एका चित्रपटाशी स्पर्धा असूनही, ‘काँटे’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला; या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात भारतात १.८ दशलक्ष रुपये , अमेरिकेत जवळपास १ दशलक्ष डॉलर्स आणि ब्रिटनमध्ये २,६८,५०७ पौंड इतकी कमाई केली.या चित्रपटाची जगभरातील एकूण अंतिम कमाई ४३० दशलक्ष रुपये इतकी होती.

२००७ मध्ये आलेल्या ‘एकलव्य’ चित्रपटात नासिर आणि अमिताभ एकत्र दिसणार असल्याची चर्चा होती. मात्र, काही कारणास्तव नसीरुद्दीन शाह यांनी या चित्रपटात काम केले नाही आणि ती भूमिका पुढे बोमन इराणी यांनी साकारली. जर त्यांनी हा चित्रपट केला असता, तर पहिल्यांदाच हे दोन दिग्गज पडद्यावर एकत्र दिसले असते.

thsi blog was originally published on https://kalakrutimedia.com/naseeruddin-shah-and-amitabh-bachchan/

Comments

Popular posts from this blog

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे साठ कोटी

Sant Dnyaneshwaranchi Muktai: ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला ज्ञानेश्वरीचा सुरेल सोहळा !

आता मी हिंदीत बोलू?”; मराठीत बोलत असतानाच Kajol का भडकली?