Bigg Boss 18 चा पहिला प्रोमो आला समोर; यंदा घरात होणार ‘टाइम चा तांडव’…

 




बिग बॉस’चे चाहते बऱ्याच दिवसांपासून त्याच्या 18 व्या सीझनची वाट पाहत होते. दरम्यान, शो मेकर्सकडून चाहत्यांना एक मोठे सरप्राईज देण्यात आले आहे. ‘बिग बॉस 18’चा पहिला प्रोमो रिलीज झाला आहे, ज्यामुळे चाहत्यांची शोसाठी उत्सुकता वाढली आहे. यावेळी या शोची थीम भविष्य आणि टाइम म्हणजे वेळेवर आधारित आहे. प्रोमो खूप खास आणि इंटरेस्टिंग दिसत आहे. यासोबतच सलमान खान होस्ट करण्याबाबत जे काही कयास लावले जात होते, तेही आता संपुष्टात आले आहेत.(Big Boss 18 Promo) Bollywood masala

Big Boss 18 Promo

सलमान खानने आपल्या इन्स्टा स्टोरीवर बिग बॉस 18 चा प्रोमो शेअर केला आहे, ज्यात म्हटले आहे की, यावेळी थीम टाइम भविष्य यावर आधारित असेल. लोकांना काहीतरी नवीन पाहायला मिळावं यासाठी बिग बॉस दरवर्षी एक नवीन थीम घेऊन चाहत्यांसमोर आणतो. या प्रोमोबद्दल बोलायचे झाले तर त्याची सुरुवात सलमान खानपासून होते ज्यात तो म्हणतो आहे की ‘बिग बॉस देखेंगे घर वालों का फ्यूचर…अब होगा टाइम का तांडव’’. प्रोमो शेअर करताना कॅप्शन देण्यात आलं आहे की, ‘होगी एंटरटेनमेंट की पुरी विश, जब टाइम का तांडव लेकर आयेगा बिग बॉस में एक नया आयेगा. तुम्ही १८ व्या सीझनसाठी तयार आहात का?”

Big Boss 18 Promo

या सीझनला सलमान खान होस्ट करणार असल्याचे प्रोमो व्हिडिओवरून स्पष्ट झाले आहे. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये सलमानचा आवाज ऐकू येत आहे, जो त्याने व्हॉइस ओव्हरसाठी दिला आहे. ‘बिग बॉस 18′च्या पहिल्या प्रोमो व्हिडिओमध्ये काही खास आणि वेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहते त्यावर सातत्याने कमेंट करत आहेत. तसेच बिग बॉस 18 ट्विटरवर ट्रेंड होत आहे, प्रत्येकजण शोसाठी आपली उत्कंठा व्यक्त करत आहे.(Big Boss 18 Promo)

================================

हे देखील वाचा: अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांनी गुपचूप केले लग्न; दोघांचे फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा…

================================

एका युजरने या प्रोमोवर कमेंट करत लिहिलं, “माझ्यासारखा एक्साइड कोण आहे?” आणखी एका युजरने लिहिले की, दोन-तीन महिन्यांचे मनोरंजन ठरलेले असते. त्याचप्रमाणे सलमान खानला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी अनेक चाहते ही उत्सुक आहेत. Bollywood masala.

Original content is posted on: https://kalakrutimedia.com/the-first-promo-of-bigg-boss-18-is-out-info/


Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते