“आता एक सोलो चित्रपट करून बघच”; Drishyam 3च्या दिग्दर्शकाचा अक्षयय खन्नाला सल्ला

 सध्या सगळीकडे एकाच अभिनेत्याची चर्चा आहे आणि तो म्हणजे ‘धुरंधर’ फेम अक्षय खन्ना… आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटातील त्याची रेहमान डकैत ही भूमिता जगभरात गाजली आहे… एकीकडे त्याचं या चित्रपटातील कामासाठी कौतुक होत असताना दुसरीकडे त्याने अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’ (Drishyam 3) मधून एक्झिट घेतल्याचं समोर आलं आहे… चित्रपटाची शुटींग सुरु होण्याआधी अक्षय़ने बॅकआऊट केल्याचं सांगितलं जात असून यावर आता दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी काही महत्वाचं खुलासे केले आहेत.. ते काय म्हणाले आहेत जाणून घेऊयात…Latest Marathi Movies

ETimes ला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक यांनी अक्षय खन्नाबरोबर (Akshaye Khanna) झालेल्या मतभेद आणि मानधनाबद्दल माहिती दिली.. अक्षय़ खन्नाने दृश्यम ३ सोडल्याच्या बातमीवर अभिषेक म्हणाले की, , “हा निर्णय पूर्णपणे माझ्यावर सोडण्यात आला होता. नोव्हेंबरमध्ये चित्रपटाचा करार झाला होता; मात्र शूट सुरू होण्याच्या फक्त पाच दिवस आधी अक्षय खन्नानं चित्रपटातून माघार घेतली. तोपर्यंत त्याचा लूक फायनल झाला होता, कपडे तयार होत होते, स्क्रिप्टचं नॅरेशनही झालं होतं आणि अक्षयला स्क्रिप्ट आवडलीही होती. तरीही त्यानं नंतर चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला”.

पुढे अभिषेक यांनी सांगितलं की, ‘धुरंधर’ प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधीच अक्षयने हा प्रोजेक्ट सोडला होता; मात्र हे पैशांमुळे झालं नव्हतं… अक्षयने या चित्रपटासाठी २१ कोटी रुपयांची फी मागितली होती का, असा प्रश्न अभिषेक यांना विचारला असता, दिग्दर्शकानं नेमकी रक्कम सांगितली नाही. मात्र, अक्षयच्या मानधनावर पुन्हा चर्चा करण्यात आली होती हे स्पष्ट केलं.. करारातील आर्थिक अटी पुन्हा तपासण्यात आल्या. शेवटी दोघांच्या संमतीनं एका रकमेवर सहमती झाली आणि करारावर सही झाली. त्यानंतर मात्र हे सगळं सुरू झालं.” (Bollywood Movie)

पुढे अभिषेक यांनी असंही म्हटलं की, अक्षय खन्ना त्याच्या आजूबाजूच्या लोकांच्या प्रभावाखाली आहे. ती लोकं त्याला सांगत आहेत, “तू आता सुपरस्टार होणार आहेस” आणि “तू फक्त तुझ्यावर केंद्रित असलेले काहीतरी वेगळे प्रोजेक्ट्स करायला हवे. पण माझा त्याला एकच सल्ला आहे. आता एक सोलो चित्रपट करून बघ.  सध्या या व्यक्तीशी बोलण्यात काही अर्थ नाही.. ‘धुरंधर‘नंतर तो वेगळ्याच जगात आहे आणि ‘धुरंधर’च्या यशाबद्दल सांगायचं तर, हे यश एखाद्या एकट्या व्यक्तीचं नाही; तर चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं आहे.”

================================

हे देखील वाचा : अक्षय खन्नाचं मानधन वाढलं; Drishyam 3 मधून बाहेर पडण्याचं कारण आलं समोर

================================

दृष्यम २ मध्ये अक्ष. खन्ना IG तरुण अहलावत या भूमिकेत दिसला होता.. आणि आता ‘दृश्यम ३’ मध्ये त्याला जयदीप अहलावतने रिप्लेस केल्याचं म्हटलं जात होतं… पण याबद्दल स्व:त दिग्दर्शकाने खुलासा करत सांगितलं आहे की या चित्रपटात जयदीप अहलावतसाठी खास वेगळी भूमिका लिहिली आहे… त्यामुळे आता आयजी तरुण अहलावत कोण असणार? की कथेत आणखी ट्विस्ट असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे… अजय देवगणची प्रमुख भूमिका असणारा ‘दृश्यम ३’ चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी रिलीज होणार आहे…

हे देखील वाचा : अक्षय खन्नाचं मानधन वाढलं; Drishyam 3 मधून बाहेर पडण्याचं कारण आलं समोर

================================

दृष्यम २ मध्ये अक्ष. खन्ना IG तरुण अहलावत या भूमिकेत दिसला होता.. आणि आता ‘दृश्यम ३’ मध्ये त्याला जयदीप अहलावतने रिप्लेस केल्याचं म्हटलं जात होतं… पण याबद्दल स्व:त दिग्दर्शकाने खुलासा करत सांगितलं आहे की या चित्रपटात जयदीप अहलावतसाठी खास वेगळी भूमिका लिहिली आहे… त्यामुळे आता आयजी तरुण अहलावत कोण असणार? की कथेत आणखी ट्विस्ट असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे… अजय देवगणची प्रमुख भूमिका असणारा ‘दृश्यम ३’ चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी रिलीज होणार आहे…Box office collection

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

Original content is posted on https://kalakrutimedia.com/jaideep-ahlawat-is-not-replacing-akshaye-khanna-in-drishyam-3-reveals-director-abhishek-pathak/

Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Sant Dnyaneshwaranchi Muktai: ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला ज्ञानेश्वरीचा सुरेल सोहळा !