Raid 2: अमेय पटनायकची ७५ वी रेड यशस्वी होईल?
२०२५ हे वर्ष अजय देवगणचं (Ajay Devgan) आहे असं म्हटलं पाहिजे… वर्षाची सुरुवात त्याच्या आझाद चित्रपटाने झाली होती आणि त्यानंतर आता बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘रेड २’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ‘रेड २’ (raid 2) ची आणि त्यातील अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्या पात्रांची चर्चा जोरदार सुरु आहे. ‘एक व्हिलिन’नंतर रितेश (Ritesh Deshmukh) खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.. आणि आता अमेय पटनायक ७५ वी रेड मारण्यास सज्ज झाला आहे… जाणून घ्या काय आहे Raid 2च्या ट्रेलरमध्ये…(Entertainment) २०१८ मध्ये आलेल्या ‘रेड’च्या पहिल्या भागात आपण पाहिलं होतं की, लखनऊ शहरातील ताऊजींच्या घरी इन्कम टॅक्स ऑफिसर अमेय पटनायक यशस्वी छापा मारुन त्यांना जेरबंद करतो. ‘रेड २’ (Raid 2) मध्ये हेच ताऊजी आता जेलमधून अमेय पटनायकच्या सर्व हालचालींची माहिती घेत असताना दिसत आहेत. ७४ यशस्वी रेड करणारा अमेय पटनायक आता ७५ वी रेड मारण्यास दादाभाईच्या घरी मारताना दिसणार आहे. पण दादाभाईच्या हुशारीपुढे अमेय ही रेड मारण्यात यशस्वी होणार की अयशस्वी हे चित्रपट रिलीज झाल्यावरच कळेल. (Bollywood update...