MyLek Movie Song: ‘मायलेक’ मधील बहारदार गाणे ‘पुन्हा बालपण’ प्रदर्शित

 आई आणि मुलीच्या सुंदर नात्यावर भाष्य करणारामायलेक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटातील एक बहारदार गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. प्रत्येकाला आपल्या बालपणात घेऊन जाणाऱ्या या गाण्याचे बोल ‘पुन्हा बालपण‘ असे आहेत. पंकज पडघन यांनी गायलेल्या या सुरेल गाण्याला नेहा आदर्श शिंदे यांची साथ लाभली आहे. तर क्षितिज पटवर्धन यांचे भावपूर्ण शब्द लाभलेल्या या गाण्याला संगीत पंकज पडघन यांनीच दिले आहे. हे गाणे सोनाली खरे, उमेश कामत यांच्यावर चित्रीत झाले असून हे गाणे ऐकायला जितके श्रवणीय आहे तितकेच पाहायलाही सुखद आहे.(MyLek Movie Song)

MyLek Movie Song
MyLek Movie Song

ब्लुमिंग लोटस प्रॉडक्शन, सोनाली सराओगी प्रस्तुत ‘मायलेक‘ हा चित्रपट येत्या १९ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. प्रियांका तन्वर दिग्दर्शित या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, शुभांगी लाटकर, संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सोनाली आनंद निर्मित या चित्रपटाचे कल्पिता खरे, बिजय आनंद सहनिर्माते आहेत. तर नितीन प्रकाश प्रकाश वैद्य ‘मायलेक’चे असोसिएट प्रोड्युसर आहेत.

MyLek Movie Song
MyLek Movie Song

गाण्याबद्दल सोनाली खरे म्हणते, ” आपल्या सर्वांनाच बालपणात घेऊन जाणारे, जुन्या दिवसांची आठवण करून देणारे हे गाणे आहे. या गाण्याचे बोल खूपच सुंदर आहेत. क्षितिजने अतिशय हळव्या पद्धतीने हे शब्द गुंफले आहेत. प्रत्येक कडव्यात एक भावना दडलेली आहे. नॅास्टेल्जिक बनवणारे हे गाणे धमाल, मजामस्तीने भरलेले आहे. खास माणसांच्या खास आठवणीत रमलेल्या प्रत्येकासाठी हे गाणे आहे.”(MyLek Movie Song)

================================

हे देखील वाचा: Bohada Marathi Movie: प्राचीन रुढीची परंपरा आणि नव्याची गुढी बांधायला येतो आहे मुखवट्यांचा ‘बोहाडा’

================================

काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर दाखल झाला होता. या ट्रेलर लाँच सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील अमृता खानविलकर, हर्षदा खानविलकर, संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत प्रियांका तन्वर दिग्दर्शित या चित्रपटाची सोनाली आनंद निर्माती असून या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Original content is posted on: https://kalakrutimedia.com/mylek-movie-song-punha-balpan-is-out-info/

Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते