Rakesh Roshan : राकेश रोशन दिग्दर्शक म्हणून जास्त चमक
कारकिर्दीचे श्रेत्र कोणतेही असो, यशापयशाच्या चढउतारात, खेळात योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि हिंमत हवी, यश नक्कीच आहे. Rakesh Roshan याबाबत उत्तम उदाहरण. संगीतकार Roshan यांच्या दोन मुलांमधील एक राकेश रोशन अभिनयाच्या क्षेत्रात आला, दुसरा Rajesh Roshan संगीतकार म्हणून या क्षेत्रात आला. कौटुंबिक पार्श्वभूमी कशीही असली तरी स्वतःलाच सिद्ध करावे लागते. नशिबाची साथ संगत मिळेल, न मिळेल, तरी काही कर्तृत्व सिद्ध झाले तर वाटचाल सुकर होते.
नायक म्हणून संधी मिळतेय, पण अपेक्षित उंची गाठता येत नाही, आपण सहनायक म्हणून काम करुया, राकेश रोशनने घेतलेला निर्णय अंमलात आणला. हे करताना चित्रपटसृष्टीत काही चांगले मित्र जोडले. विशेषतः Jeetendra आणि Rishi Kapoor हे एकदम खास मित्र. या तिघांची मैत्री कायमच कौतुकाची राहिली. Prem Chopra, Ranjeet, Asrani असा आणखी मित्रपरिवार वाढला. सहनायक, दुसरा नायक अशी वाटचाल सुरू असतानाच Rakesh Roshanने चित्रपट निर्मितीत पाऊल टाकले.
Film Kraft असं आपल्या चित्रपट निर्मिती संस्थेला नाव दिले. त्याचे सासरे J. Om Prakash हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अनुभवी, मुरब्बी आणि यशस्वी निर्माता आणि दिग्दर्शक. त्यामुळे चित्रपट निर्माता म्हणून पाऊल टाकण्यासाठी घरातून पाठबळ मिळाले. जावयाच्या पाठीशी सासरे उभे राहणार याला चित्रपटाचं जग अपवाद नाही. फिल्म क्राफ्ट निर्मित पहिला चित्रपट Kaamchor (१९८२). दिग्दर्शक K. Viswanath. स्वतः राकेश रोशन नायक आणि Jaya Prada नायिका. राजेश रोशनची सगळीच गाणी लोकप्रिय. पिक्चर सुपर डुपर हिट. राकेश रोशनचा निर्माता म्हणून आत्मविश्वास वाढला. पुन्हा के. विश्वनाथ यांजकडे दिग्दर्शन सोपवले. चित्रपट Jaag Utha Insan (१९८४). या चित्रपटात Mithun Chakraborty, Sridevi, Rakesh Roshan यांच्या प्रमुख भूमिका. एका तेलगू चित्रपटाचा हा रिमेक आहे.
दोन चित्रपटाच्या निर्मितीनंतर Rakesh Roshanने आता वेगळं पाऊल टाकले. आपले सासरे J. Om Prakash यांजकडे दिग्दर्शन सोपवले. आणि Bhagwaan Dada या चित्रपटाचा वांद्रे येथील Mehboob Studioत मुहूर्त केला. चित्रपटात Rajinikanth, Sridevi, Rakesh Roshan आणि Tina Munim यांच्या प्रमुख भूमिका. या चित्रपटात बालपणीचा Hrithik Roshan आहे. मला आठवतंय, भगवानदादा च्या मुहूर्ताच्या दुसऱ्याच दिवशी या चित्रपटाचं पहिलं चित्रीकरण सत्र सुरू झाले आणि मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकाराना शूटींग रिपोर्टीगसाठी आवर्जून आमंत्रित करण्यात आले होते. जे. ओम प्रकाश हे शिस्तबद्ध पद्धतीने काम करणारे दिग्दर्शक. याच वेळी एका फोटोग्राफरला मेहबूब स्टुडिओच्या हिरवळीवर टीना मुनिमचे एक खास फोटो सेशन करायचे होते.
Tina Munimने J. Om Prakash यांना याची कल्पना दिली आणि मगच ती सेटबाहर पडली. हा चित्रपट १९८६ साली प्रदर्शित झाला, पण त्याला फारसे यश मिळाले नाही. (जे. ओम प्रकाश आपल्या दिग्दर्शनातील चित्रपटांची नावे A या आद्याक्षराने ठेवत, तसं हे नव्हतं.) निर्माता म्हणून Rakesh Roshanचा कामाचा झपाटा विलक्षण होता. त्यात सातत्य होते. अशा वेळी आपल्याला येत असलेल्या चाहत्यांची पत्रे वाचायची त्याची सवय त्याला उपयुक्त ठरली. एका चाहत्याने आपल्या पत्रात म्हटले होते, तुमचा पहिला चित्रपट Kaamchor यशस्वी ठरला आणि त्यानंतरचे Jaag Utha Insan आणि Bhagwaan Dada हे चित्रपट अपयशी ठरले. याचा अर्थ असा तुम्हाला इंग्रजी K अक्षराने नाव असलेले चित्रपट फलदायी ठरतात. तुम्ही तुमच्या चित्रपटाचं नाव K ने सुरु होणारं ठेवा. Rakesh Roshanने आपल्या दिग्दर्शनातील चित्रपटांच्या बाबतीत त्याची अंमलबजावणी केल्याचे दिसते. आणि अशातच त्याने चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकले. चित्रपटाचे नांव Khudgarz. या चित्रपटात Jeetendra, Shatrughan Sinha, Govinda, Neelam, पाहुणा कलाकार म्हणून Rishi Kapoor आणि खलनायकाच्या भूमिकेत Kiran Kumar. नेहमीप्रमाणे या चित्रपटालाही Rajesh Roshan यांचे संगीत. राकेश रोशनचे पहिलं दिग्दर्शन ही त्याच्या कारकीर्दीतील सर्वात मोठी गोष्ट. त्याचा तामझाम जोरात हवा होता. दक्षिण मुंबईतील Metro चित्रपटगृहात भव्य दिव्य दिमाखदार Premiere आणि प्रदर्शन यांचं आयोजन. ३१ जुलै १९८७ ची गोष्ट.
मला आठवतंय, हा एक आठवणीत रहावा असा ग्लॅमरस Premiere आणि तो होतोय तोच Gateway of India येथील Taj Mahal Hotelमधील हाॅलमध्ये भव्य पार्टी. आणि या पार्टीत पहावं तिथे स्टार. या चित्रपटातील कलाकार होतेच, त्यासह Raaj Kumar, Vinod Mehra वगैरे वगैरे अनेक स्टार्समुळे ही पार्टी अधिकच खुलली, फुलली, रंगली. मध्यरात्रीच्याही पलिकडे ही पार्टी चालली. त्या काळातील फिल्मी पार्टीत दोन गोष्टी हुकमी असत. Scotch आणि काजू. तेही अमर्याद आणि पार्टीत असलेल्या सर्वांना मुक्त. (आपण स्काॅच रिचवायची आणि इतरांना देशी द्यायची असा भेदभाव त्या काळातील फिल्मवाले करत नसत.) Khudgarz सुपर डुपर हिट ठरला आणि राकेश रोशन नावाच्या एका मसालेदार मनोरंजक चित्रपटांचा दिग्दर्शक म्हणून उदयास आला. चित्रपटाच्या जगात यश हेच सर्वाधिक चलनी नाणे असते. ते साध्य झाले तरी टिकवता यायला हवे. ते अधिक आव्हानात्मक असते.
Rakesh Roshan दिग्दर्शित पुढचा चित्रपट पडद्यावर आला, Khoon Bhari Maang (१९८८). तोदेखील यशस्वी ठरला आणि Khudgarzचे यश केवळ नशिबाचा भाग नव्हता यावर शिक्कामोर्तब झाले आणि राकेश रोशनचा निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून प्रवास सुरू झाला, त्यात अनेक चित्रपट सुपर डुपर हिट ठरले तर काही (King Uncle, Khel) अपयशी ठरले.
this blog was originally published on https://kalakrutimedia.com/rakesh-roshan-shined-even-brighter-as-a-director/
Comments
Post a Comment