‘Kalki 2898 AD’ संदर्भात मोठी अपडेट आली समोर, या दिवशी प्रदर्शित होणार चित्रपटाचा ट्रेलर

 ‘Kalki 2898 AD’ संदर्भात मोठी अपडेट आली समोर, या दिवशी प्रदर्शित होणार चित्रपटाचा ट्रेलर

कल्कि 2898 एडी‘ ची देशभरात जोरदारदेशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. हा असा चित्रपट आहे ज्याची देशभरातील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नाग अश्विन दिग्दर्शित हा चित्रपट सायन्स फिक्शन आणि भारतीय पौराणिक कथांचा अप्रतिम मिलाफ असणार आहे. या चित्रपटात अनेक बडे कलाकार एकत्र दिसणार आहेत. चित्रपटाविषयी सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे. आता या चित्रपटाच्या ट्रेलरबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे.(Kalki 2898 AD Trailer)

Kalki 2898 AD Trailer

हा आतापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय चित्रपट आहे. या चित्रपटावर जवळपास 600 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाबाबत सातत्याने नवनवीन बातम्या समोर येत होत्या. प्रत्येक बातमीबरोबर प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. आता त्याच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज डेटवरील पडदा हटवला आहे. निर्मात्यांनी 3 जून रोजी सोशल मीडियावर एक पोस्टर जारी करून ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. रिलीज झालेल्या नव्या पोस्टरनुसार या चित्रपटाचा ट्रेलर 10 जून 2024 रोजी रिलीज होणार आहे.

Kalki 2898 AD Trailer

गेल्या काही काळापासून चित्रपटाचे निर्माते सातत्याने नवनवीन पद्धतीने चित्रपटाचे मार्केटिंग करत आहेत. सोमवारी निर्मात्यांनी एक पोस्ट करत लवकरच चित्रपटाविषयी एक मोठे अपडेट जारी करण्याचे संकेत दिले होते, त्यानंतर चित्रपटाच्या ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. याआधीही निर्मात्यांनी काही पोस्टर्स रिलीज केले होते, ज्यामुळे प्रेक्षकांचा उत्साह चांगलाच वाढला होता. याशिवाय भैरव आणि बुज्जी या चित्रपटातील दोन महत्त्वाच्या पात्रांविषयी निर्मात्यांकडून अॅनिमेटेड मालिकाही प्रदर्शित करण्यात आली होती. या मालिकेच्या माध्यमातून निर्मात्यांनी चित्रपटात दाखवलेल्या जगाची ओळख करून दिली आहे.(Kalki 2898 AD Trailer)

===============================

हे देखील वाचा: मनोज बाजपेयीला ‘सिर्फ एक बंदा कफी है’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार,’या’ व्यक्तीला दिलं सर्व श्रेय

===============================

कल्कि 2898 एडी ‘ हा अखिल भारतीय चित्रपट आहे. या चित्रपटात अनेक मोठे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण, दिशा पटानी, ब्रह्मानंदम, पशुपति, राजेंद्र प्रसाद यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वैजयंती मुव्हीजच्या बॅनरखाली सी अश्विनी दत्त या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चित्रपटाचे संगीत संतोष नारायणन यांनी दिले आहे. हा चित्रपट २७ जून ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेयेणार आहे.

Original content is posted on: https://kalakrutimedia.com/big-update-on-kalki-2898-ad-the-trailer-of-the-film-will-be-released-on-this-day-info/

Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते