चित्रपटगृहात धुमाकूळ घातल्यानंतर ‘मुंज्या’ ओटीटी वर येण्यास सज्ज; जाणून घ्या कुठे आणि कधी पाहू शकाल

 


हॉरर कॉमेडी सिनेमे सध्या प्रेक्षकांची पहिली पसंती बनले आहेत. स्त्री, भूल भुलैया 2 आणि रूही सारख्या चित्रपटांनंतर आता मुंज्या सिनेमानेही चाहत्यांची मने जिंकली आहेत. निर्माते दिनेश विजान यांनी हॉरर कॉमेडी बनवण्यात आपल्याकडे खूप कौशल्य आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. आणि म्हणूनटच एका हॉरर कॉमेडी चित्रपट ‘मुंज्या’ प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाला आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात धुमाकूळ घालत असून त्याबद्दल सकारात्मक प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत. दरम्यान, मुंज्याच्या ओटीटी रिलीजच्या चर्चेला वेग आला आहे. कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मुंज्या स्ट्रीम होणार आहे आणि कधी होणार आहे ते आज आपण जाणून घेऊयात.(Munjya OTT Release)

Munjya OTT Release

चित्रपटगृहांमध्ये मुंज्याचे भूत धुमाकूळ घालत असून चित्रपट यशाच्या दिशेने वाटचाल करत आहे. थिएटरनंतर कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मुंज्या ऑनलाइन रिलीज होणार, असा प्रश्नही सर्वांच्या मनात निर्माण होत आहे. आधुनिक युगात ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. चित्रपटगृहानंतर काही दिवसांतच चित्रपट ओटीटीवर येतात आणि प्रदर्शनापूर्वी त्यांचे डिजिटल हक्कही विकले जातात. मुंज्याच्या बाबतीतही असेच घडले आहे. चित्रपटगृहानंतर मुंज्या कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन रिलीज होणार? त्याविषयी आता माहीती समोर आली आहे.

Munjya OTT Release

शर्वरी वाघ आणि अभय वर्मा अभिनीत ‘मुंज्या’चे डिजिटल हक्क ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारने विकत घेतले असून मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घातल्यानंतर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट ऑनलाइन स्ट्रीम केला जाणार आहे. सध्या मुंज्या प्रदर्शित होऊन केवळ काहीच दिवस उलटले असून त्याच्या ओटीटी रिलीजसाठी चाहत्यांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. जवळपास 2 महिन्यांनंतर ‘मुंज्या’ सिनेमा ओटीटीवर रिलीज केला जाऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.(Munjya OTT Release)

===================================

हे देखील वाचा: अखेर ठरलं! ‘मिर्झापूर ३’चा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

===================================

कोणताही मोठा सुपरस्टार नसताना मुंज्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत चांगलीच उंची गाठली आहे. आतापर्यंत प्रदर्शनाच्या 11 दिवसांच्या आत या हॉरर कॉमेडी चित्रपटाने तब्बल 61 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट १०० कोटींचा टप्पाही गाठू शकतो, असे मानले जात आहे. मोना सिंग आणि शर्वरी वाघ यांचा ‘मुंज्या’ हा चित्रपट गेल्या ११ दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाची कमाई रोज आश्चर्यचकित करणारी आहे. अलीकडच्या काळात बड्या स्टार्सचे सिनेमे १० दिवस टिकू शकत नाहीत मात्र ‘मुंज्या’ सिनेमा याला अपवाद ठरताना दिसत आहे.

Original content is posted on: https://kalakrutimedia.com/munjya-is-all-set-to-hit-ott-screens-find-out-where-and-when-you-will-be-able-to-see-info/

Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते