Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका; भारतीय चित्रपटसृष्टीत येत्या काळात बदल घडणार?

 २०२५ हे वर्ष भारतीय चित्रपटसृष्टीने गाजवलं. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाने २०२५ची जोरदार सुरुवात केली. ६०० कोटींचा टप्पा गाठत विकी कौशलच्या करिअरमधला हा बेस्ट चित्रपट ठरला. त्यानंतर ‘कांतारा २’, ‘रेड २’, ‘जॉली एल एल बी ३’ अशा हिंदी आणि साऊथ चित्रपटांनी प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन केलं… पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? या प्रत्येक चित्रपटात चर्चा झाली ती नायकाची आणि दिग्दर्शकांची… वर उल्लेख केलेल्या एकाही चित्रपटाचं दिग्दर्शन फिमेल डिरेक्टरने केलं नव्हतं… पण २०२६ हे वर्ष वेगळं ठरणार आहे… जानेवारीत राणी मुखर्जीची प्रमुख भूमिका असणारा ‘मर्दानी ३’ (Mardaani 3) आधीच रिलीज होऊन त्याने फिमेलओरियेन्टेड चित्रपटांची सुरुवात केली आहेच आणि आता ४ पुरुष दिग्दर्शकांच्या बिग बजेट चित्रपटांसमोर एक फिमेल डिरेक्टर उभी ठाकणार आहे.

२०२६ आणि २०२७ या वर्षात हिंदी आणि साऊथमधील सुपस्टार कलाकारांचे बिग बजेट चित्रपट रिलीज होणार आहेत. यात आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २’ (Dhurandhar 2), नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ (Ramayana), संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘स्पिरिट’ (SPirit), एस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘वाराणसी’ (Varanasi) आणि गीतू मोहनदास दिग्दर्शित ‘टॉक्सिक’ (Toxic : A Fairy Tale For Grown-ups) या चित्रपटांचा यात समावेश आहे… या ४ पुरुष दिग्दर्शकांच्या या मोठ्या चित्रपटांसमोर ‘टॉक्सिक’ सारखा बोल्ड विषय एक स्त्री दिग्दर्शिका सादर करणार आहे.. KGF फेम यश या चित्रपटाचा प्रमख नायक असून या चित्रपटाच्या टीझरमधील अत्यंत बोल्ड सीनवरुन हा चित्रपट एका वेगळ्याच दर्जाचा असणार याचा अंदाज आला आहे… खरं तर Viloence आणि एस्कस्ट्रीम बोल्ड सीन्स असणाऱे चित्रपट आजवर पुरुष दिग्दर्शकांनीच सादर केले… परंतु, आता गीतू ‘टॉक्सिक’ चित्रपटाच्या दिग्दर्शनातून ती चौकट मोडित काढून नवा पायंडा पाडणार हे निश्चित आहे.

महत्वाचं म्हणजे आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २’ चित्रपटासोबत गीतू यांचा ‘टॉक्सिक’ हा चित्रपट क्लॅश होणार आहे… हे दोन्ही चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी रिलीज होणार असून प्रेक्षक आता कोणत्या चित्रपटाला अधिक पसंती देणार हे पाहण्याची उस्तुकता नक्कीच वाढली आहे… २०२५ या वर्षात ‘धुरंधर’ने कमालच केली होती… ८५० कोटी बॉक्स ऑफिसवर पार करत बॉलिवूडचा हा सर्वाधिक कमाई करणारा आणि ८०० कोटी क्लब सुरु करणारा पहिला चित्रपट ठरला… त्यामुळे आता धुरंधर २ कडूनही प्रेक्षकांचा फार अपेक्षा आहेत

तर दुसरीकडे, ‘केजीएफ’ चित्रपटामुळे यश याचं जगभरात फॅनफॉलॉइंग वाढलं आहे… आता या यित्रपटात त्याचा कोणता वेगळा अंदाज दिसणार हे पाहण्यासाठी लोकं आतुर आहेत… तसेच, २०२६ मध्ये ‘टॉक्सिक’ नंतर त्याचा ‘रामायण’ (Ramayana) चित्रपटही रिलीज होणार असून या नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात यश (Yash) रावणाची भूमिका साकारणार आहे… बॉलिवूडमधला हा सर्वाधिक बजेट असणारा पहिला चित्रपट असून जवळपास ४००० कोटी इतकं याच बजेट असल्याचं सांगितलं जात आहे… तसेच, ‘रामायण’ हा यश याचा बॉलिवूड डेब्यु देखील असणार आहे.

दरम्यान, संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘स्पिरिट’ (Spirit) हा चित्रपट २०२७ मध्ये रिलीज होणार असून यात प्रभास (Prabhas)आणि तृप्ती डिमरी (Tripti Dimri) प्रमुख भूमिकेत असणार आहेत… सुरुवातीला दीपिका पादूकोण (Deepiak Padukone) आणि प्रभास ही जोडी यात दिसणार होती, मात्र काही कारणांमुळे दीपिकाला यात रिप्लेस करत तृप्तीने ही भूमिका पटाकवली… ‘अॅनिमल’ चित्रपटानंतर संदीप यांच्यासोबत तृप्तीचा हा दुसरा चित्रपट असणार आहे… तर, एस.एस.राजामौली यांचा ‘वाराणसी’ (Varanasi) हा १००० कोटींचं बजेट असणारा चित्रपट असून यात महेश बाबू (Mahesh Babu) आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) लीड कलाकार असणार आहेत… बॉलिवूडपासून दूर गेल्यानंतर तब्बल ४-५ वर्षांनी प्रियांकाने कमबॅक केलं असून तिने बॉलिवूडऐवजी साऊथ चित्रपटांना प्राधान्य दिलं आहे… त्यामुळे आता Male Oriented Directorial चित्रपटांच्या यादीत गीतू मोहनदास आपली छाप उमटवणार का? हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे.

this blog was originally published on : https://kalakrutimedia.com/gettu-mohandas-will-compete-with-4-male-director-from-ramayana-to-dhurandhar-2/

Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Sant Dnyaneshwaranchi Muktai: ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला ज्ञानेश्वरीचा सुरेल सोहळा !

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष