“मलाही कुटुंबाला वेळ द्यायचाय”; विजय देवरकोंडासोबत साखरपुडा झाल्यानंतर Rashmika Mandanna ची प्रतिक्रिया!

 काही दिवसांपूर्वीच एक अफवा खरी ठरली आणि ती म्हणजे अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) यांच्या साखरपुड्याची… बऱ्याच दिवसांपासून सोशल मिडियावर एकाट ठिकाणांवरील दोघांचे सिंग फोटो व्हायरल होत होते… अशातच काही दिवसांपूर्वीच दोघांचा साखरपूडा झाला असून २०२६ मध्ये दोघं लग्नगाठ बांधणार असं म्हटलं जात आहे… अशातच रश्मिकाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल प्रतिक्रिया दिली असून यात ती असं म्हणाली आहे की, “खासगी आयुष्यात कुटुंबीयांसाठी फार वेळ मिळत नसून, मी अति प्रमाणात काम करतेय”… (Entertainment News) Box office collection


रश्मिकाने Gulteला दिलेल्या मुलाखतीत आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबद्दल बरेच खुलाचे केले.. ती म्हणाली की, “मला आठ तासांची झोपही मिळत नाही आणि मली सर्व सामान्य लोकांप्रमाणे ९-६ अशा वेळापत्रकाप्रमाणे काम करायचं आहे”… पुढे याबद्दल ती म्हणाली, “मी खूप काम करतेय आणि मी तुम्हाला हेच सांगेन की, हे अजिबात योग्य नाहीये. असं करू नका. तेच करा, जे करताना तुम्हाला त्रास होत नाही. आठ तासांची झोप पूर्ण करा. विश्वास ठेवा की, त्यामुळे तुम्हाला पुढे खूप आराम मिळेल. मी अलीकडेच काम करण्याच्या तासांबद्दल अनेक प्रतिक्रिया ऐकल्या आहेत. पण, इतकं काम करण्यात अर्थ नाही.(Rashmika Mandanna and Vijay Devarkonda marriage)

दरम्यान, नुकताच रश्मिका मंदाना आणि आयुष्यमान खुराना यांचा ‘थामा’ चित्रपट रिलीज झाला… मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी युनिवर्समधला हा पाचवा चित्रपट होता… आत्तातपर्यंत ‘थामा’ने (Thamma Movie Box Office Collection) बॉक्स ऑफिसवर १०१.३५ कोटींची कमाई केली असून या युनिवर्समधला सर्वात कमी कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे… प्रेक्षकांनी या चित्रपटाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया दिल्या असून अपेक्षापेक्षा पारच कमी कमाई आणि प्रतिसाद ‘थामा’ला मिळाला आहे…  (Bollywood)

================================

हे देखील वाचा : Thamma : हॉरर कॉमेडीच्या नावाने  अपेक्षाभंग करणारा सिनेमा!

================================

येत्या काळात रश्मिका बऱ्याच हिंदी आणि साऊथच्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे… ‘Animal Park’, ‘द गर्लफ्रेंड’ हे तिचे आगामी चित्रपट असून ‘कॉकटेल २’मध्ये देखील ती दिसणार अशा चर्चा रंगल्या आहेत… ‘कॉकटेल २’ मध्ये शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन प्रमुख भूमिकेत असून बरेच इतर कलाकार देखील या चित्रपटात दिसमार असं सांगितलं जात आहे…  २०१२ मध्ये आलेल्या ‘कॉकटेल’ चित्रपटाचा हा सीक्वेल असून पहिल्या भागात सैफ अली खान, दीपिका पादूकोण, डायना पेंटी, बोमन इरानी आणि डिंपल कपाडिया यांच्या प्रमुख भूमिका होत्या… (Rashmika Mandanna movies) Entertainment Mix Masala

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

Original content is posted on https://kalakrutimedia.com/rashmika-mandanna-admits-being-overworked-says-wants-want-to-focus-on-family-life-amid-wedding-rumours-with-vijay-deverakonda/







Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

आता मी हिंदीत बोलू?”; मराठीत बोलत असतानाच Kajol का भडकली?