50 years of Tumcha Aamcha Jamla: म्हणून लोकांना ‘दादा’ आवडायचे !
Dada Kondke यांचा नवीन चित्रपट प्रदर्शित होतोय तोच पहिल्या शोपासूनच पब्लिककडून त्या चित्रपटाचे उत्स्फूर्त अशा टाळ्या-शिट्ट्यांनी जोरदार स्वागत हे ठरलेलेच. याला स्टारडम (लोकप्रियता) म्हणतात. थिएटरबाहेरचे ब्लॅकमार्केटवालेही (तिकिटाचा काळाबाजार करणारे) Dada कोंडके यांचे पिक्चर कधी येतोय आणि आपल्या धंद्याला बरकत कधी येतेय याची वाट पाहत. असाच त्यांचा त्यांनी दिग्दर्शित केलेला धमाल चित्रपट ‘तुमचं आमचं जमलं’. हा चित्रपट २९ एप्रिल १९७६ रोजी सेन्सॉर संमत झाला आणि लगोलग पुणे शहरात ८ मे १९७६ रोजी सर्वप्रथम अलका टॉकीजमध्ये प्रदर्शित झाला आणि मग टप्प्याटप्प्याने अन्य शहरांमध्ये प्रदर्शित होत गेला आणि सगळीकडे हाऊसफुल्ल गर्दीत यश प्राप्त केले. मुंबईत हा चित्रपट २६ जून रोजी कोहिनूर आणि अन्य चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनास पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. या चित्रपटाची कथा Datta Keshav यांची असून पटकथा आणि संवाद Rajesh Mujumdar यांचे आहेत. या चित्रपटात Dada Kondke यांची नायिका Anjana Mumtaz आहे आणि जोडीला Ashok Saraf ची धमाल भूमिका आहे. पांडू हवालदार (१९७५) च्या खणखणीत यशानंत...