वर्स्ट शो एव्हर… टोरंटो शोमध्ये ३ तास उशिरा पोहोचलेल्या Madhuri Dixit वर लोकं का भडकले?

 धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) सध्या तिच्या टोरंटोमध्ये झालेल्या शो मुळे खास चर्चेत आहे… या शोला ती तब्बल ३ तास उशिरा पोहोचल्यामुळे प्रेक्षकांच्या रोषाचा तिला सामना करावा लागला… इतकंच नाही तर सोशल मिडियावरही तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं… नेमकी ३ तास टोरंटो येथे आयोजित शोला ती उशिरा का पोहोचली आणि यावर आयोजकांनी काय स्पष्टीकरण दिलं जाणून घेऊयात…Box office collection

तर, २ नोव्हेंबर २०२५ रोजी टोरंटो येथे दिल से… माधुरी या शोचं आयोजन करण्यात आलं होतं… यावेळी शो वेळेवर सुरु झाला होता पण जिच्यासाठी हा शो होता ती ३ तास उशिरा पोहोचली… यावर प्रेक्षक भडकले आणि त्यांनी गदारोळ सुरु केला… तिकीटांचे पैसे परत द्या अशी मागणी देखील लोकांनी केली… या सगळ्या प्रकरणावर आयोजकांनी एक निवेदन जारी केलं… त्यांनी असं म्हटलं की माधुरीच्या स्वतःच्या मॅनजमेन्ट टीमने तिला कॉल टाइम चुकीचा दिला. त्यामुळे तिला उशिर झाला.(Entertainment News)

टोरंटोमधील ग्रेट कॅनेडियन कॅसिनो रिसॉर्टमध्ये या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये ‘स्टेज पेटून उठेल’ आणि  काही गाणी दाखवू असे आश्वासन देण्यात आले होते, परंतु हा शो गा म्युझिक शो ऐवजी टॉक शो होता. शिवाय माधुरी उशिरा पोहोचल्यामुळे २०० डॉलर्स म्हणदे अंदाजे १६०० किमतींची तिकिटे खरेदी करून आलेले चाहते प्रचंड संतापले. आणि त्यामुळे सोशल मिडियावर या शो बद्दल स्कॅम,वर्स्ट शो, पैसे फुटक गेले, आमचे पैसे परत द्या अशा कमेंट लोकांनी केल्या…

दरम्यान, या शोच्या आयोजकांनी जाही केलेल्या निवेदनात असं लिहिलं आहे की, टोरंटो येथील ग्रेट कॅनेडियन कसीनो रिसॉर्टमध्ये आयोजित हा कार्यक्रम ठरलेल्या वेळेवरच सुरू झाला होता. सुरुवातीला ‘इंडियन आयडॉल’च्या गायकांनी स्टेजवर सादरीकरण केले. मात्र, माधुरच्या मुख्य कार्यक्रमाला उशीर झाला. यासाठी आयोजकांनी माधुरीच्या टीमला जबाबदार धरलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की, कार्यक्रमाचे स्वरूप आधीच ठरलेले होते. रात्री ८:३० वाजता प्रश्न-उत्तरांचं सेशन आणि त्यानंतर माधुरीचा ६० मिनिटांचा लाइव्ह परफॉर्मन्स होणार होता. कंपनीच्या प्रोडक्शन टीमने सर्व तयारी केली होती, पण माधुरीच्या मॅनेजमेंट टीमने तिला ‘कॉल टाइम’ चुकीचा दिला. याच कारणामुळे माधुरी रात्री जवळपास १० वाजता पोहोचली आणि त्यामुळे मोठा उशीर झाला. माधुरीचं ३ तास उशीरा येणं आमच्या नियंत्रणाबाहेर होतं. (Madhuri Dixit Toranto Show)

तसेच,’ट्रू साउंड लाइव्ह लिमिटेड’ने असा दावा केला आहे की, त्यांनी स्टेज, लाइटिंग, साउंड या सर्व व्यवस्था व्यवस्थित पूर्ण केल्या होत्या. परंतु बॅकस्टेजच्या इथे उपस्थित असलेले काही लोक, ज्यात श्रेया गुप्ता हिचाही समावेश असून ते त्यांच्या काही खाजगी व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये व्यस्त होते. त्यामुळे कार्यक्रम वेळेवर सुरु होण्यास त्यांनी कोणतंही सहकार्य केलं नाही. जर सगळ्यांनी एकमेकांशी व्यवस्थित संपर्क ठेवला असता, तर हा उशीर टाळता आला असता, असं आयोजकांनी म्हटलं. दरम्यान, अजून घडलेल्या प्रकाराबद्दल माधुरी दीक्षित किंवा तिच्या टीमकडून काहीही स्पष्टीकरण आलं नाही आहे…

================================

हे देखील वाचा : Karishma Kapoor ने ‘दिल तो पागल है’ मध्ये माधुरी दीक्षितसोबत काम करण्यास का दिलेला नकार?

================================

दरम्यान, माधुरी दीक्षित ‘भूल भूलैय्या ३’ या चित्रपटात दिसली होती.. आता लवकरच ती ‘मां बहन’ या चित्रपटात तृप्ती डिमरी हिच्यासोबत पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आहे… याशिवाय ‘टोटल धमाल’, ‘मजा मा’, ‘कलंक’, ‘देढ इश्किया’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये अलीकडे ती दिसली होती…Celebrity interviews

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

Original content is posted on https://kalakrutimedia.com/madhuri-dixits-toronto-show-organisers-reveal-why-she-was-late-after-severe-backlash-on-the-internet-address-claims-of-the-show-being-misleading/







Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

आता मी हिंदीत बोलू?”; मराठीत बोलत असतानाच Kajol का भडकली?