Sayaji Shinde Health Update: अभिनेते सयाजी शिंदे रुग्णालयात दाखल;स्वतः व्हिडिओ शेअर करत दिली तब्येतीबद्दल माहीती

 

ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांना छातीत दुखू लागल्याने ११ एप्रिल रोजी सातारा येथील प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तात्काळ त्यांची अँजिओप्लास्टी केली, त्यानंतर अभिनेत्याची प्रकृती आता नॉर्मल आहे. सयाजी शिंदे यांची तब्येत अचानक बिघडल्याने कुटुंबात एकच खळबळ उडाली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात धाव घ्यावी लागली. छातीत तीव्र वेदना होत असल्याच्या तक्रारीनंतर डॉक्टरांनी सयाजी शिंदे यांच्या हृदयाची तपासणी केली असता त्याच्या तीन रक्तवाहिन्यांपैकी एका रक्तवाहिन्यामध्ये ९९ टक्के ब्लॉक असल्याचे आढळले. प्रकृती खालावल्याने त्यांनी आणखी अनेक चाचण्या ही केल्या असता डॉक्टरांना त्यांच्या धमनीमध्ये ही अडथळा निर्माण झाल्याचे आढळून आले.(Sayaji Shinde health Update)

Sayaji Shinde health Update
Sayaji Shinde health Update

यानंतर डॉक्टरांनी तत्काळ अभिनेत्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली, ज्याच्या मदतीने सयाजी शिंदे यांचा जीव वाचू शकला. अँजिओप्लास्टीनंतर आता नॉर्मल झालेल्या अभिनेता शिंदेने सोशल मीडियावर आपल्या तब्येतीची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आणि लवकरच त्यांच्या मनोरंजनासाठी परतणार असल्याचे ही सांगितले.

Sayaji Shinde health Update
Sayaji Shinde health Update

त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ‘हाय, मी एकदम ठीक आहे, माझे सर्व चाहते, माझे हितचिंतक माझ्यासोबत आहेत, आता काळजी करण्याचे कारण नाही, लवकरच तुमच्या मनोरंजनासाठी उपस्थित राहीन, धन्यवाद…!!’ अनेक चाहते आणि सोशल मिडीयांवरील लोकांना अभिनेत्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. सयाची शिंदे यांची प्रकृती स्थिर असून येत्या दोन दिवसांत त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.(Sayaji Shinde Helth Update)

================================

हे देखील वाचा: Salman Khan’s House: घरावर झालेल्या गोळीबारावर सलीम खान यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, संपूर्ण कुटुंब दुसरीकडे शिफ्ट होणार?

================================

अनेक मोठ्या मराठी सिनेमांसह त्यांनी ‘शूल’, ‘सिंघम’, ‘नेनोक्कादिन‘ आणि ‘अंतम : द फायनल ट्रुथ‘ या सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारा शिंदे नुकताच नेटफ्लिक्सच्या ‘किलर सूप‘ या वेब सीरिजमध्ये दिसला होता. सध्या ते अनेक आगामी प्रोजेक्ट्समध्ये गुंतले ही आहेत. हिंदी, मराठी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये अनेकदा खलनायकाच्या भूमिकेत झळकणारे अभिनेता म्हणून त्यांना ओळखले जाते. अभिनेत्याचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर चाहत्यांनी आता सुटकेचा नि:श्वास टाकला आहे, त्याच्या रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातमीने सगळेच चाहते अस्वस्थ झाले होते.

Original content is posted on: https://kalakrutimedia.com/actor-sayaji-shinde-hospitalised-he-himself-shared-a-video-about-his-health-info/

Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते