Operation Sindoor : देशातील तणाव पाहता राजकुमार रावचा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार नाही!

 

पहलगाममध्ये मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेश सिंदूर (Operation Sindoor) मोहिम राबवून सिंदूर ७ मे २०२५ रोजी पाकिस्तानातील ९ दहशतवादी कॅम्प्सना उधळून लावत भारतातील महिलांचं कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांना चांगलाच धडा शिकवला. एकीकडे भारत-पाकिस्तान युद्धाचं वातावरण तयार झाल्यामुळे वाढता तणाव लक्षात घेता काजकुमार रावचा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित न होता थेट ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित करण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे. (Bollywood) Latest Marathi Movies

मॅडॉक फिल्म्सच्या या ‘भूल चुक माफ’ चित्रपटात राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि वामिका गब्बी (Wamiqua Gabbi) प्रमुख भूमिकेत आहेत. दरम्यान, चित्रपट थिएटरऐवजी ओटीटीवर प्रदर्शित करण्याची माहिती मॅडॉकने सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे. त्यांनी जाहिर केलेल्या निवेदनात असं लिहिलं आहे की, “देशात सध्या घडणाऱ्या घटनेची पार्श्वभूमी आणि देशातील मॉक ड्रिल्सचे प्रशिक्षण लक्षात घेता ‘भूल चूक माफ’ हा चित्रपट १६ मे रोजी प्राइम व्हिडीओवर वर्ल्डवाइड प्रीमियर करण्यात येईल. आम्हाला चित्रपटगृहांत प्रेक्षकांबरोबर हा अनुभव शेअर करायची अपेक्षा होती, पण राष्ट्र प्रथम ही भावना सर्वोच्च आहे.” (Entertainment)

दरम्यान, गेले अनेक दिवस चर्चेत असणारा ‘भूल चुक माफ’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत नसल्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली असली तरी देशाच्या हितासंदर्भात घेतलेल्या या निर्णयाचं कौतुक देखील केलं जात आहे. वामिका गब्बीने अमर उजालाशी बोलताना म्हटलं की, “देशातील परिस्थिती पाहता, चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित करणे शक्य नव्हते. आम्ही आमच्या कायम देशाबरोबर आहोत.” (Bollywood news) Box office collection

================================

हे देखील वाचा: Deepika Padukone : “इंडस्ट्रीच्या बाहेरची अशी भावना….”; दीपिकाचं महत्वाचं विधान

=================================

‘भूल चुक माफ’ हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून दिग्दर्शन करण शर्मा यांनी केलं आहे. चित्रपटामध्ये राजकुमार राव आणि वामिका गब्बी व्यतिरिक्त सीमा पाहवा संजय मिश्रा, झाकीर हुसेन, सीमा भार्गव पाहवा, रघुबीर यादव, इश्तियाक खान, अनुभा फतेह पुरिया, जय ठक्कर आणि प्रगती मिश्रा आदी कलाकारांच्या विशेष भूमिका आहेत. (Bhool chuk maaf movie cast)

Original content is posted on https://kalakrutimedia.com/bhool-chuk-maaf-movie-will-not-be-releasing-in-theatre-marathi-info/

Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Preamachi Gosht 2: प्रेमाचा इफेक्ट असणारी, मनातली स्पेशल गोष्ट; ’प्रेमाची गोष्ट २’ जून २०२५ मध्ये होणार प्रदर्शित