Panchayat 3 Trailer: फुलेरा गावच्या पंचायतीत येणार नवा ट्विस्ट,’पंचायत 3′ चा धमाकेदाक ट्रेलर पाहिलात का?

 Panchayat 3 Trailer: फुलेरा गावच्या पंचायतीत येणार नवा ट्विस्ट,’पंचायत 3′ चा धमाकेदाक ट्रेलर पाहिलात का?अॅमेझॉन प्राइम व्हिडिओची लोकप्रिय मालिका ‘पंचायत’च्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. वेब सीरिजच्या पहिल्या दोन सीझनला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं होतं. तर तिसऱ्या सीझनबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो ट्रेलर निर्मात्यांनी अखेर आज रिलीज केला आहे. ‘पंचायत ३‘चा ट्रेलर खूपच मजेदार आणि जबरदस्त आहे. मालिकेचा हा सीझनही गेल्या दोन सीझनप्रमाणे कॉमेडीने भरलेला असेल यात काहीच शंका नाही. हे ट्रेलर बघूनच लक्षात येते.(Panchayat 3 Trailer)

Panchayat 3 Trailer
Panchayat 3 Trailer

‘पंचायत’च्या तिसऱ्या सीझनमध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैजल मलिक यांसारखे लोकप्रिय चेहरे आहेत. आज म्हणजेच बुधवारी निर्मात्यांनी ‘पंचायत ३’चा ट्रेलर रिलीज केला आहे. मालिकेच्या तिसऱ्या सीझनमध्ये हे स्टार्स पुन्हा एकदा आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकताना दिसणार आहेत. ट्रेलरमध्ये फुलेरा गावच्या पंचायतीमध्ये एक नवा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. बनराकस आणि सचिव यांच्यात युद्ध झाले असून, त्यामुळे फुलेरा गावात खळबळ उडाली आहे. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की, जुने सचिव म्हणजेच अभिषेक कुमार यांनी राजीनामा दिला आहे. फुलेरा गावात नवीन सचिव आल्याने संपूर्ण वातावरण बदलले आहे.

Panchayat 3 Trailer
Panchayat 3 Trailer

जुन्या सचिवांच्या बदलीची तयारी सुरू आहे, पण ग्रामप्रमुख मंजू देवी त्यांची बदली थांबवतात. एकीकडे सचिव आपल्या अभ्यासात व्यस्त असतात. त्याचबरोबर प्रधान यांची मुलगी रिंकीसोबतची त्याची प्रेमकहाणी ही हळूहळू पुढे सरकताना दिसत आहे. दरम्यान, फुलेरा गावातील रस्त्यांच्या बांधकामाला बनारकांनी आक्षेप घेतल्याने गावात प्रचंड खळबळ उडाली आहे. आणि यामुळे प्रधानजी आणि बनारकस यांच्यात जोरदार वाद सुरू झाला आहे. गावच्या निवडणुकीत बनारकसही उभा राहिल्याने ग्रामस्थांना धक्का बसतो. आता मालिकेच्या तिसऱ्या सीझनमध्ये सेक्रेटरी म्हणजेच अभिषेक कुमार कोणाला सपोर्ट करताना दिसणार हे पाहणं ही औत्सुक्याचं ठरणार आहे.(Panchayat 3 Trailer)

============================

हे देखील वाचा: अमेरिकन सीरिजमध्ये झळकणार तब्बू ,Dune: Prophecy मध्ये साकारणार महत्वाची भूमिका

============================

पंचायत ३’ प्रेक्षकांना आता हसवण्यासाठी सज्ज झाली आहे. ही सीरिज २८ मे रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. आणि आता ट्रेलर पाहील्यानंतर ही सीरिज पाहण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत. 

Orignal content is posted on: https://kalakrutimedia.com/most-awaited-series-panchayat-three-trailer-is-out-info/

Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते