Dilip Kumar : दिलीप कुमारची फसलेली तिहेरी भूमिका

 Dilip Kumar अभिनयाचे विद्यापीठ आहे, भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील अभिनयाचा एक मापदंड आहे, एक मानदंड आहे, एक सर्वोच्च स्थान आहे, रुपेरी पडद्यावरील त्यांचा एकूणच वावर, व्यक्तिरेखेशी एकरूप होणं हे पाहूनही ‘अभिनय म्हणजे काय असतं’ हे शिकता येईल असे अतिशय आदराने सांगता येत. असं सगळं असलं तरी त्यांनी भूमिका साकारलेला एखादा चित्रपट पुरता फसतोदेखील आणि या चित्रपटात त्यांनी का बरे भूमिका स्वीकारली असा प्रश्न पडतो. असाच एक चित्रपट Musheer Riaz निर्मित आणि Asit Sen दिग्दर्शित Bairaag. हा चित्रपट मुंबईत २२ ऑक्टोबर १९७६ रोजी प्रदर्शित झाला. मेन थिएटर गंगा. या चित्रपटाच्या प्रदर्शनास पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. (Dilip Kumar)

या चित्रपटात Dilip Kumar यांची चक्क तिहेरी भूमिका आहे. Tapi Chanakya दिग्दर्शित Ram Aur Shyam (१९६७) मधील भित्रा राम आणि बिनधास्त बेधडक श्याम अशा दुहेरी भूमिकेला टाळ्या शिट्ट्यांनी पब्लिकचा जबरदस्त रिस्पॉन्स मिळाल्याने आता दुहेरी नव्हे तर तिहेरी भूमिका साकारुयात असा व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार करत Bairaag बनला असावा. कैलाशनाथ हे पिता आणि त्यांची लहानपणी हरवलेली दोन मुले म्हणजे एक भोलेनाथ अर्थात भोला (तो गावात लहानाचा मोठा होतो) आणि दुसरा संजय (हा शहरात लहानाचा मोठा होता). आणि चेहरा साम्यामुळे होणारा गोंधळ. संजयवर येणारा खुनाचा आळ. भोलाची गावातील प्रेयसी तारा (Saira Banu) आणि संजयची शहरातील प्रेयसी सोनिया (Leena Chandavarkar) आणि दोन्ही जोड्यांची प्रेमगीते आहेत. दृष्टीहीन कैलासनाथना अचानक दृष्टी प्राप्त होते वगैरे अनेक हास्यास्पद प्रसंगाने हा चित्रपट एकूणच बेचव झाला. या चित्रपटाचे लेखन S. Khalil, Alwar Alvi आणि Dr. Rahi Masoom Raza यांचे आहे. या चित्रपटात Prem Chopra, Sujit Kumar, Helen, Madan Puri, Mukri इत्यादी अनेक लहान मोठे कलाकार आहेत. या चित्रपटाची गीते Anand Bakshi यांची असून संगीत Kalyanji-Anandji यांचे आहे. या चित्रपटाचे छायाचित्रणकार Kamal Bose यांचे आहे. पण चित्रपट रंगत नाही, अपेक्षित मनोरंजन करत नाही त्याचं हो काय? (Dilip Kumar)

दिग्दर्शक Asit Sen यांनी Mamata (१९६६), Khamoshi (१९६९), Safar (१९७०), Anokha Daan (१९७२) इत्यादी गंभीर चित्रपटानंतर Bairaag च्या चित्रीकरणाला सुरुवात केली. या चित्रपटाचा मसाला मिक्स प्रकार त्यांच्या पठडीतील अजिबात नव्हता. पण आयुष्यात आपल्याला Dilip Kumar च्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळावी असे अनेक दिग्दर्शकांचे असलेले स्वप्न पूर्ण होत असेल तर? अनेक अभिनेत्रींनाही आपण दिलीपकुमारची नायिका व्हावं असं स्वप्न असे. आपलं हे स्वप्न पूर्ण न झाल्याबद्दल Asha Parekh आजही हळहळत आहेत. Sharmila Tagore चे हे स्वप्न B. R. Chopra निर्मित आणि दिग्दर्शित Dastaan (१९७२) मध्ये पूर्ण झाले, पण रसिकांनी हा चित्रपट पूर्णपणे नाकारला. या चित्रपटातही दिलीपकुमार दुहेरी भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या अपयशाने की काय दिलीपकुमार यांनी Bairaag च्या लेखनात आणि Asit Sen यांच्या दिग्दर्शनात बरीच ढवळाढवळ केली असे केवढे तरी किस्से, कथा, दंतकथा, गोष्टी त्या काळात फार फार गाजल्या. त्यात तथ्य किती आणि कोणते होते हे कधीच स्पष्ट झाले नाही. दिलीपकुमारने H. S. Rawail दिग्दर्शित Sangharsh (१९६८) च्या दिग्दर्शनातही बरेच हस्तक्षेप केल्याचं गाजलं. त्यांनीच साधनाची या चित्रपटाच्या नायिकेसाठी होत असलेली निवड अडवली आणि Vyjayanthimala ची निवड केली. असं असूनही Sangharsh प्रदर्शित होताच अनेकांनी म्हटलं, Sanjeev Kumar दिलीपकुमारला भारी ठरला. दिलीपकुमारच्या निस्सीम भक्तांनी यावर वाद घातला आणि आमचा दिलीपकुमारच सरस, हवं तर तेवढ्यासाठी पुन्हा एकदा हा चित्रपट पहा असे म्हटले. (Dilip Kumar)

Bairaag च्या गाण्याची ध्वनिमुद्रिका प्रकाशित होताच गाणी लोकप्रिय झाली. Shankar Mere Kab Honge Darshan Tere (पार्श्वगायक Mahendra Kapoor), Chhoti Si Umar Mein Lag Gaya Rog (Lata Mangeshkar), Main Bairagi Nachoon Gaoon (Lata Mangeshkar आणि Mohammed Rafi), Saare Shahar Mein Aap Sa Koi Nahin (Lata Mangeshkar आणि Mohammed Rafi), Peete Peete Kabhi Kabhi (Asha Bhosle आणि Mohammed Rafi) ही सगळीच गाणी लोकप्रिय झाली तरीही चित्रपटाचे काहीना काही रिशूटींग सुरूच होते आणि त्यातूनच या चित्रपटाची दुर्दैवाने थट्टा केली जाऊ लागली. त्यातही चित्रपट आणि क्रिकेट याबाबत पूर्ण खात्री वगैरे करून घेतली जात नाही. त्यातील अनेक गोष्टी अधिकाधिक रंग भरून पसरवल्या जातात. आजही म्हणजे पन्नास वर्षांनंतरही असाच खेळ चालला आहे. (Dilip Kumar)

Bairaag एकदाचा पडद्यावर आला आणि दोन गोष्टी रंगल्या. Leena Chandavarkar दिलीपकुमारची प्रेयसी म्हणून अजिबात शोभत नाही. भलेही आपण दिलीपकुमारची नायिका बनलो याचा तिला विलक्षण आनंद झाला असेल पण पडद्यावर हसे झाले त्याचं काय? ती मनसोक्त मनमुराद हसलीय, ते दिसतं छान. पण जोडी शोभत नाही. तशी ती Dil Ka Raja या चित्रपटात Raaj Kumar लाही शोभली नाही आणि तिहेरी भूमिकेतील दिलीपकुमारचा अट्टाहास म्हणजे आपण पडद्यापेक्षाही प्रचंड मोठे आहोत हे दाखवून देण्यासाठीचा आटापिटा आणि हे चित्रपट रसिकांना नक्कीच आवडेल असा भ्रम. कितीही आपण मोठे झालो तरी पाय जमिनीवर असावेत हाच यातून धडा घ्यावा. अर्थात जमलंच तर घ्यावा. (Dilip Kumar)

THIS BLOG IS ORIGINALLY PUBLISHED AT KALAKRUTI MEDIA - https://kalakrutimedia.com/dilip-kumar-the-failed-triple-role/

Comments

Popular posts from this blog

Baapya Movie Review : नाकारण्यापासून ते स्विकारण्यापर्यंतचा प्रवास

अमिताभ बच्चन आणि नसिरुद्दीन शहा आजवर एकत्र सिनेमात का आले नाही ?

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे साठ कोटी