१७ वर्षांत Dhurandhar चित्रपट नवा रेकॉर्ड करणार; ‘इतक्या’ तासांचा असणार रणवीर सिंगचा नवा Actionपट

 ‘बॅंड बाजा बारात’ चित्रपटातील दिल्लीचा मुलगा असो किंवा ‘बाजीराव मस्तानी’ (Bajirao Mastani) चित्रपटातील बाजीराव ही भूमिका असूदेत… अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याने आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची मनं कायम जिंकली आहेत… आणि आता आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटातील त्याचा लूक तर विशेष लक्षवेधी आहे… सत्य घटनेवर आधारित कथानकासोबतच हा चित्रपट नवे रेकॉर्ड आपल्या नावावर करण्यासाठी रिलीजपूर्वीज सज्ज झाला आहे… मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूडमधला सर्वात जास्त रनटाईम असणारा धुरंधर चित्रपट ठरणार असून १७ वर्षात असं पहिल्यांदाच घडणार आहे… (Dhurandhar Movie) Box office collection 

‘धुरंधर’ चित्रपटाचा रनटाईम ३ तास ३२ मिनिटे असणार असं सांगितलं जात आहे… बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार सेन्सॉर बोर्डाकडून (CBFC) चित्रपटाला सर्टिफिकेट लवकरच मिळणार असून चित्रपटाचा एक्झॅक्ट रनटाईम अधिकृतरित्या लवकरच जाहिर केला जाईल… इतकंच नाही तर ‘धुरंधर’ रिलीज होण्यापूर्वीच हा चित्रपट २ भागांमध्ये येणार असल्याचंही म्हटलं जात आहे… शिवाय, ‘उरी’ (URI : The Surgical Strike) आणि ‘आर्टिकल ३७०’ (Article 370) च्या मेकर्स कडून लोकांना फार अपेक्षा आहेत… (Dhurandhar Movie Runtime)

जर का ‘धुरंधर’ चित्रपटाचा रनटाईम ३ तास ३२ मिनिटे असेल तर १७ वर्षातील सर्वात जास्त रनटाईम असणारा हा एक चित्रपट नक्कीच असेल…याआधी २००८ मध्ये आलेल्या जोधा अकबर चित्रपटाने हा रेकॉर्ड केला होता ज्याचा रनटाईम ३ तास ३४ मिनिटे होता.. याव्यतिरिक्त ‘एलओसी कारगिल’ (४ तास ०७ मिनिटे), ‘लगान’ (३ तास ४४ मिनिटे) आणि ‘मोहब्बतें’ (३ तास ३५ मिनिटे), सलाम-ए-इश्क (३ तास ३६ मिनिटे), मोहोंबते (३ तास ३५ मिनिटे) अशी बॉलिवूडच्या सर्वात जास्त वेळ असणाऱ्या चित्रपटाची नावं आहेत… (Entertainment News)

================================

हे देखील वाचा : “तुम्हारे पटाखे खत्म हो गए, तो में धमाका शुरु करु”!; रणवीर सिंगच्या Dhurandhar चा ट्रेलर रिलीज

================================

दरम्यान, ‘धुरंधर’ हा स्पाय-थ्रिलर ॲक्शन चित्रपट असून, यात रणवीर सिंग, संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना आणि आर माधवन (R.Madhvan) हे पाच तगडे कलाकार दिसणार आहेत… शिवाय, धुरंधर चित्रपट पहिल्याच आठवड्यात ५० कोटींचं कलेक्शन बॉक्स ऑफिसवर करेल असा अंदाज बांधला जात आहे.. २०१८ मध्ये आलेल्या रणवीर सिंगच्या ‘पद्मावत’ (Padmaavat) या चित्रपटाने भारतात ३०२ कोटी कमावले होते… त्यानंतर आलेल्या चित्रपटांनी भारतात २०० कोटींचं कलेक्शन केलं होतं… त्यामुळे पद्मावत नंतर भारतात ३५० कोटींचा टप्पा पार करणारा रणवीरचा ‘धुरंधर’ चित्रपट असू शकतो अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे…

तसेच, सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाचं कथानक असून सुरुवातीला मेजर मोहित शर्मा यांच्या जीवनावर चित्रपटाची कथा आहे असं म्हटलं जात होतं… मात्र, ‘धुरंधर’चे दिग्दर्शक आदित्य धर (Aaditya Dhar) यांनी अधिकृतरित्या या चित्रपटाची कथा मेजर मोहित शर्मा यांच्या जीवनावर आधारित नसल्याचं जाहिर केलं आहे… आता मग नेमकी ही सत्य घटना कोणती आहे आणि नेमकं रणवीर सिंगच्या कॅरेक्टरचं नाव आहे तरी काय याचा उलगडा ५ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे… (Dhurandhar Cast) Box office collection

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

Original content is posted on https://kalakrutimedia.com/ranveer-singhs-dhurandhar-has-duration-of-over-3-hours-check-out-exact-runtime/









Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

आता मी हिंदीत बोलू?”; मराठीत बोलत असतानाच Kajol का भडकली?