Elu Elu Movie Trailer: प्रेमाच्या सुरेख आठवणींची गोष्ट ‘इलू इलू’ चित्रपटाचा रंजक ट्रेलर प्रदर्शित


Elu Elu Movie Trailer: आठवणी म्हणजे कधीही न विसरणारी गोष्ट. गेलेले क्षण परत येत नाहीत पण आपल्याला त्या आपल्या मनाच्या  कोपऱ्यात  सांभाळून जपून ठेवता येतात. तारुण्यातल्या भावविश्वाचा हळवा कप्पा प्रत्येकाने आपल्या मनाशी जपलेला असतो. यासोबत मैत्री, प्रेम,या सगळ्यांचा नव्याने अर्थ उमगायला लागलेला असतो.  पहिल्या प्रेमाच्या आठवणी  प्रत्येकासाठी खास असतात.  प्रेमाच्या याच सुरेख आठवणींची गोष्ट घेऊन आलेल्या ‘इलू इलू’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच कलाकारांच्या उपस्थित संपन्न झाला. ९० दशकाचा माहोल, विंटेज कार मधून कलाकारांची ग्रँड एंट्री अशा ‘फुल ऑन’ अंदाजात हा सोहळा रंगला. फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ हा मराठी चित्रपट ३१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.(Elu Elu Marathi Movie Trailer)

Elu Elu Marathi Movie Trailer

प्रेम  जगातली सगळ्यात सुंदर भावना. ती शब्दात व्यक्त करणं अवघडच. प्रेम कोणी आणि कोणावर केल यावर ते चूक की बरोबर हे नाही ठरवता येत. प्रत्येकजण आयुष्यात कोणत्या ना कोणत्या वळणावर प्रेमात पडतोच. प्रेमाला वय, काळाचे भान नसते असे म्हणतात.नव्याने प्रेमाची चाहूल लागलेल्या प्रेमाची लव्हेबल गोष्ट ‘इलू इलू’ चित्रपटात पहाता येणार आहे. नात्यातील हळूवार क्षणांना रेखाटणारा फ्रेश चित्रपट प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची नक्की आठवण करून  देईल असा विश्वास  दिग्दर्शक अजिंक्य बापू फाळके यांनी याप्रसंगी व्यक्त केला. ‘इलू इलू’ च्या निमित्ताने वेगळी भूमिका आणि मराठीत काम करायला मिळाल्याचा आनंद एली आवराम हिने यावेळी बोलून दाखविला.     

Elu Elu Marathi Movie Trailer

बॉलीवूड गाजवलेली प्रसिद्ध अभिनेत्री एली आवराम हिने ‘इलू इलू’ चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे. ‘मिकी व्हायरस’ या चित्रपटाद्वारे हिंदीत दाखल झालेल्या एलीनं आजवर ‘किस किस को प्यार करूं’, ‘नाम शबाना’, ‘पोस्टर बॅाईज’, ‘बाझार’, ‘मलंग’, ‘कोई जाने ना’, ‘गुडबाय‘ या हिंदी चित्रपटांसोबतच तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. ‘इलू इलू’ या चित्रपटात एली ‘मिस पिंटो’ या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ही व्यक्तिरेखा यशस्वीपणे साकारण्यासाठी एलीनं खूप मेहनत घेतली आहे.(Elu Elu Marathi Movie Trailer)

=================================

हे देखील वाचा: Fussclass Dabhade Trailer: आपल्या माणसांनी भरलेल्या घराची, दाभाडे कुटुंबाची इरसाल गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला!

=================================

एली सोबत मीरा जगन्नाथ, श्रीकांत यादव, कमलाकर सातपुते, वीणा जामकर, आरोह वेलणकर, वनिता खरात,अंकिता लांडे, निशांत भावसार, गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत हे कलाकार चित्रपटात आहेत. ‘इलू इलू’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत.  छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे. bollywood tadka

Original content is posted on : https://kalakrutimedia.com/interesting-trailer-of-marathi-movie-elu-elu-out-info/


 

Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Preamachi Gosht 2: प्रेमाचा इफेक्ट असणारी, मनातली स्पेशल गोष्ट; ’प्रेमाची गोष्ट २’ जून २०२५ मध्ये होणार प्रदर्शित