Ismat Chughtai यांच्या वादग्रस्त कथेवरील ‘लिहाफ’ सिनेमा बघितला का?

स्त्रियांचे समलिंगी संबंध अर्थात लेस्बियन हा विषय आज देखील बोल्ड समजला जातो पण याच विषयावर 1940 साली लेखिका इस्मत चुगताई यांनी एक कथा लिहिली होती. लक्षात घ्या या बोल्ड कथेने नव्वद वर्षापूर्वीच्या त्या सनातनी वातावरणात काय वादळ निर्माण झाले असेल? तिच्यावर लाहोर कोर्टात खटला दाखल झाला. या सर्व प्रकारांवर मध्यंतरी Lihaaf हा सिनेमा येवून गेला पण गंमत म्हणजे त्यावर फारशी चर्चा झाली नाही. हा सिनेमा दुर्लक्षित राहिला की समाज मॅच्युअरड झाला ? पुरोगामी स्वतंत्र वैचारीक बाण्याच्या Ismat Chughtai यांची कला कारकीर्द भन्नाट होती!

१९७४ सालच्या Garm Hava या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार तसेच फिल्मफेअरचा पुरस्कार देखील पटकावला होता. या चित्रपटाच्या लेखिका होत्या इस्मत चुगताई. आज हे नाव कुणाला आठवण्याची शक्यता नाही. Ismat Chughtai (२१ ऑगस्ट १९११ – २४ ऑक्टोबर १९९१) या एक भारतीय उर्दू कादंबरीकार, कथालेखिका, उदारमतवादी मानवतावादी आणि चित्रपट निर्मात्या होत्या. १९३० च्या दशकात आपल्या लेखनाची सुरुवात करताना, त्यांनी स्त्रीची लैंगिकता व स्त्रीत्व, मध्यमवर्गीय सुसंस्कृतपणा आणि वर्गसंघर्ष यांसारख्या विषयांवर विपुल लेखन केले; हे लेखन अनेकदा मार्क्सवादी दृष्टिकोनातून केलेले असे. साहित्यिक वास्तववादाने वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या आपल्या लेखनशैलीच्या जोरावर, चुगताई यांनी विसाव्या शतकातील उर्दू साहित्यात एक महत्त्वपूर्ण आवाज म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आणि १९७६ मध्ये भारत सरकारकडून त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उर्दू साहित्या मध्ये त्यांचे नाव फार आदराने आज ही घेतले जाते.त्या पुरोगामी स्वतंत्र विचारांच्या या लेखिका होत्या.

Ismat Chughtai यांनी लिहिलेल्या एका कथेवर स्वातंत्र्यापूर्वी लाहोरच्या उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता. आज आपल्याला थोडस गंमत वाटेल त्या काळात संस्कृती रक्षक मंडळींची मोठी चलती होती. त्यांना माध्यमाच्या दुनियेत अजिबात देखील उन्नीसबीस चालायचे नाही. इस्मत यांच्या याच न्यायालयीन लढयावर मध्यंतरी एक चित्रपट घेऊन गेला. या सिनेमाची फारशी चर्चा झाली नाही पण सिनेमा जबरदस्त होता. विषय काहीसा बोल्ड होता. सिनेमाचे नाव होते Lihaaf यात लेस्बियन हा विषय होता.

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित Ismat Chughtai यांच्या अनेक कथांवर हिंदी सिनेमा निघाले आहेत त्यांच्या काही कथांवर पाकिस्तान मध्ये देखील चित्रपट निघाले आहेत. १९५७ साली प्रदर्शित झालेल्या ‘सोने की चिडिया’ हा नूतन अभिनित एक अप्रतिम चित्रपट. या सिनेमाची कथा इस्मत यांचीच होती. उत्तर प्रदेशातील बदायुणी येथे जन्मलेल्या इस्मत यांचे बालपण या शहरांमध्ये गेले . लहान पणा पासूनच स्वतंत्र आणि पुरोगामी विचाराची असल्याने लहान वयातच लिखाणाला सुरुवात केली होती. Latif या हिंदी सिनेमाच्या दिग्दर्शकाची त्यांचे लग्न झाले. १९४० साली त्यांनी लाहोरच्या एका उर्दू मासिकासाठी Lihaaf एक नावाची कथा लिहिली होती . लहानपणी स्वतः किस्मत ने अनुभवलेली कथा होती.

आज लेसबियन/ समलिंगी संबंध आहे हे शब्द आपल्याला सहज कानवर पडतात पण त्या काळात हा विषय मांडणे त्यात पुन्हा एका स्त्री ने मांडणे खूप अवघड होतं. ही कथा एका नवाबाच्या पत्नीची कहाणी होती. हा नवाब हा आपल्या पत्नीला शरीर सुख त्याला असमर्थ असतो. त्यामुळे नवाबची पत्नी आतून दुखावलेली असते. हवं ते सुख न मिळाल्याने ती कायम आजारी पडत असते. डॉक्टर तिचे अंग मसाज करून देण्यासाठी एका बाईला तिच्याकडे पाठवतात. या बाईसोबतच तिचे शारीरिक संबंध निर्माण होतात. हा सर्व प्रकार लहानग्या इस्मत ने आपल्या डोळ्याने पाहिलेला असतो. रात्री पांघरूणात त्या दोन स्त्रियांचे शारीरीक चाळे आणि पांघरूणांची होणारी लयबध्द हालचाल तिला कंदिलाच्या प्रकाशात दिसत असते. लहान पणी या कृत्याचा अर्थ तिला कळत नाही पण मोठे झाल्यावर त्याचा अर्थ तिला समजतो त्यावरच तिने Lihaaf ही उर्दू कथा लिहिली. जी १९४० साली लाहोरच्या एका मासिकात प्रसिध्द झाली. या कथेचे देशात संमिश्र स्वागत झाले. इस्मत ही प्रोग्रेसिव रायटर्स असोसिएशन ची लेखिका होती. स्वतंत्र विचाराची होते त्यामुळे एक प्रस्थापित वर्ग तिच्या लेखनावर नाराज होता. या मंडळींनी ही कथा अश्लील आहे म्हणून लाहोरच्या हाय कोर्टात इस्मत च्या विरुद् खटला दाखल केला. त्यावेळी तिच्यासोबत तिचे पती देखील होतं आणि तिचा एक मित्र देखील होता Saadat Hasan Manto. त्याच्या कथांना देखील त्या काळात अश्लील समजले जाईल हा खटला दोन वर्ष कोर्टात चालला आणि शेवटी इस्मत च्या बाजूने निकाल लागला. याच संपूर्ण कोर्ट केस वर हा चित्रपट आधारित आहे.

तिने १९४० च्या दशकाच्या उत्तरार्धात सिनेमाच्या पटकथा लिहिण्यास सुरुवात केली आणि लतीफ यांच्या Ziddi या चित्रपटाद्वारे पटकथा लेखिका म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. Kamini Kaushal, Pran आणि (प्रमुख भूमिकेतील आपल्या पहिल्याच चित्रपटात) Dev Anand यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘जिद्दी’ या चित्रपटाची १९४८ मधील सर्वात मोठ्या व्यावसायिक यशांपैकी एक म्हणून नोंद झाली. हा चित्रपट १९४१ मधील याच नावाच्या एका लघुकथेवर आधारित होता; चुगताई यांनीच या चित्रपटासाठी मूळ कथेचे रूपांतर पटकथेच्या स्वरूपात केले होते. त्यानंतर, १९५० मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि Kaushal व Dilip Kumar यांची प्रमुख भूमिका असलेल्या Arzoo या सिनेमासाठी तिने संवाद आणि पटकथा लेखन केले. १९५३ मध्ये प्रदर्शित झालेल्या Fareb या चित्रपटाद्वारे चुगताई यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही आपल्या कारकिर्दीचा विस्तार केला; आपल्याच एका लघुकथेवर आधारित पटकथा पुन्हा एकदा स्वतःच लिहून, चुगताई यांनी लतीफ यांच्यासोबत या चित्रपटाचे सह-दिग्दर्शन केले. ‘आरजू’ आणि ‘फरेब’ या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवरही त्यांनी चांगली कामगिरी केली.

चुगताई आणि लतीफ यांनी संयुक्तपणे ‘फिलमिना’ (Filmina) या निर्मिती संस्थेची स्थापना केली,. चित्रपट निर्माती म्हणून तिचा पहिला चित्रपट होता १९५८ मधील Sone Ki Chidiya या चित्रपटाची कथा तिनेच लिहिली होती आणि त्याची सह-निर्मितीही केली होती. नूतन आणि तलत महमूद यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात, एका बालकलाकारांची कथा मांडण्यात आली होती; आपल्या संपूर्ण कारकिर्दीदरम्यान या बालकलाकारांचे कसे शोषण आणि छळ झाले, हे यात दर्शवण्यात आले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आणि या यशाचा थेट परिणाम म्हणून चुगताई यांच्या लोकप्रियतेतही मोठी वाढ झाली.

Sone Ki Chidiya या चित्रपटाचे वर्णन “भारतीय चित्रपटसृष्टीतील एका अत्यंत महत्त्वपूर्ण कालखंडाचे चित्रण करणारी” आणि चित्रपट उद्योगाच्या “चकचकीत दुनियेमागील विदारक वास्तव (grime behind the glamour) उलगडून दाखवणारी” एक महत्त्वाची निर्मिती म्हणून केले जाते. या चित्रपटातील आपल्या अभिनयासाठी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवणाऱ्या नूतनने स्वतःच या चित्रपटाला आपल्या आवडत्या प्रकल्पांपैकी एक असल्याचे म्हटले होते. तसेच, १९५८ मध्येच चुगताई यांनी महमूद आणि श्यामा यांची प्रमुख भूमिका असलेल्या Lala Rukh या प्रेमप्रधान नाट्यपटाचीही निर्मिती केली होती.

this blog was originally published on https://kalakrutimedia.com/ismat-chughtai-have-you-watched-the-film-lihaaf-based-on-her-controversial-story/







Comments

Popular posts from this blog

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे साठ कोटी

Sant Dnyaneshwaranchi Muktai: ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला ज्ञानेश्वरीचा सुरेल सोहळा !

आता मी हिंदीत बोलू?”; मराठीत बोलत असतानाच Kajol का भडकली?