V Shantaram : शांताराम बापूंच्या करड्या शिस्तीचा फटका जितेंद्र यांना दोनदा बसला होता !

चित्रपती V. Shantaram अतिशय शिस्तीचे भोक्ते होते. सिनेमा बनवताना सर्व गोष्टी अचूक आणि ठराविक वेळेत व्हायला पाहिजे यावर त्यांचा विशेष कटाक्ष असायचा. त्याना बेशिस्त अजिबात खपायची नाही. त्याचा फटका अभिनेता Jeetendra ला दोनदा बसला होता. 1962 साली त्यांच्या ‘Sehra’ या सिनेमाची निर्मिती चालू होती. जितेंद्र आणि Sandhya ही स्टार कास्ट फायनल झाली होती. जितेंद्र खूष होता त्याचा हीरो म्हणून पहिलाच सिनेमा असणार होता. सर्व शूटिंग राजस्थान ला होणार होते. बापूंची तिथे करडी शिस्त असायची. सर्व युनिट ने एकत्र जेवायचे, रात्री दहा नंतर रूम मधील लाइट ऑफ! जितेंद्र तरुण होता. एकदा तो संध्याकाळी शूट झाल्यावर लोकेशन पासून बाहेर पडून मौज मस्ती साठी शहरात गेला. रात्री त्याला उशीर झाला. रात्री भोजनासाठी जितेंद्र सोबत नाही हे बापूच्या लक्षात आले, आणि वॉचमनला बजावून ठेवले “जितेंद्र रात्री किती जरी उशिरा आला तरी त्याला माझ्याकडे पाठव.

रात्री उशिरा Jeetendra हालत डुलत आला. वॉचमन च्या निरोपाने त्याची धुंदी क्षणार्धात उतरली. तो लगेच बापूच्या आदेशाने त्याना भेटायला गेला. बापू जागेच होते. त्यानी सर्वा समक्ष त्याला प्रचंड झपले आणि प्रॉडक्शन च्या माणसाला सांगितले, याला उद्या सकाळी मुंबईला परत पाठवायची व्यवस्था करा. अशी बेशिस्त लोक मला माझ्या युनिट मध्ये नको. जितेंद्र गयावया करू लागला, रडू लागला माफी मागू लागला. हाती आलेली संधी एक क्षणात दूर झाली. बापू ऐकायला तयार नव्हते. ते तडक आपल्या रूम कडे निघून गेले. जितेंद्र ने विचार केला आता संपलं सगळं आता घरी काय म्हणून तोंड दाखवायचे? निमूटपणे आपल्या रूम मध्ये आला. झोप लागणे शक्यच नव्हते. रात्र तळमळत आणि स्वत:ला दोष देत काढली. सकाळी युनिट च्या एकाने सांगितले. “बापू सकाळी सहा वाजता एका मंदिरात जातात तिथे जावून पुन्हा माफी माग.” मरता क्या न करता? जितेंद्र सकाळीच मंदिर पाशी जावून थांबला . बापू आले की लगेच त्यांच्या पायावर लोटांगण घातले. बापू म्हणाले ,” तुझ्याकडून चूक झाली आहे . तुला शिक्षा होणारच. या पुढे तू या सिनेमाचा हीरो असणार नाहीस.” जितेंद्र आणखीच रडू लागला तेंव्हा बापू म्हणाले ,” ठीक आहे. या सिनेमाचा तू हीरो नसशील पण सिनेमात असशील.” जितेंद्र ला काहीच अर्थबोध झाला नाही.

बापू म्हणाले,” या सिनेमात खूप फाईट सीन आहेत स्टंट सीन आहेत. आता तू या सिनेमात Sandhyaची डबल म्हणून व्यवरायचे. त्या साठी तुला बायकांचे कपडे परिधान करावे लागतील. या सर्व फाईट आणि स्टंट सीन ला तू संध्याची डुप्लीकेट म्हणून काम करायचे!” दुसरा कुणी असता तर ही ऑफर धुडकावून सरळ मुंबईला निघून आला असता. घरची सराफाची पेढी होतीच! खरंतर कुणालाही अपमान वाटावा असा हा प्रकार होता. सिनेमाचा हीरो म्हणून साईन झालेले असताना आता हिरोईन ची डुप्लीकेट म्हणून साडी घालून चेहऱ्यावर घूंघट घेवून वावरायचे? पण Jeetendra ने हा अपमान गिळला आणि या कामासाठी हो म्हणाला. आता संपूर्ण सिनेमात तो घूंघट ओढून वावरला. आता जितेंद्र च्या जागी Prashant या अभिनेत्याची निवड झाली! (हा प्रशांत नंतर कुठे गेला?)

‘Sehra’ हा सिनेमा आज आठवला जातो तो त्याच्या संगीत मुळे . यातील गाणी Hasrat Jaipuri यांनी लिहिली होती तर संगीत Ramlal यांचे होते. यातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. ’ पंख होते तो उड आती (Lata Mangeshkar), (मस्त नजर की कटार (Rafi), तकदीर का फसाना(रफी), जा जा जा रे तुझे हम जान गये(रफी,लता), तुम तो प्यार हो सजनी(रफी,लता), तकदीर का फसाना(रफी) उजड गया है मोहब्बत में(लता मंगेशकर), ना घर तेरा, ना घर मेरा(Hemant Kumar), हम हैं नशे में (Asha Bhosle) V. Shantaram यांच्या संपूर्ण कारकि‍र्दीत पहाटे याच सिनेमात रफी यांनी पार्श्वगायन केले होते!

Jeetendra यांची कामाबाबत ची निष्ठा , झालेल्या चुकीबाबत प्रायश्चित्त घेण्याची तयारी आणि आज्ञा धारकपणा हे गुण V. Shantaram यांना आवडले. त्यांनी जितेंद्रला खुल्या मनाने माफ केले. आणि आपल्या पुढच्या सिनेमाचा हीरो बनवले. हा सिनेमा होता 1964 सालचा ‘Geet Gaya Pattharon Ne’ ज्यात त्यांची मुलगी Rajshree जितेंद्र ची नायिका होती. बापूंच्या करड्या शिस्तीचा अनुभव जितेंद्र यांना नंतर ‘Boond Jo Ban Gayi Moti’ या चित्रपटाच्या वेळी देखील आला होता त्या बद्दल पुनः कधी तरी!

this blog was originally published on https://kalakrutimedia.com/jeetendra-jeetendra-faced-the-brunt-of-shantaram-bapus-discipline/


Comments

Popular posts from this blog

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे साठ कोटी

Sant Dnyaneshwaranchi Muktai: ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला ज्ञानेश्वरीचा सुरेल सोहळा !

आता मी हिंदीत बोलू?”; मराठीत बोलत असतानाच Kajol का भडकली?