Gullak 4 OTT Release: मिश्रा कुटुंबाची गोष्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार

 

 Gullak 4 OTT Release: मिश्रा कुटुंबाची गोष्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार

ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव्हची सर्वात लोकप्रिय मालिकागुल्लक’मधील मिश्रा कुटुंबाची कहाणी प्रेक्षकांच्या पसंतीच्या यादीत समाविष्ट आहे. दिग्दर्शक श्रेयांश पांडे दिग्दर्शित ही सिरीज एक हलकीफुलकी कौटुंबिक मनोरंजन करणारी आहे, ज्याचे आतापर्यंत तीन सीझन प्रदर्शित झाले आहेत. मालिकेच्या सर्व सीझनला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम आणि पाठिंबा मिळाला आहे. तसेच ‘गुल्लक’च्या चौथ्या सीझनची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. सोशल मीडियावर निर्मात्यांनी मालिकेच्या चौथ्या सीझनशी संबंधित अपडेट शेअर केले आहे. निर्मात्यांनी इन्स्टाग्रामवर गुल्लकच्या आगामी मालिकेचा ट्रेलर लाँच केला आहे.(Gullak 4 OTT Release)
Gullak 4 OTT Release

तसेच सीझन 4 च्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली होती. ज्यानंतर प्रेक्षकांची एक्साइटमेंट लेव्हल आणखीनच वाढली आहे, तर चला जाणून घेऊया गुल्लक सीझन 4 ची संपूर्ण डिटेल्स . गुल्लक सीझन 4 च्या ट्रेलर रिलीजद्वारे टीव्हीएफ प्रेक्षकांना आणखी एक मनोरंजनसमृद्ध मालिका देण्याचे वचन देते. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, ‘लेकर जिंदगी की खानक, आ रही है न्यू स्टोरीज की पिगी बँक! GullakS 4 7 जूनपासून सोनी लिव्हवर एक्सक्लुझिव्ह स्ट्रीम होईल.

Gullak 4 OTT Release

गुल्लकचा पहिला सीझन 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. तर 2021 आणि 2022 मध्ये दुसरा आणि तिसरा सीझन रिलीज झाला होता. गुल्लकमध्ये दाखवण्यात आलेली मिश्रा कुटुंबाची कथा प्रेक्षकांना खूप आवडते.गुल्लक सीझन 4 मध्ये जमील खान, गीतांजली कुलकर्णी आई-वडील संतोष आणि शांतीच्या भूमिकेत आहेत, तर मुले अन्नू आणि अमन वैभव राज गुप्ता आणि हर्ष मयार यांनी साकारली आहेत.(Gullak 4 OTT Release)

==================================

हे देखील वाचा: House Of Dragon Season 2 Trailer: बहूप्रतिक्षित ‘हाऊस ऑफ ड्रॅगन’ सीझन २ चा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित

=================================

मालिकेच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर मध्यमवर्गीय कुटुंबाच्या दैनंदिन जीवनावर आणि अनुभवावर याची कथा तयार करण्यात आली आहे.दिग्दर्शक श्रेयांश पांडे दिग्दर्शित ही सिरीज एक हलकीफुलकी कौटुंबिक मनोरंजन करणारी सिरीज 7 जूनपासून सोनी लिव्हवर एक्सक्लुझिव्ह स्ट्रीम होईल.

Original content is posted on: https://kalakrutimedia.com/gullak-4-ott-release-mishra-familys-story-to-hit-the-screens-soon-know-when-and-where-to-watch-info/

Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते