Shraddha Kapoor बनली सेल्स गर्ल, कमावले इतके पैसे, म्हणाली- ‘सोपे वाटते, पण…’

 

आपल्या जबरदस्त अभिनय, गायन आणि फॅशन कौशल्याबरोबरच श्रद्धा कपूर एक उत्तम सेल्स वुमन देखील आहे, हे तिने नुकत्याच केलेल्या व्हिडिओतून सिद्ध केले आहे. श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती सेल्स वुमन म्हणून काही दागिने विकताना दिसत आहे. श्रद्धा कपूर सध्या तिच्या दागिन्यांच्या ब्रँडच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या व्हिडिओ मध्ये ती नुकतीच सेल्स वुमन म्हणून दिसली. तिने आपल्या ब्रँडच्या पुणे स्टोअरमध्ये सेल्सवुमन असल्याचे भासवून काही दागिने विकले. श्रद्धा कपूरने सेल्स वुमन बनून तब्बल 10,900 रुपयांचा माल विकला.(Actress Shraddha Kapoor)

Actress Shraddha Kapoor
Actress Shraddha Kapoor

श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामवर तिचा व्हिडिओ शेअर केला आहे आणि व्हिडिओमध्ये तिने तिच्या स्टोअरमध्ये सेल्स वुमन म्हणून काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत श्रद्धा कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “10 पैकी किती गुण? माझी पहिली विक्री @palmonas_official स्टोअर!! पुणे”

Actress Shraddha Kapoor
Actress Shraddha Kapoor

नुकतेच श्रद्धा कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर डोंगरावरील तिचे अनेक क्यूट फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्री श्रद्धा कपूर नुकतीच कडक उन्हात डोंगरांच्या सहलीला गेली होती. रविवारी तिने इन्स्टाग्रामवर सुट्टीचे काही सुंदर फोटो पोस्ट केले. श्रद्धा कपूरचे हे फोटो पाहून स्पष्ट पणे म्हणता येईल की, तीने तिच्या सुट्ट्यां खरचे खूप एन्जॉय केल्या आहेत.(Actress Shraddha Kapoor)

===========================

हे देखील वाचा: Chef Kunal Kapur Divorce: शेफ कुणाल कपूरला मिळाला घटस्फोट,पत्नीचा कंटाळा आल्याने वेगळं होण्याची केली होती मागणी 

===========================

श्रद्धाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर श्रद्धा कपूर मार्च 2023 मध्ये लव रंजनच्या ‘तू झूठी मैं मक्कर‘ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत रणबीर कपूर होता. श्रद्धा आणि रणबीरची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना ही आवडली. श्रद्धा कपूर लवकरच राजकुमार राव, पंकज त्रिपाठी आणि अपारशक्ती खुराना यांच्यासोबत हॉरर कॉमेडी ‘स्त्री २’ मध्ये दिसणार आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘स्त्री‘ ब्लॉकबस्टर ठरला होता, त्यानंतर आता त्याचा सिक्वेल प्रेक्षकांसमोर येणार आहे

Original content is posted on: https://kalakrutimedia.com/shraddha-kapoor-becomes-sales-girl-earns-so-much-money-says-sounds-easy-but-info/

Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Preamachi Gosht 2: प्रेमाचा इफेक्ट असणारी, मनातली स्पेशल गोष्ट; ’प्रेमाची गोष्ट २’ जून २०२५ मध्ये होणार प्रदर्शित