Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या पहिल्या सिंहली (श्रीलंकन) भाषेतील गाण्याचा किस्सा!
Lata Mangeshkar यांनी भारतातील जवळपास सर्व प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायली आहे. लताच्या स्वरातील मधुरतेने त्या त्या भाषेतील शब्दांना सुरेल पण दिलं. आज इतक्या वर्षानंतर देखील ती सर्व गाणी रसिक आवडीने ऐकत असतात. लता दीदींनी केवळ भारतातील प्रादेशिक भाषांमध्येच नाही तर काही परदेशी भाषांमध्ये देखील गाणी गायली. आपले शेजारी राष्ट्र Sri Lanka या देशातील सिहली भाषेत लता दीदींनी गाणे गायले आहेत. या गीताला श्रीलंकेत राष्ट्रगीता इतकाच सन्मान मिळत असतो. सिंहली भाषेतील लता दीदींनीच्या पहिल्या गाण्याचा किस्सा खूप Interesting आहे. (Lata Mangeshkar)
श्रीलंकेतील एक चित्रपट निर्माते T. Somasekaran यांनी आपल्या Seda Sulang चित्रपटात लताने गावे म्हणून ते खास भारतात मुंबईला लताला येऊन भेटले लता दीदींनी त्यांची विनंती मान्य केली आणि पहिल्या सिंहली भाषेतील लताच्या गाण्याचा जन्म झाला. लता त्या वेळी भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी गायिका होती. या गाण्याला संगीत Ananda Samarakoon या श्रीलंकन संगीतकाराने दिले होते. हे संगीतकार Gurudev Rabindranath Tagore यांचे शिष्य होते. संगीत आणि चित्रकला याची त्यांना आवड होती. शांतीनिकेतन मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या कडून त्यानी या दोन्ही कला शिकल्या होत्या. यांनीच श्रीलंकेच्या राष्ट्रगीताला स्वरबद्ध केले होते. हे राष्ट्रगीत गुरुदेव टागोर यांनीनच लिहिले होते. (Lata Mangeshkar)
त्याकाळी श्रीलंकेतील बव्हंशी चित्रपटांची निर्मिती आपल्या दक्षिणेकडील राज्यात व्हायची या चित्रपटाचे देखील सर्व शूट आणि रेकॉर्डिंग वाहुनी स्टुडिओ मद्रास येथे झाले. Lata Mangeshkar या गाण्याच्या रेकॉर्डिंग साठी मद्रासला रवाना झाल्या होत्या. तिथे त्यांनी सिंहली भाषेतील उच्चारांचा भरपूर अभ्यास केला. त्यानी गाण्यातील मेलडी आणि उच्चार या वर बारीक लक्ष दिले. दक्षिणात संगीतकार यांनी या गाण्याची इंटरल्यूड आणि प्री ल्यूड तसेच वाद्यारचनाचे संयोजन S. Dakshina Moorthy यांएए केले लता दीदींनी सिंहली भाषेतील गोडवा समजून घेतला. सिंहली भाषेतील गाण्याचा अर्थ समजावून घेतला आणि लता मंगेशकर यांनी सिंहली भाषेतील पहिले गाणे गायले. या गाण्याची रेकॉर्डिंग झाल्यानंतर निर्मात्यांनी लता ला तिच्या गाण्याचे मानधन म्हणून पाकीट दिले. लताने ते नम्रपणे स्वीकारले आणि सरळ संगीतकार Ananda Samarakoon यांच्याकडे लता मंगेशकर गेल्या आणि त्यांना नमस्कार केला आणि त्यांच्या हातात ते पाकीट दिले लता मंगेशकर त्यांना म्हणाल्या की ,”गुरुजी, ही माझी गुरुदक्षिणा आहे, त्याचा स्वीकार करा. आपल्या मुळे मला सिंहली भाषेत गायची संधी मिळाली, हा मी माझा सन्मान समजते तुमच्या मुळे मलाही भाषा शिकता आली त्यामुळे माझ्या या गुरुदक्षिणेचा आपण स्वीकार करावा.
हे गाणे शिकण्यासाठी Lata Mangeshkar यांनी खूप परिश्रम घेतले. सिंहली भाषा त्यांच्यासाठी पूर्णपणे नवीन होती. त्यांनी गाण्याचे उच्चारण आणि बारकावे योग्य प्रकारे आत्मसात करण्यासाठी खूप मेहनत घेतली. स्थानिक संगीतकारांच्या मदतीने, त्या गाण्याचे शब्दोच्चार आणि भाव अगदी अचूकपणे शिकल्या Sri Lanka, Ma Priyadara Jaya Bhumi, हे लता मंगेशकर यांचे पहिले सिंहली गाणे रेकॉर्ड केले गेले. हे गाणे खूप लोकप्रिय झाले आणि आजही श्रीलंका आणि इतर ठिकाणी मोठ्या आदराने ऐकले जाते. या गाण्याने लता मंगेशकर यांना श्रीलंकेत आणखी मोठे स्थान मिळवून दिले. लता मंगेशकर यांनी एक अद्वितीय आंतर राष्ट्रीय – सांस्कृतिक कार्याचा पाया रचला. पन्नास च्या दशकाच्या सुरुवातीला दक्षिण आशियात तिच्या स्वरांचा असलेला प्रभाव अधोरेखित करत होते. हे गाणे श्रीलंकेत प्रचंड गाजले आणि आजही लोकप्रिय आहे. आपल्या भावनिक खोली व मेलडीअस सौंदर्यासाठी ओळखले जाणारे, सिंहली संगीताच्या इतिहासातील एक माईल स्टोन ठरले आहे.
this blog was originally published on https://kalakrutimedia.com/lata-mangeshkar-the-story-behind-her-first-song-in-a-sri-lankan-language/
Comments
Post a Comment