Film Center : चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील महत्वाचा स्पाॅट…

गिरगावात लहानाचा मोठा होताना ताडदेव परिसरात कधी जाणं झालं की एक इमारत कायमच आपल्या नावापासूनच लक्ष वेधून घेई, ती म्हणजे Film Center. नाव वाचताना कुतूहल निर्माण होई की, या फिल्म सेंटरमध्ये चित्रपटविषयक नेमकं काय काम चालत असेल? सर्वसामान्य माणसाला चित्रपटाची ओळख ही चित्रपट पाहणे या गोष्टीपासून होते. माझ्या पिढीने आपल्या पालकांचा हात धरुन एकपडदा चित्रपटगृह अर्थात Single Screen Theatresमध्ये चित्रपट पाहायला जायचं यापासून झाली. आमच्या Khotachi Wadiसमोर असलेल्या Majestic चित्रपटगृहात साठच्या दशकाच्या उत्तरार्धात कृष्ण धवल अर्थात Black and White मराठी चित्रपट पाहून मला या पडद्यावरील गोष्टीत रमून जायच्या दृश्य माध्यमाची ओळख झाली.

चित्रपटाची श्रेयनामावली वाचताना त्यात Natraj Studio, Mehboob Studio अशी अनेक चित्रपट स्टूडिओची नावे वाचता वाचता फिल्म सेंटर हेदेखील वाचत असे. चित्रपटाची श्रेयनामावली वाचताना या क्षेत्राची थोडी फार ओळख होते आणि व्याप्तीही समजते. पुढे हे क्षेत्र शक्य तितक्या प्रमाणात जाणून घेण्याचा जणू मी झपाटाच लावला. त्यात लहान मोठे चित्रपट चित्रीकरण स्टुडिओ, गीत संगीत ध्वनीमुद्रण स्टुडिओ असं करता करता या फिल्म सेंटरलाही जायचा योग आला.

लहानपणापासून जी वास्तू आपण बाहेरून पहात आलो आहोत त्याच्या आत जायचा योग आला असता मला नेमकं काय वाटलं हे सांगता येणार नाही. ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला मी मिडियात आल्यावर काही वर्षातच या Film Centerमधील मिनी थिएटरमध्ये आम्हा चित्रपट समीक्षकासाठी आयोजित करण्यात आलेल्या हिंदी चित्रपटाच्या खेळांना जायचा योग आला. आणि मग अनेक हिंदी चित्रपटांचे खेळ येथेच आयोजित करण्यात येत असताना समजलं की येथे चित्रपटाची प्रिंट तयार करण्यासाठीची लॅबोरेटरी येथे आहे. चित्रपट माध्यम आणि व्यवसायातील ही अतिशय महत्वाची गोष्ट.

Film Centerमध्ये तीन मिनी थिएटर होती. तळमजल्यावरील मिनी थिएटरमध्ये आम्हा चित्रपट समीक्षक आणि काही पाहुणे यांसाठी खेळ होत. Raj Khosla दिग्दर्शित Sunny (Waheeda Rehman, Dharmendra, Sharmila Tagore, Sunny Deol, Amrita Singh), Nasir Hussain दिग्दर्शित Manzil Manzil (सनी देओल, Dimple Kapadia), Raj N. Sippy दिग्दर्शित Jeeva (Sanjay Dutt, Mandakini), दिग्दर्शित Mera Faisla (Mala Sinha, संजय दत्त, Rati Agnihotri) हे चित्रपट मी याच मिनी थिएटरमध्ये पाहिले. खुद्द जेथे या चित्रपटांची प्रिंट तयार झाली तेथेच चित्रपट पाहायला मिळाले हे एक प्रकारचे माझं भाग्यच. आणि तांत्रिकदृष्ट्या हा अनुभव भन्नाट होता.

पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील मिनी थिएटरमध्ये लॅबोरेटरीमधील प्रिंट तपासली जाई. विशेषतः चित्रपटाचे कुठे रंगात कमी जास्तपणा नाही ना? आवाज योग्य आहे ना? वगैरे. चित्रपट कृष्ण धवल असला तरी त्यावर काही डाग वगैरे नाहीत ना हे तपासून पाहिले जाई. याच Film Centerच्या दुसऱ्या मजल्यावर गाण्याचं ध्वनिमुद्रण (रेकॉर्डिंग) होत असे.‌ वादकांचा ताफा, पार्श्वगायक, (कधी कोरस) यांचा सहभाग असे. हे फिल्म सेंटर १९५२ साली सुरू झाले. आणि साधारण २००० सालापर्यंत तेथे सतत वर्दळ असे. चित्रपटसृष्टीतील लहान मोठे निर्माता, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलाकारांचे येणं जाणं असे. आजूबाजूच्या परिसरात मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय यांचं राहणीमान. प्रशस्त कार्यालये. जवळच Trimurti Filmsचे निर्माते Gulshan Rai (Johnny Mera Naam, Deewaar, Trishul, Vidhaata इत्यादी चित्रपटांचे निर्माते), त्या जवळ Bombay Air Condition Market इमारतीत आपल्या Dada Kondke यांचे कार्यालय. आणखीन पुढे आल्यावर ख्यातनाम दिग्दर्शक Shyam Benegal यांचे कार्यालय होते. त्यांनी दिग्दर्शिलेल्या Zubeidaa या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची याच कार्यालयात मुलाखत घेतली होती. माझ्यासाठी ही भेट एक अविस्मरणीय अनुभव. आणखीन पुढे आलो की उजव्या बाजूला Ganga Jamuna ही जुळी चित्रपटगृह (काही वर्षांपूर्वी ती पाडली) आणि डाव्या बाजूने गेल्यावर Diana चित्रपटगृह. तेही केव्हाच बंद झाले आहे.

हा स्टुडिओ मूळचा Tardeo Road, Haji Ali येथील असा ओळखला जात होता. एकिकडे Mumbai Central रेल्वे स्थानक आणि दुसरीकडे Heera Panna Shopping Centerच्या जवळील परिसर. एक मोठा Sound Recording Studio वैशिष्ट्यपूर्ण. आणि येथे रेकॉर्ड झालेली गाणी अनेक ‌Mohammed Rafi आणि Talat Mahmood यांनी संगीतकार Madan Mohan यांच्या मार्गदर्शनाखाली याच स्टुडिओत गाणी रेकॉर्ड केली होती. याच इमारतीमध्ये अनेक आघाडीच्या चित्रपट निर्मात्यांची कार्यालये होती. कालांतराने फिल्म सेंटरचे एक जुना युनिट बंद होऊन नंतर ते Goregaon येथील Kama Industrial Estate येथे कार्यरत झाले.

this blog was originally published on https://kalakrutimedia.com/film-center-a-landmark-in-the-journey-of-the-indian-film-industry/




Comments

Popular posts from this blog

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे साठ कोटी

आता मी हिंदीत बोलू?”; मराठीत बोलत असतानाच Kajol का भडकली?

Sholay थांबला नाही, थांबणारही नाही….