एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणारा मराठी अभिनेता Kshitish Date ची हिंदी सीरिजमध्ये एन्ट्री!

 मराठी रंगभूमी, सिनेमा आणि मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवणारा अभिनेता क्षितीश दाते आता हिंदी वेबसीरिजच्या माध्यमातून नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मिस्त्री’ या वेबसीरिजमध्ये त्याने बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांसोबत काम करत दमदार प्रवेश केला आहे.  ‘मिस्त्री’ या थरारक आणि गूढतेने भरलेल्या वेबसीरिजमधून त्याने हिंदी डिजिटल विश्वात दमदार प्रवेश केला आहे. यामध्ये त्याने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली असून, त्याच्या सादरीकरणाने प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली आहे.(Actor Kshitish Date) Latest Marathi Movies


‘मिस्त्री‘ या गूढ-थरारक वेबसीरिजमध्ये क्षितीशने ‘बंटी’ नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या पात्रात त्याने संयम, गंभीरता आणि एक वेगळी छटा पहायला मिळणार आहे. त्याने याआधी प्रामुख्याने विनोदी आणि भावनिक भूमिकांमध्ये काम केलं होतं, मात्र ‘मिस्त्री’मध्ये त्याचा अॅक्शन आणि इन्व्हेस्टिगेशन असलेला शेड प्रेक्षकांना विशेष भावला आहे.



या वेबसीरिजमध्ये क्षितीशने राम कपूर, मोना सिंग आणि शिखा तिवारीसारख्या अनुभवी कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली. हिंदीमध्ये काम करण्याचा अनुभव सांगताना तो म्हणतो, “पहिल्यांदाच अशा मोठ्या कलाकारांसोबत शूटिंग करत होतो, पण पहिल्या दिवसापासूनच त्यांनी मला आपुलकीने घेतलं. पोलीस अधिकारी बनण्याचा अनुभवच भन्नाट होता.”मराठी इंडस्ट्रीमध्ये आधीच ओळख निर्माण केलेल्या क्षितीशने ‘धर्मवीर‘ या सुपरहिट चित्रपटात एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. याशिवाय ‘मुळशी पॅटर्न’, ‘फुलवंती’, ‘नवरदेव बीएससी अॅग्री’ यासारख्या चित्रपटांतून आणि ‘देवा शप्पथ’, ‘लोकमान्य’ यांसारख्या मालिकांतूनही तो झळकला आहे.

=================================

हे देखील वाचा: Dashavatar : मराठी चित्रपट ‘दशावतार’च्या फर्स्ट लूकला जागतिक स्तरावर पसंती; अमेरिकन यूट्यूबर्सने केल विशेष कौतुक!  

==================================

त्याचं ‘मी vs मी’ हे नाटक सध्या रंगभूमीवर यशस्वीपणे चालू आहे आणि प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळवतो आहे. ‘मिस्त्री’ ही वेबसीरिज जिओ हॉटस्टारवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असून, रहस्य आणि गुंतागुंत असलेली ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवते. त्यातील क्षितीश दातेंची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात येत असून, त्याच्या हिंदी पदार्पणाचं सर्वत्र कौतुक होत आहे. Bollywood Masala

Original content is posted on https://kalakrutimedia.com/http-kshitish-date-debuts-in-hindi-web-series-mistry-info/










Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

India’s Got Latent Case Update: Ranveer Allahbadia आणि Apoorva Mukhija च्या अडचणीत होऊ शकते वाढ; सायबर पोलिसांकडून होऊ शकते कारवाई