Dharmendra यांची पहिली जयंती ‘या’ खास जागी होणार साजरी; देओल कुटुंबाचा मोठा निर्णय

 बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र (Dharmendra) यांचं २४ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झालं… त्यांच्या एक्झिटमुळे भारतीय चित्रपटसृष्टीत कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे… दु:खद बाब म्हणजे आपल्या लाडक्या धरमजींचं अंत्यदर्शनही त्यांच्या चाहत्यांना मिळालं नाही… देओल कुटुंबाने अत्यंत खासगी पद्धतीने त्यांचे अंत्यसंस्कार केले… आता ८ डिसेंबर रोजी धर्मेंद्र यांची जयंती असून देओल कुटुंबाने ती खास पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे… (Bollywood) Box office collection

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सनी आणि बॉबी देओलने धर्मेंद्र यांची पहिली जयंती धर्मेंद्रंच्या आवडत्या ठिकाणी म्हणजेच खंडाळ्यातील त्यांच्या फार्महाऊसवर साजरी करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय.. आणि यावेळी त्यांच्या चाहत्यांना तिथे प्रवेश दिला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे… धर्मेंद्रंच्या चाहत्यांना त्यांचं अंतिम दर्शन घेता आलं नसल्यामुळे त्यांच्या जयंतीदिनी खंडाळाचं फार्महाऊस चाहत्यांसाठी खुलं करत त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली जाणार आहे…  (Dharmendra Birth Anniversary)

देओल कुटुंबाच्या काही निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कोणताही विशेष फॅन इव्हेंट नसेल. धर्मेंद्र यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी चाहत्यांना फार्म हाऊसमध्ये येता येईल. फार्महाऊसवर येण्यासाठी देओल कुटुंबाकडून विशेष वाहनांची सोयही केली असेल. लवकरच याबद्दल अधिकृत माहिती जाहिर करण्यात येणार असल्याचीही माहिती समोर येत आहे… दरम्यान, खंडाळा येथील फार्महाऊस धर्मेंद्र यांचं आवडतं ठिकाण होतं. ते अनेकदा तिथे कुटुंबासोबत वेळ घालवायचे.

================================

हे देखील वाचा : एकाच वर्षात ७ सुपरहिट चित्रपट देणारे एकमेव अभिनेते म्हणजे He-Man Dharmendra

================================

धर्मेंद्र यांनी ४० वर्षांपेक्षा अधिक काळ फिल्मी दुनियेत घालवला… आता लवकरच त्यांनी अभिनय केलेला शेवटचा चित्रपट ‘इक्कीस’ (Ikkis Movie) रिलीज होणार आहे.. यात धर्मेद्रंसोबत जयदीप अहलावतची प्रमुख भूमिका आहे… २५ डिसेंबर २०२५ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे…Bollywood Tadka

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

Original content is posted on https://kalakrutimedia.com/sunny-deol-and-bobby-deol-to-mark-dharmendras-90th-birthday-at-farmhouse-fans-invited-to-join/











Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Sant Dnyaneshwaranchi Muktai: ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला ज्ञानेश्वरीचा सुरेल सोहळा !