Raag Bilawal : सुरांच्या विश्वातील चैतन्याचा झरा

 भारतीय अभिजात शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपट गीते हा एक मोठा संशोधनाचा आणि मोठा स्मरण रंजनाचा विषय आहे. आपण जसजसे शास्त्रीय रागांच्या रचनांकडे जाऊ लागतो तसतसे त्याचे आणखी पैलू आपल्याला लक्षात येऊ लागतात. एक शास्त्रीय राग असा आहे जो आपण शालेय जीवनात नकळतपणे रोज गात होतो. पण आपल्या लक्षात येत नव्हते. हा राग आहे राग Bilawal. (Raag Bilawal)

या रागावर आधारित भारतीय राष्ट्रगीत आहे. Jana Gana Mana Adhinayaka Jaya He Bharata Bhagya Vidhata हे मुख्यतः राग Bilawal वर आधारित आहे. हे या रागावरच रचण्याचे कारण काय असावे? याचे उत्तर आपल्याला या राग बिलावलच्या रचनेत दिसून येते. यामध्ये सर्व शुद्ध स्वर वापरलेले असतात सा रे ग म प ध नि त्यामुळे या रागाला एक नैसर्गिक फ्रेशनेस आलेला असतो. या रागातील रचना तुम्हाला उल्हासित प्रफुल्लित करतात. मनाला प्रसन्न करतात. त्यामुळेच हा राग पहाटेच्या वेळी गायचा राग आहे. या रागाचा उगम नेमका कुठे झाला याबद्दल अभ्यासकांमध्ये काहीसे मतभेद जरी असले तरी गुजरात मध्ये या रागाचा जन्म झाला असे समजले जाते आणि याच रागाचे आधुनिक रूप म्हणजे Alhaiya Bilawal आहे. ज्यामध्ये मधला मध्यम तीव्र स्वर वापरून वेगळा आविष्कार निर्माण केला जातो. या रागाच्या शास्त्रीय विस्तारा सोबतच यातील विविध लोकसंगीत आणि चित्रपट संगीतातील उपयोगाने याला अजरामर केले आहे. (Raag Bilawal)

या रागातील सर्वोत्तम रचना गीतकार Gulzar आणि संगीतकार Rahul Dev Burman यांनी Parichay (1972) या चित्रपटात वापरली होती. हे गाणे म्हणजे राग Bilawal चे अगदी टेक्स्ट बुक सॉन्ग आहे. गाणे आहे Sa Re Ke Sa Re Ga Ma Ko Lekar Gaate Chale Papa Nahi Hai Dhani Si Didi Didi Ke Saath Hai Saare राग बिलावलच्या सर्व नोट्सचा सुंदर वापर या गाण्यात केलेला दिसतो. या रागाचे महत्व संगीतकार Laxmikant-Pyarelal यांनी देखील ओळखले होते. त्यांनी Shor (1972) या चित्रपटातील Ek Pyar Ka Nagma Hai हे गाणे या रागात कंपोज केले होते ज्याची गोडी आजही कायम आहे. या रागाचे मॉर्निंग कनेक्शन लक्षात घेऊनच संगीतकार Madan Mohan यांनी Bawarchi (1971) या चित्रपटातील Bhor Aayi Gaya Andhiyara Saare Jag Mein Hua Ujiyala हे अप्रतिम गाणे बनवले जे ऐकताना मनाला एक वेगळीच उभारी Chhookar Mere Man Ko Kiya Tune Kya Ishara (Yaarana, 1981), Tujhe Jeevan Ki Dor Se Baandh Liya Hai (Asli Naqli, 1962), Yun Hasraton Ke Daag Mohabbat Mein Dho Liye (Adalat, 1958), Tum Na Jaane Kis Jahan Mein Kho Gaye (Sazaa, 1951) या सुंदर रचना याच बिलावल रागाच्या चौकटीत सहज बसतात. (Raag Bilawal)

सकाळी जेव्हा सगळी सृष्टी जागी होत असते तेव्हा मनातील मळभ दूर करून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे काम हा राग अत्यंत प्रभावीपणे करतो. या रागाचा वापर केवळ चित्रपटातच नाही तर अनेक धार्मिक भक्तीगीतात देखील केलेला दिसतो. Guru Granth Sahib मधील Ek Naam Sat Naam ही रचना राग बिलावल मधीलच आहे आणि Guru Granth Sahib मधील अनेक रचना आपल्याला राग बिलावल मध्ये स्वरबद्ध केलेल्या दिसतात. एवढेच नव्हे तर संत Dnyaneshwar आणि संत Tukaram यांच्या अनेक रचनांना या रागात स्वरबध्द केलेले स्पष्टपणे पाहायला मिळते. जसे की मराठी भाव संगीतातील गाजलेले संत तुकाराम महाराजांचे Ram Krishna Govind Narayan Hari Keshava Murari Pandurang हे Jaywant Kulkarni यांनी गायलेले गाणे ज्याचे संगीत Madhukar Golwalkar यांनी दिले होते. ते देखील राग बिलावलवर आधारित आहे आणि या रागाच्या सुरावटीत एक वेगळाच माधुर्य भाव दाटलेला असतो. (Raag Bilawal)

सूफी संगीतात देखील हा राग अतिशय मशहूर आहे. या रागावर आधारित एक कव्वाली अनेक वर्षापासून लोकप्रिय आहे जी अलीकडे Salman Khan च्या Bajrangi Bhaijaan या चित्रपटात नव्याने रसिकांसमोर आली. Bhar Do Jholi Meri Ya Mohammad Varna Jaoonga Main Khali ही लोकप्रिय कव्वाली देखील राग बिलावलवर आधारित आहे. (Raag Bilawal)

==============================

हे देखील वाचा: Rajesh Khanna And Shatrughan Sinha : यांच्यातील मैत्री राजकारणाने संपवली?

==============================

या रागावर असलेल्या आणखी काही अप्रतिम आणि लोकप्रिय रचनांमध्ये A. R. Rahman यांच्या संगीताने सजलेले Dil Hai Chhota Sa Chhoti Si Asha हे चित्रपट गीत तसेच अत्यंत गाजलेले Golmaal Hai Bhai Sab Golmaal Hai हे गीत आणि याचसोबत Sachin Dev Burman आणि O. P. Nayyar यांच्या अनेक सुमधुर गाण्यांमध्ये या रागाच्या छटा सहज अनुभवायला मिळतात जिथे प्रत्येक स्वरातून एक वेगळाच आनंद आणि उत्साह ओसंडून वाहताना दिसतो कारण बिलावल हा केवळ संगीताचा एक प्रकार नसून तो मानवी चेतनेचा आणि आनंदाचा एक अखंड वाहणारा उत्सव आहे जो पिढ्यानपिढ्या रसिकांना मंत्रमुग्ध करत आला आहे आणि पुढेही करत राहील. (Raag Bilawal)

THIS BLOG IS ORIGINALLY PUBLISHED AT KALAKRUTI MEDIA -

Comments

Popular posts from this blog

Baapya Movie Review : नाकारण्यापासून ते स्विकारण्यापर्यंतचा प्रवास

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे साठ कोटी

अमिताभ बच्चन आणि नसिरुद्दीन शहा आजवर एकत्र सिनेमात का आले नाही ?