50 years of Tumcha Aamcha Jamla: म्हणून लोकांना ‘दादा’ आवडायचे !
Dada Kondke यांचा नवीन चित्रपट प्रदर्शित होतोय तोच पहिल्या शोपासूनच पब्लिककडून त्या चित्रपटाचे उत्स्फूर्त अशा टाळ्या-शिट्ट्यांनी जोरदार स्वागत हे ठरलेलेच. याला स्टारडम (लोकप्रियता) म्हणतात. थिएटरबाहेरचे ब्लॅकमार्केटवालेही (तिकिटाचा काळाबाजार करणारे) Dada कोंडके यांचे पिक्चर कधी येतोय आणि आपल्या धंद्याला बरकत कधी येतेय याची वाट पाहत. असाच त्यांचा त्यांनी दिग्दर्शित केलेला धमाल चित्रपट ‘तुमचं आमचं जमलं’. हा चित्रपट २९ एप्रिल १९७६ रोजी सेन्सॉर संमत झाला आणि लगोलग पुणे शहरात ८ मे १९७६ रोजी सर्वप्रथम अलका टॉकीजमध्ये प्रदर्शित झाला आणि मग टप्प्याटप्प्याने अन्य शहरांमध्ये प्रदर्शित होत गेला आणि सगळीकडे हाऊसफुल्ल गर्दीत यश प्राप्त केले. मुंबईत हा चित्रपट २६ जून रोजी कोहिनूर आणि अन्य चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनास पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. या चित्रपटाची कथा Datta Keshav यांची असून पटकथा आणि संवाद Rajesh Mujumdar यांचे आहेत. या चित्रपटात Dada Kondke यांची नायिका Anjana Mumtaz आहे आणि जोडीला Ashok Saraf ची धमाल भूमिका आहे. पांडू हवालदार (१९७५) च्या खणखणीत यशानंतरचा हा चित्रपट तरीही यात Usha Chavan नायिका नाही, तर Anjana Mumtaz नायिका हेच केवढे विशेष. Ashok Saraf यांच्या या चित्रपटाबाबत खास आठवणी आहेत. या चित्रपटात ते आणि Dada Kondke भावाभावाच्या भूमिकेत आहेत. एक चांगला अर्थात Dada Kondke आणि एक खलनायक वृत्तीचा अर्थात Ashok Saraf. या चित्रपटात Ashok Saraf एक माकड घेऊन फिरतात. त्या माकडाकडून चोरी करणे हा नस्ता उद्योग. ते या खलनायकाकडून चोरीचे ट्रेनिंग दिलेले माकड होते. चित्रपटात एकाच माकडाची दृश्ये दिसत असली तरी प्रत्यक्षात तीन माकडे होती. पहिल्या दिवशी सेटवर माकड पाहून Ashok Saraf काहीसे दचकले. इंग्रजी चित्रपटात अशा प्राणी-पक्षी यांना दाखवतात त्यांना ट्रेनिंग दिलेले असते आणि सेटवर प्रशिक्षित बसलेले असतात. तुमचं आमचं जमलं च्या सेटवर मदारी होता इतकेच. तो Ashok Saraf यांना म्हणाला, “असा हात पुढे करा, ते माकड आपोआप हातावरून तुमच्या खांद्यावर बसेल.” Ashok Saraf नी त्यानुसार हात पुढे केला आणि खरोखरच ते माकड येऊन Ashok Saraf यांच्या खांद्यावर बसले. यामुळे Ashok Saraf थोडे रिलॅक्स झाले आणि पटकन बोलून गेले, “ए शाब्बास!” ते ऐकताच त्या माकडाने Ashok Saraf यांच्या सणसणीत टपलीत मारली आणि ते निघून गेले. त्याच्या जागी आलेलं दुसरं माकडही असेच पळून गेले. रेल्वे लाईन लगत चित्रीकरण असताना मदारीच्या हातातून ते Ashok Saraf यांच्या खांद्यावर आले पण तेथून ते उडी मारून बाजूच्या झाडीत पळाले. तिसरं माकड Ashok Saraf यांचे डोके खाजवत बसायचे. त्याच्याशी Ashok Saraf यांची हळूहळू ओळख वाढली, त्यांच्यात मैत्री झाली आणि मग या दोघांवरील दृश्ये व्यवस्थित चित्रित होऊ लागली.
‘तुमचं आमचं जमलं’ हा Dada Kondke यांच्या सदिच्छा चित्र निर्मित पहिला रंगीत चित्रपट. त्याबरोबरच आणखी एक विशेष म्हणजे, या चित्रपटापासून Mahendra Kapoor यांच्या पार्श्वगायनात Dada Kondke यांचे रुपेरी पडद्यावरील सादरीकरण अशी जोडी जमली. अर्थात, जमलेली जोडी तुटल्याचं दुःख ती व्यक्तीच जाणे. त्यातही ती जोडी तुटल्याचे उत्तर नसेल तर आणखीनच दुःख होते. Dada Kondke यांच्या ‘सोंगाड्या’मधील ‘माळाच्या माळ्यामधी कोण ग उभी’ व ‘काय ग सखू बोला दाजिबा’ ही गाणी शहरापासून दूर खेड्यापाड्यातून अशी लोकप्रिय झाली आणि Jaywant Kulkarni एकदमच फॉर्ममध्ये आले. Jaywant Kulkarni म्हणजेच Dada Kondke यांचा आवाज असे समीकरण झाले. ‘एकटा जीव सदाशिव’ मधील ‘काल रातीला सपान पडलं’ या Usha Mangeshkar यांच्यासोबत गायलेल्या गाण्याला राज्य शासनाकडून सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक हा पुरस्कार प्राप्त झाला. पण यशाच्या पायऱ्या चढत असतानाच Dada Kondke यांनी Jaywant Kulkarni यांची साथ सोडली. Dada यांनी काहीही विचारपूस न करताच ‘तुमचं आमचं जमलं’ या चित्रपटापासून आपल्याला वगळावे याचे दुःख Jaywant Kulkarni यांनी त्यानंतर आपल्या काही मुलाखतीतून व्यक्त केले. हा आघात ते सहन करू शकले नाहीत, ते आत्मविश्वास गमावून बसले. दोन वर्षे अशीच गेल्यावर हळूहळू ते सावरले. आपल्याबद्दल Dada चे कोणी कान भरले का, कोण असेल ते आणि का तसे केले असेल याचे उत्तर Jaywant Kulkarni यांना कधीच मिळाले नाही. एक जमलेली जोडी मात्र फुटली होती. ‘तुमचं आमचं जमलं’ या चित्रपटाचे कथासूत्र मुंबईतील एका वृत्तपत्रातील बातमीने सुचले. ग्रँड रोड येथील गावदेवी विभागात एक पाळीव माकड लोकांच्या घरात शिरून चैन, पैसे, कीमती वस्तू यांची चोरी करून आपल्या मालकाला देत असे. एकदा मारुतीच्या देवळात जाऊन ते माकड चोरी करत असताना मारुतीची मूर्ती पाहून माकडाच्या लक्षात येते की आपण यांच्यापैकी एक आहोत आणि ते चोरी करणे थांबवते. याच माकडाचा एक मित्र आहे, कुत्रा. Dada Kondke यांनी आपल्या माकडाचे नाव ‘वाघ्या’ ठेवले पण तसे माकडच मिळेना. त्यासाठी ते बंगलोर येथेही जाऊन आले. अखेर एका बंगल्यात ते मिळाले. कुत्राही हवा तसा मिळत नव्हता म्हणून कुत्री निवडली आणि दहा दिवसांचे प्रशिक्षण दिले आणि मगच चित्रीकरण सुरू केले. मात्र माकडाने हनुमान मंदिरातील दृश्याच्या चित्रीकरणाच्या वेळेस फारच रखडवले. अगदी कंटाळून छायाचित्रणकार Arvind Lad यांनी कॅमेरा बंद केला.
या चित्रपटात Vasant Shinde, Gulab Mokashi, Bhalchandra Kulkarni, Rajani Chavan, Asha Patil, Prakash Phadtare, Vilas Rakde, Damodar Gaikwad इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष उल्लेखनीय गोष्ट, Johnny कुत्रा आणि Ramu माकड यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण Arvind Lad यांचे आहे आणि संकलन N. S. Vaidya यांचे आहे. Dada Kondke यांच्या चित्रपटातील गीत, संगीत, नृत्याचा ठेका आणि ठसका ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट. लोकनाट्य, लोकसंगीत यातून ते चित्रपटात आल्याचा सुपरिणाम. या चित्रपटातील गाणी Dada Kondke यांनीच लिहिली असून संगीत Ram Laxman यांचे आहे. ‘आल्या आल्या जाऊ नका’, ‘झाल्या तिन्ही सांजा करून शिनगार साजा’, ‘चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामंदी मोत्यांचा घास तुला भरविते’, ‘अनजीच्या सुता तुला रामाचं वरदान ऐक मुखाने बोला बोला जय जय हनुमान’ ही या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. ही गाणी Mahendra Kapoor आणि Usha Mangeshkar यांनी गायली आहेत. Mahendra Kapoor यांच्याबद्दल काही गोष्टी प्रचलित आहेत. ते मराठी गाणं गाताना मराठी भाषेतल्या शब्दांबद्दल कोणत्याही अटी घालायचे नाहीत. “अमूक एक मराठी शब्द आपल्याला उच्चारता येत नाही म्हणून त्याला पर्यायी, पण सहज उच्चारता येण्यासारखा शब्द द्या,” अशी मागणी करायचे नाहीत, असे एकदा Dada Kondke यांच्यासोबत मुंबईतील आम्ही सिनेपत्रकार गोव्याच्या दौऱ्यावर गेलो असता गप्पांच्या ओघात म्हणाले. Dada Kondke सिनेमासाठी गाताना Mahendra Kapoor यांनी Dada चे सिनेमातले पात्र पूर्णपणे समजून घेतले. Dada ची शाहिरी पार्श्वभूमी लक्षात घेतली आणि मगच Dada ची गाणी गाण्यासाठी ते रेकॉर्डिंगला उभे राहिले. येथे Mahendra Kapoor यांना आणखीन एक भान ठेवावे लागले, ते म्हणजे पार्श्वगायिका Usha Mangeshkar. Dada च्या ‘सोंगाड्या’पासूनच त्या Dada Kondke यांच्या चित्रपटासाठी गात होत्या. Dada Kondke यांनी Usha Chavan ला (‘सोंगाड्या’, ‘एकटा जीव सदाशिव’, ‘पांडू हवालदार’, ‘रामराम गंगाराम’, ‘सासरचं धोतर’, ‘वाजवू का?’ वगैरे) नायिका म्हणून स्वीकारू देत अथवा Anjana ला (‘आंधळा मारतो डोळा’, ‘तुमचं आमचं जमलं’), Jayashree T. ला (‘ह्योच नवरा पाहिजे’), Madhu Kambikar ला (‘येऊ का घरात’), Usha Naik ला (‘येऊ का घरात’) असा काही वेगळा विचार असू देत, Usha Mangeshkar प्रामुण्याने Dada Kondke यांच्या चित्रपटातील नायिकेसाठी गात.
Mahendra Kapoor यांनी Dada Kondke यांची रुपेरी पडद्यावरील शैली आणि Usha Mangeshkar यांची गायनातील पद्धत या दोन्ही गोष्टी अतिशय उत्तम जमवून जुळवून घेतल्या आणि चांगलेच यश प्राप्त केले. ‘अनजीच्या सुता तुला रामाचं वरदान’ असो, ‘गंगू, तारूण्य तुझं बेफाम, जसा इश्काचा अॅटम बाम’ हे गाणं गाताना त्यांनी Dada च्या पूर्ण स्टाईलला न्याय देत ते गाणं गायलं. ‘काशी गं काशी, तुझी सवय कशी, जरा हो माझ्यापाशी गं’ हे गाणं गाताना Dada नी ह्या गाण्यावर ‘अलबेला’ फेम Bhagwan Dada नृत्य करणार आहेत हे Mahendra Kapoor ना सांगितलं आणि Mahendra Kapoor नी त्याप्रमाणे हे गाणं पेश केलं. ‘तपस्येत दंग, करू नको भंग, गं भलताच रंग’ ह्या गाण्यात तर Dada च्या लोकनाट्यातल्या लोकगीतांचा ढंग Mahendra Kapoor नी अगदी अचूक पकडला. ‘मला एक चानस हवा’ ह्या गाण्यात तर त्यांनी Dada च्या व्यक्तिरेखेवरचा तो इब्लिस भाव अचूक पकडून दाखवला. Dada Kondke यांच्या चित्रपटाच्या अफाट आणि अचाट यशात त्यातील गाण्याचा फंडा एकदम फक्कड होता, त्यासाठीही पब्लिक पुन्हा पुन्हा थिएटरमध्ये जाई. ‘चल खेळ खेळू दोघं हूतूत्तूतू’ ह्या गाण्यातली ‘तुझी तंगडी कधी माझ्या हातात, माझी तंगडी कधी तुझ्या हातात’ ही ओळ गाताना Mahendra Kapoor नी Dada मधील रांगडा धटिंगणपणा हुबेहूब सादर केला आणि ‘ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळं’ ह्या पराकोटीच्या डबल मिनिंग गाण्यात तर Mahendra Kapoor नी Dada च्या आधीच Dada ना हवी तशी नखरेल करामत करून ठेवली. त्या काळात ते गाणं डबल मिनिंगमुळे असेल किंवा कमनीय चालीमुळे असेल, पण भलतंच हिट झालं होतं. लाऊडस्पीकरवरून दूरवर खेड्यापाड्यात ही गाणी पोहोचली. या प्रत्येक वेळी Usha Mangeshkar आपल्या सोबत असूनही वेगळ्या शैलीतील जणू द्वंद्वगीते आहेत याचा स्वीकार केला म्हणा वा विचार केला म्हणा, गाणी उगाच जमून येत नाहीत हो, त्यामागे असा सूर जुळावा लागतो. Dada Kondke आणि Mahendra Kapoor ही सुपर डुपर हिट जोडी ‘तुमचं आमचं जमलं’ पासून जमली यालाही पन्नास वर्षे पूर्ण झाली. Dada Kondke यांचा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या कधीच कालबाह्य झाला नाही. मुद्रित माध्यमे ते डिजिटल युग असा Dada Kondke आणि त्यांच्या चित्रपटांचा प्रवास सुरू आहे. चित्रपट रसिकांची पिढी बदलत राहिली, तरीदेखील Dada Kondke यांचे चित्रपट, त्यातील विनोद, द्वयर्थी संवाद, गाणी, सेन्सॉरशी पंगा घेतल्याचे किस्से, गोष्टी, कथा, दंतकथा यांना सतत वलय आणि वळण प्राप्त होत आहे. इतकेच नव्हे तर त्यावरू रिल्स बनताहेत. लालबाग येथील भारतमाता चित्रपटगृहात Dada चे चित्रपट पुन्हा पुन्हा रिपीट रनला प्रदर्शित होत आहेत आणि त्यांना मागच्या, मधल्या आणि आजच्या पिढीतील चित्रपट रसिकांची मनसोक्त मनमुराद दाद मिळत आहे. Dada Kondke आणि तीन पिढ्यांतील चित्रपट रसिकांचे नातं हे ‘तुमचं आमचं जमलं’ असेच आहे. घट्ट आणि फिट्ट, म्हणूनच सुपर डुपर हिट!
this blog was originally published on https://kalakrutimedia.com/50-years-of-dada-kondke-classic-tumcha-aamcha-jamla/
Comments
Post a Comment