लोकप्रिय अभिनेता जय दुधाणे झळकणार स्टार प्रवाहच्या ‘येड लागलं प्रेमाचं’या मालिकेत

  लोकप्रिय अभिनेता जय दुधाणे झळकणार स्टार प्रवाहच्या ‘येड लागलं प्रेमाचं’या मालिकेत

२७ मे पासून रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या येड लागलं प्रेमाचंमालिकेविषयी कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये राया आणि मंजिरी म्हणजेच अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांना आपण भेटलोय. लवकरच मालिकेतलं आणखी एक महत्त्वाचं पात्र म्हणजेच इन्सपेक्टर जय घोरपडे प्रेक्षकांसमोर येणार आहे. जय कामात हुशार असला तरी लाचखाऊ आहे. तो जिथे रहातो तिथे त्याचा दबदबा आहे. लोकांना मदत करणं हे त्याचं कर्तव्य आहे असं तो सांगतो पण एकही काम स्वार्थाशिवाय करत नाही.(Jay Dudhane in Yed Lagal Premach)

Jay Dudhane in Yed Lagal Premach

अडचणीच्या वेळी मदत केल्याचं तो भासवतो पण अडकवणाराही बऱ्याचदा तोच असतो. रिअ‍ॅलिटी शोज गाजवलेला लोकप्रिय अभिनेता जय दुधाणे इन्सपेक्टर जय घोरपडेची भूमिका साकारणार आहे.अभिनेता जय दुधाणे या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच पोलिसाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या अनुभवाविषयी सांगताना तो म्हणाला, ”मी पहिल्यांदा पोलिस इन्सपेक्टरची भूमिका साकारतोय. माझे काका पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांचं मार्गदर्शन मिळत आहे. आव्हान खूप मोठं आहे. व्यायाम माझं पॅशन आहे. या भूमिकेसाठी शरीरयष्ठीवर जास्त मेहतन घेतोय.

Jay Dudhane in Yed Lagal Premach

विशालसोबत याआधी काम केल्यामुळे आमची ओळख होतीच. पूजासोबत पण छान मैत्री जमली आहे. आम्हा तिघांचे सीन्स खूप छान होत आहेत. विशाल आणि पूजा सहकलाकार म्हणून उत्तम आहे. सोबतच नीना कुळकर्णी आणि अतिषा नाईक यांच्यासारखे दिग्गज कलाकार आहेत. या सगळ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळतेय यासाठी मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो.”

==============================

हे देखील वाचा: पुन्हा घुमणार बिग बॉसचा आवाज; ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनचे होस्टिंग करणार ‘हा’ अभिनेता !

===============================

महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी अर्थातच स्टार प्रवाहसोबतची माझी पहिलीच मालिका असल्यामुळे मी जरा जास्त उत्सुक आहे. मालिकेमुळे घराघरात पोहोचता येतं. त्यामुळे प्रेक्षकांची पसंती मिळावी हीच अपेक्षा आहे.” असं जय म्हणाला. नवी मालिका येड लागलं प्रेमाचं २७ मे पासून रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर आपल्याला पाहता येईल.

Original Content is posted on: https://kalakrutimedia.com/popular-actor-jay-dudhane-will-act-in-star-pravahs-yed-lagal-premcha-serial-info/

Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते