‘तू भेटशी नव्याने’ मालिकेचा मुहूर्त पडला पार; चित्रीकरणाला झाली दणक्यात सुरुवात
‘तू भेटशी नव्याने‘ मालिकेची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मालिका कधीपासून भेटीला येणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये रंगली आहे. मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मालिकेचं चित्रीकरण सुरू झाल्याची बातमी समोर येते आहे. सोनी मराठी वाहिनीने ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेचं चित्रीकरण सुरू केलं आहे. मालिकेच्या सेटवर चित्रीकरणाची सुरुवात करत मुहूर्त पार पडला. मुहूर्ताची पूजा करत मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. मालिकेच्या चित्रकरणाचा हा पहिला दिवस आणि मुहूर्त शूट च्या वेळी अभिनेत्री शिवानी सोनार आणि अन्य कलाकार आणि तंत्रज्ञान उपस्थित होते. सोबतच मालिकेशी जोडले गेलेले अन्य कलाकार आणि तंत्रज्ञ यांचीही उपस्थिती होती.(Tu Bhetashi Navyane Serial)
मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर यांनी सेटवर मालिकेच्या मुहूर्त निमित्त पूजा देखील केली. चित्रीकरणाला सुरुवात झाली म्हणजेच मालिका आता लवकरात लवकर आपल्या भेटीला येणार यात काही शंका नाही. मुहूर्ताची छायाचित्रे कलाकारांनी आपल्या सोशल मिडियावर शेअर करत नवी सुरुवात झाल्याचे सांगितले आहे. मुहूर्ताच्या वेळी सोनी मराठी वाहिनीचा चमू तसेच मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर आणि त्यांचा चमूसुद्धा उपस्थित होता. सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच विविध गोष्टी करू पाहते. मालिकेचे निराळे विषय आणि रंजक कथानकं प्रेक्षकांची मनं नेहमीच जिंकतात.

सोनी मराठी वाहिनीवर नव्या मालिकेचा एक प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत आणि प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आहेत. या मालिकेत सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांची नवी कोरी जोडी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. अभिनेता सुबोध भावे हा यापूर्वी निरनिराळे गाजलेले चित्रपट, विविध मालिका यांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याने साकारलेल्या विविध व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडल्या आहेत. शिवानी सोनार हिच्या यापूर्वीच्या व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केले आहे.(Tu Bhetashi Navyane Serial)
=============================
हे देखील वाचा: ‘तिकळी’ या सन मराठीच्या नवीन रहस्यमय मालिकेत दिसणार पूजा ठोंबरे आणि वैष्णवी कल्याणकर…
=============================
आताही या नव्या व्यक्तिरेखेतील मालिकेवर प्रेक्षक विशेष प्रेम करतील याबाबत शंका नाही. मालिकाविश्वात ए आयवर आधारित असलेली ही जगभरातली पहिलीच मालिका आहे. २५ वर्षांपूर्वीचा सुबोध आणि आत्ताचा सुबोध अशा व्यक्तिरेखा दिसणार आहेत आणि ही एक प्रेमकथाही आहे यांमुळे ही मालिका प्रेक्षकांना विशेष आवडेल यात शंका नाही. ‘तू भेटशी नव्याने’! ही मालिका लवकरच सोनी मराठीवर पाहायला मिळणार आहे.
Original content is posted on: https://kalakrutimedia.com/shooting-of-tu-bhetashi-navyane-serials-has-begins-info/
Comments
Post a Comment