आलिया-रणबीरने खास पद्धतीने साजरा केला मदर्स डे, अभिनेत्रीने शेयर केलेला फोटो होतोय तुफान व्हायरल

 आलिया-रणबीरने खास पद्धतीने साजरा केला मदर्स डे, अभिनेत्रीने शेयर केलेला फोटो होतोय तुफान व्हायरल

मदर्स डेच्या निमित्ताने बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी आपल्या आई बरोबरचे फोटो व्हीडीओ शेअर करून त्यांच प्रेम व्यक्त केलं आहे. कुणी आईसोबतचा लहानपणीचा फोटो शेअर करत प्रेमाने चिठ्ठी लिहिली, तर कुणी लेटेस्ट फोटो शेअर आठवण शेअर केली. दरम्यान, रात्री उशिरा अभिनेत्री आलिया भट्टनेही आपला मदर्स डे स्पेशल फोटो शेअर करत सोशल मीडियावर चाहत्यांचे संपूर्ण लक्ष वेधून घेतले. या फोटोमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर दोघेही आपल्या आईला मिठी मारताना दिसत आहेत.(Alia-Ranbir Mothers Day Photo)

Alia-Ranbir Mothers Day Photo

आलिया भट्टने काल रात्री उशिरा तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्या फोटोमध्ये आलिया आणि रणबीरसोबत नीतू कपूर, सोनी राजदान आणि शाहीन भट्ट पहायला मिळत आहेत. पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून बाल्कनीत बसलेल्या आनंदी कुटुंबाप्रमाणे पोज देताना सर्वजण दिसत आहेत. आलियाने फोटोसोबत सुंदर कॅप्शनही लिहिलं आहे. आलियाने लिहिले आहे की,- ‘माझ्या मौल्यवान लोकांसोबतचे मौल्यवान क्षण’.

Alia-Ranbir Mothers Day Photo

मदर्स डे सेलिब्रेशनच्या या खास फोटोमध्ये आलिया भट्ट पांढऱ्या रंगाच्या लाँग शर्ट ड्रेसमध्ये आई सोनी राजदानच्या खांद्यावर डोकं ठेवून पोज देताना दिसत आहे. रणबीर कपूर त्याची आई नीतू कपूरसोबत पांढर्या-काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये पोज देताना दिसत आहे. या फोटोत नीतू कपूर यांनी हातात पांढरी छत्री ही धरलेली दिसत आहे.(Alia-Ranbir Mothers Day Photo)

==============================

हे देखील वाचा: SRK चा मुलगा Aryan Khan ची पहिली वेब सीरिज कधी प्रदर्शित होणार? समोर आली महत्वाची माहीती

==============================

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर च्या मदर्स डे सेलिब्रेशनच्या फोटोत त्यांची गोड मुलगी राहा कपूर ही दिसत नाही. राहाची गोंडस झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर झालेले असतात अशातच आलियाने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षाव होतोय. तसेच आलियाचा मदर्स डे सेलिब्रेशनचा हा क्यूट फोटो सोशल मीडियावर ही प्रचंड व्हायरल होत आहे.

Orignal content is posted on: https://kalakrutimedia.com/alia-bhatt-celebrate-mothers-day-in-a-special-way-see-photo-info/


Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते