Baapya Movie Review : नाकारण्यापासून ते स्विकारण्यापर्यंतचा प्रवास

 मराठी सिनेमा हा कायमच नवनवीन, धाडसी विषयांना हात घालण्यासाठी ओळखला जातो. याच कडीत दिग्दर्शक समीर तिवारी यांचा Baapya Movie एक अत्यंत महत्त्वाचा व संवेदनशील विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कोकणच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही गोष्ट फक्त एका व्यक्तीची, संघर्षाची नाही, तर त्यापलीकडे जाऊन समाज, कुटुंब व मानवी नात्यांच्या मानसिकतेचीही परीक्षा घेणारी आहे. समाजात Tabbo मानल्या जाणाऱ्या अनेक विषयांपैकी एक विषय घेऊन त्यावर मराठीत सिनेमा बनवण्याचं धाडस करण्यासाठी निर्मात्यांचं खास कौतुक करायला हवं!

चित्रपटाची कथा सुरू होते ती, कोकणातल्या एका गावात! शैला (Rajshri Deshpande) जी अनेक वर्षांनी आपल्या गावी परतते, ती थेट ‘शैलश’ बनून! तिचं हे बदललेलं रूप तिच्या कुटूंबाला व संपूर्ण गावालाच थक्क करतं. तिचं बालपण, मनाची अवस्थता, कुटुंबात होणारी भावनिक उलथापालथ आणि या सगळ्यातून स्वतःची ओळख शोधण्याचा व ते अस्तित्व टिकवण्याचा संघर्ष म्हणजे ‘बाप्या’! ‘बाप्या’ हा केवळ एका ‘स्त्री’तील पुरूषाच्या अस्तित्वाचा प्रवास नाही, तर तो समाजातल्या बदलांचा देखील प्रवास आहे. कोकणासारख्या गावात ‘Trans-Men’ सारखा नाजुक विषय घडताना गावातील लोकांची मानसिकता, त्यांचं व्यक्त होणं, त्यात घडणारे विनोद व शेवटी हा बदल स्विकारण्याची सकारात्मक वृत्ती ही संपूर्ण Process फारच रंजक वाटते.

अभिनयाच्या बाबतीत सांगायचं झालं तर,Rajshree Deshpande नी ‘शैला’ व ‘शैलेश’ या दोन्ही पात्रांची मानसिकता, त्यातलं Confusion, वेदना, त्रास, होणारी घालमेल व संयम हे सगळं अप्रतिमरित्या साकारलं आहे. अन्याच्या भूमिकेत Girish Kulkarni यांनी नेहमीप्रमाणे कमाल केली आहे. सुरुवातीचा नकार, राग, त्यातही प्रेम, हळूहळू येणारा Acceptance त्यांनी आपल्या सहज अभिनयातून उत्तमरीत्या रेखाटला आहे. त्यांच्या विनोदाचं टायमिंग ही या चित्रपटाची एक जमेची बाजू म्हणता येईल.‌ कायम खलनायक, पोलिस अशा भूमिका साकारणारे Shrikant Yadav यांनी जीवाला जीव देणा-या ख-या मित्राचं पात्रं कमाल साकारलं‌ आहे. Aryan Mengji याने त्याची भूमिका समजून उमजून साकारली आहे. आपल्या आईचं सत्य समजल्यावर होणारी त्या वयातली मनाची घालमेल, Frustration त्याने कमाल दाखवली आहे. विशेष उल्लेख करावा लागेल, तो ज्येष्ठ अभिनेत्री Varsha Dandale यांचा! सहजसुंदर अभिनय, खास संवादफेक व विनोदाचा अचुक टायमिंग या तिन्हीची योग्य पकड बसल्यामुळे त्यांची छोटीशी भूमिका चित्रपट संपल्यानंतरही आवर्जून लक्षात राहते. बाकी, Renuka Daftardar, Aaryan Mengji, Gauri Kiran, Aananda Karekar या व इतर कलाकारांनीही आपापली कामं चोख केली आहेत.

आता वळूया, सिनेमाच्या तांत्रिक बाबींकडे! दिग्दर्शक Sameer Tiwari यांनी ‘Trans-men’ सारखा नाजूक व गंभीर विषय सादर करताना तो कुठेही मेलोड्रॅमॅटिक न करता त्यात हलकाफुलका विनोद व कमालीची Sensibility यांचा सुरेख मेळ घातला आहे. चित्रपटाची Visual Language अत्यंत श्रीमंत वाटते. Cinemetographer Rio Nandakishore यांनी कोकणची पार्श्वभूमी ज्या पद्धतीने टिपली आहे, ती निव्वळ निसर्गरम्य नाही, तर ती पात्रांच्या मनःस्थितीशीही जोडली जाणारी आहे. विशेषत: एका सीनमध्ये रात्री समुद्राच्या लाटा व शैलेश-अन्याच्या मनातील खळबळ यांचा एक अप्रतिम प्रसंग अतिशय विचारपूर्वक दाखवण्यात आला आहे.

पार्श्वसंगीत हा या चित्रपटाचा मोठा प्लस पॉईंट ठरतो. अनेक गंभीर व भावनिक प्रसंगांत संवादांचा भडिमार करण्यापेक्षा शांततेचा व काही प्रसंगांत नैसर्गिक आवाज जसं की, लाटा, वाऱ्याची झुळूक यांचा केलेला वापर अधिक प्रभावी ठरतो. ‘Transgender’ सारखा अत्यंत संवेदनशील विषय हाताळताना चित्रपट कुठेही Melodramatic होत नसल्यामुळे तो पाहताना कंटाळा येत नाही. भूतकाळ व वर्तमानाचा योग्य मेळ साधल्यामुळे चित्रपटात कुठेही संथपणा जाणवत नाही‌.

काळानुसार बदलाणारे विषय घेऊन त्यावर मराठीत सिनेमा करण्याचा धाडसी प्रयोग या सिनेमाच्या निमित्ताने झाला आहे. चित्रपटाचा शेवट डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहात नाही. ‘बाप’ हा ‘आई’सुद्धा असू शकतो’ हा नवा दृष्टिकोन देणारा ‘बाप्या’ सिनेमागृह जाऊनच पाहायला हवा.


this blog was originally published on https://kalakrutimedia.com/baapya-movie-review-the-journey-from-rejection-to-acceptance/

Comments

Popular posts from this blog

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे साठ कोटी

Sant Dnyaneshwaranchi Muktai: ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला ज्ञानेश्वरीचा सुरेल सोहळा !

आता मी हिंदीत बोलू?”; मराठीत बोलत असतानाच Kajol का भडकली?