धनुष – क्रितीच्या Tere Ishq Mein ला प्रेक्षकांची पसंती; केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

 ‘रांझना’ (Raanjhanaa) चित्रपटाच्या यशानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एल राय यांनी ‘तेरे इश्क में’ (Tere Ishq Mein) या चित्रपटातून इंटेन्स लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे… धनुष (Dhanush) आणि क्रिती सेनॉन (Kriti Sanon) यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट २८ नोव्हेंबर २०२५ रोजी देशभरात रिलीज झाला… आजच्या तरुणाईला प्रेमाची वेगळी परिभाषा सांगणारा हा चित्रपट असून प्रेक्षकांनी या प्रेमकथेला भरघोस प्रतिसाद दिला आहे.. सध्याच्या हॉरर, कॉमेडी, Action, ड्रामा चित्रपटांच्या यादीत लव्हस्टोरीज बाजी मारुन जात आहेत…’सैय्यारा’ नंतर आणकी एक चित्रपट तरुणाईला आवडला आहे हे विशेषच… जाणून घेऊयात तेरे इश्क में चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमी केली आहे… (Entertainment News) Bollywood tadka

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार‘तेरे इश्क में’ चित्रपटाने पहिल्या दिवशी १६ कोटी, दुसऱ्या दिवशी १७ कोटी, तिसऱ्या दिवशी १९ कोटी कमवत आत्तापर्यंत एकूण ५२ कोटींची तगडी कमाई केली आहे… विशेष म्हणजे २०२५ मध्ये पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा समावेश झाला आहे…  ‘रांझणा’ आणि ‘अतरंगी रे’ नंतर आनंद एल राय यांच्यासोबतच धनुषचा हा तिसरा चित्रपट असून पहिल्यांदाच क्रिती-धनुष ही जोडी आणि क्रिती-धनुष-आनंद ही दिग्दर्शक आणि कलाकरांची जोडी झळकली आहे…  (Tere Ishq Mein Box office Collection)

================================

हे देखील वाचा : Dhanush आणि ऐश्वर्या रजनीकांतची ‘अशी’ होती लव्हस्टोरी!

================================

‘तेरे इश्क में’ चित्रपटात धनुष आणि क्रिती सेनॉन यांच्या प्रमुख भूमिका आहेत… त्याचसोबत या चित्रपटात प्रकाश राज, टोटा रॉय चौधरी, सुशील दहिया असे कलाकारही झळकले आहेत… तर, या चित्रपटानंतर क्रिती ‘कॉकटेल २’ (Cocktail 2) चित्रपटात दिसणार आहे.. याशिवाय मनिष मल्होत्रा दिग्दर्शित मीना कुमारी यांच्या बायोपिकमध्ये ती ट्रेजेडी क्वीन मीना कुमारी यांची भूमिका साकारण्याची शक्यता आहे…  (Meena Kumari Biopic) Bollywood masala

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

Original content is posted on https://kalakrutimedia.com/the-dhanush-and-kriti-sanon-romantic-drama-tere-ishq-mein-crosses-rs-50-crore-mark-on-opening-weekend-aanad-l-rais-directorial-outshines-competition/










Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Sant Dnyaneshwaranchi Muktai: ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला ज्ञानेश्वरीचा सुरेल सोहळा !