Cannes 2024: ऐश्वर्या राय बच्चनचा कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील मनमोहक लूक पाहीलात का?

 


यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलला अखेर सुरुवात झाली असून दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वांच्या नजरा भारताची सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनवर खिळल्या होत्या. एॅश बुधवारी मुंबईहून कान्सला रवाना झाली आणि काल तिथल्या रेड कार्पेटवर तिने आपलं सौंदर्य दाखवलं आहे. २००२ पासून कान्सच्या परदेशी रंगभूमीवर भारताचे प्रतिनिधित्व करणारी भारतीय अभिनेत्री ऐश्वर्या राय आपल्या लूक आणि सौंदर्याने लोकांची मने जिंकत आली आहे. दुखापतीनंतरही स्वत:चा ग्लॅमरस अंदाज दाखवत ऐश्वर्याने रेड कार्पेटवर जादू पसरवत सर्वांना तिच्या लूकची सर्वत्र चर्चा करण्यास भाग पाडले आहे.(Aishwarya Rai On Cannes 2024 Red Carpet)

Aishwarya Rai On Cannes 2024 Red Carpet

ऐश्वर्या राय गेली अनेक वर्षे कान्सच्या परदेशी व्यासपीठावर भारताला सादर करत आली आहे आणि प्रत्येक वेळी भारतात आणि भारता बाहेरील तिचे चाहते तिचा लूक पाहण्यासाठी तिची वाट पाहत असतत. आदल्या दिवशी अभिनेत्री ऐश्वर्या राय तिचे तिचे भव्य स्वागत झाले आणि तेव्हापासूनच तिची चर्चा सुरू आहे. यावेळीही अॅश सोबत तिची मुलगी आराध्या बच्चन ही होती. कान्स 2024 मधील अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा फर्स्ट लूक समोर आला असून तिच्या या मनमोहक अंदाजाची सगळीकडे चर्चा होतोना पहायला मिळत आहे.

Aishwarya Rai On Cannes 2024 Red Carpet

ऐश्वर्या रायने ब्लॅक, व्हाईट आणि गोल्ड च्या कॉम्बिनेशनमध्ये हेवी ट्रेल गाउन परिधान केला आहे. या गाऊनमध्ये गोल्ड फॉइल वर्क आणि व्हाईट स्टेटमेंट स्लीव्ह्स आहेत. एक लांब ट्रेल देखील आहे ज्यावर सोनेरी फुलांचे ठिपके आहेत. मोठे गोल्ड हूप्स, मैसी केस आणि कमीत कमी मेकअपने अभिनेत्रीने हा संपूर्ण लूक पूर्ण केला आहे. ऐश्वर्या रायचा हा लूक सध्या चांगलाच चर्चेत असून सोशल मीडियावर तो चर्चेत आला आहे. फाल्गुनी आणि शेन या डिझायनर जोडीने तिचा हा लूक डिझाइन केला आहे. या सगळ्यादरम्यान अभिनेत्रीच्या हाताला झालेली जखम तिला कोठे ही कमी पडू देत नसून लोक तिचे कौतुक करत आहेत.

===================================

हे देखील वाचा: Kiara Advani, Aditi Rao Hydari सह ‘या’ बॉलीवुड अभिनेत्री यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये लावणार हजेरी 

====================================

खरं तर अभिनेत्री ऐश्वर्या रायला नुकतीच दुखापत झाली होती, ज्यामुळे तिच्या हाताला फ्रॅक्चर झालं होतं. त्याचवेळी हातात प्लास्टर घेऊन ती आपल्या मुलीला घेऊन कान्सच्या रेड कार्पेटवर पोहोचली. इतकंच नाही तर तिने मोठ्या आत्मविश्वासाने पोझ ही दिल्या आहेत. याआधी ऐश्वर्या राय मुलगी आराध्या बच्चनसोबत एअरपोर्टवर दिसली होती. जिथे दोघांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले होते.

Original content is posted on: https://kalakrutimedia.com/have-you-seen-aishwarya-rai-bachchans-adorable-look-at-the-cannes-film-festival-2024-info/

Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Preamachi Gosht 2: प्रेमाचा इफेक्ट असणारी, मनातली स्पेशल गोष्ट; ’प्रेमाची गोष्ट २’ जून २०२५ मध्ये होणार प्रदर्शित